logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकऱ्यांसाठी लढलो म्हणून सरकारने दिले 'तडीपारीचे' बक्षीस;गजानन ‌कावरखे यांचा गंभीर आरोप!दुष्काळ,कर्जमाफी आणि पीकविम्याच्या आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतल्याचा दावा! सेनगाव/विश्वनाथ देशमुख शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणारे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे यांच्यावर हिंगोली पोलिसांनी तडीपारीची मोठी कारवाई केली आहे.पोलिसांनी प्रतिबंधात्मक पाऊल उचलत त्यांना हिंगोली जिल्ह्यातुन तडीपार केले आहे.या धक्कादायक कारवाईमुळे राजकीय आणि शेतकरी वर्तुळात तीव्र खळबळ उडाली असून,"शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला म्हणून सरकारने आम्हाला तडीपारीचे बक्षीस दिले," असा घणाघाती आरोप कावरखे यांनी केला आहे. या कारवाईनंतर गजानन कावरखे यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध करत सरकार आणि प्रशासनाविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले,"सरकारला वाटत असेल की तडीपार करून माझा आवाज बंद करता येईल,तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. मला केवळ हिंगोलीच्या भौगोलिक हद्दीतून बाहेर काढले आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून नाही! आज वाशिममध्ये नेऊन सोडले, उद्या महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात नेऊन सोडा… शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध आमचा संघर्ष थांबणार नाही."कावरखे यांनी प्रशासकीय कारवाईचा निषेध करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. "ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी लक्षात ठेवावे—दडपशाहीच्या मार्गाने लोकशाहीतील आंदोलने दडपता येत नाहीत,उलट संघर्षाची आग आणखी भडकते. हद्द बदलली… पण लढा नाही! ठिकाण बदलले… पण आवाज नाही! शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार,"असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.कावरखे हे गेल्या काही काळापासून हिंगोली आणि मराठवाडा परिसरात शेतकरी प्रश्नांवर अत्यंत सक्रिय आहेत.त्यांनी खालील प्रमुख मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरले होते, ज्याची प्रशासनाने धास्ती घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी म्हणून रस्त्यावरील संघर्ष करुन शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आणि बँकेच्या जाचक अटींविरोधात उभारलेले आंदोलन विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळवून देण्यासाठी केलेली निदर्शने.तसेच बोगस औषधी,खते कंपन्याविरोधात आवाज उडवून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी लढणे आदीसाठी सतत पाठपुरावा केल्यानेच तडीपारी केल्याचे ठाम मत जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी केले.या तडीपारीच्या कारवाईमुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह इतर अनेक शेतकरी संघटनांनीही प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांचे हक्क मागणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

3 hrs ago
user_Vishwanath Deshmukh
Vishwanath Deshmukh
सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
3 hrs ago
e146e02f-aa90-4dcb-b29a-16e1cdcf95d7

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    1
    आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना
सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........
    1
    रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........
    user_Suresh Badrigiri Giri
    Suresh Badrigiri Giri
    Mechanic रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
    56 min ago
  • परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे
    1
    परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे
धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    37 min ago
  • मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून  साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .
    1
    मुलींच्या शिक्षणाचे ध्येय  बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार
मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून  साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले .
रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .
    1
    वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश..
.
.
.
.
.
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    1
    सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    12 hrs ago
  • जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.
    1
    जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा
    1
    घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.