logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

टाकळीवाडीत निवडणुकीपूर्वी ‘भानामती’चा संशय; गावकऱ्यांत चिंता, प्रशासनाला सतर्कतेचे आवाहन शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. शनिवार दिनांक 21 मार्च रोजी सकाळी सुमारे ११.४१ वाजण्याच्या सुमारास गावातील विविध तिनतट्टी रस्त्यांवर नारळ टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे काही नागरिकांनी यामागे भानामतीसारख्या अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.केंदबा कांबळे यांच्या घराशेजारील तिनतट्टी रस्ता, हायस्कूल परिसर, बाजीराव गोरे यांच्या शेजारील कारखाना रोड, चेतन गोरवाडे यांच्या ऊस रोपवाटिकेजवळील रस्ता तसेच कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर अशा अनेक ठिकाणी हा प्रकार घडल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यामध्ये संबंधित हालचाली स्पष्टपणे दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.ग्रामपंचायत निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना अशा प्रकारामुळे गावात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काहींनी हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत संघटनांनीही पुढाकार घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.गावातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून, शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे मत व्यक्त होत आहे.

on 22 March
user_आमची मराठी.com
आमची मराठी.com
शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.
    1
    सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत  18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...
    1
    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    1
    BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि‌. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे
    1
    वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त 
मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण...
आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते...
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि‌. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.४
मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक
श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड)  येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , 
अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • diva nagar sevak (enjoy life)
    1
    diva nagar sevak (enjoy life)
    user_Vls Patil
    Vls Patil
    Dapoli, Ratnagiri•
    7 hrs ago
  • JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..
    1
    JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.