अखेर संतोष पंडित यांना जामीन मंजूर; १६ सप्टेंबर रोजी पुणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा 📝 तेजस वाळुंज l पुणे जिल्हा प्रतिनिधी पुणे: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्युबर संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, १६ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांचा २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेबाबत यूट्यूबवर आक्षेपार्ह व लैंगिक शेरेबाजी करणारे व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा आणि अटकेचा सविस्तर घटनाक्रम: • तक्रारदार व गुन्हा दाखल: सारिका राम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १:२८ वाजता भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला. • अटक: गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच, ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी संतोष पंडित यांना त्यांच्या कोथरूडमधील घरातून अटक केली. यानंतर त्यांना सुरुवातीला पोलीस कोठडी आणि नंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी पुणे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. या गुन्ह्यात कमाल शिक्षा तीन वर्षांपर्यंत असल्याने आणि डिजिटल पुरावे आधीच जप्त केल्यामुळे त्यांना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, त्यांनी फिर्यादीशी संपर्क साधू नये आणि पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"1
- गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....! पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..! हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे... #PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- "शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला..!"1