logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुलींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा; डॉ. राहुल कांबळे यांच्याकडून मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मुखेड : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले पशुचिकित्सक, पशुचिकित्सक मंत्रालयीन संघटनेचे राज्याध्यक्ष तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीयरत्न पुरस्कारप्राप्त डॉ. राहुल कांबळे यांनी आपल्या मुली उत्कर्षा व प्रगती यांचा वाढदिवस अनोख्या सामाजिक उपक्रमातून साजरा केला. दि. २१ ऑगस्ट रोजी मुखेड शहरातील प्रेरणा निवासी मतिमंद विद्यालय, दीप नगर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून वाढदिवस साजरा करून डॉ. कांबळे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रेरणा निवासी मतिमंद विद्यालयाच्या वतीने डॉ. राहुल कांबळे, नर्स अधिकारी सौ. सोनाली कांबळे आणि पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी डॉ. राहुल कांबळे यांच्या पशुवैद्यकीय सेवेतील कार्यासह सामाजिक क्षेत्रातील संघर्षमय जीवनप्रवासाची माहिती उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुखेडे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे बेटमोगरेकर उपस्थित होते. यावेळी प्रेरणा निवासी मतिमंद विद्यालयाचे विशेष शिक्षक कारळे सर, जाधव सर, मालीपटेल सर, एकाळे सर, कोंडेवाड सर, तोटावार सर, पठाण सर, देवणे सर, कपाळे सर, नातेवाड मॅडम, खांडेकर मॅडम यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी, डॉ. राहुल कांबळे, नर्स अधिकारी सौ. सोनाली कांबळे, उत्कर्षा व प्रगती आदी उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

2 hrs ago
user_Motipasha palekar
Motipasha palekar
Photography studio मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
2 hrs ago
13e51ed5-d072-40b5-bd93-8af57aeb5091

मुलींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा; डॉ. राहुल कांबळे यांच्याकडून मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मुखेड : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले पशुचिकित्सक, पशुचिकित्सक मंत्रालयीन संघटनेचे राज्याध्यक्ष तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीयरत्न पुरस्कारप्राप्त डॉ. राहुल कांबळे यांनी आपल्या मुली उत्कर्षा व प्रगती यांचा वाढदिवस अनोख्या सामाजिक उपक्रमातून साजरा केला. दि. २१ ऑगस्ट रोजी मुखेड शहरातील प्रेरणा निवासी मतिमंद विद्यालय, दीप नगर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून वाढदिवस साजरा करून डॉ. कांबळे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रेरणा निवासी मतिमंद विद्यालयाच्या वतीने डॉ. राहुल कांबळे, नर्स अधिकारी सौ. सोनाली कांबळे आणि पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी डॉ. राहुल कांबळे यांच्या पशुवैद्यकीय सेवेतील कार्यासह सामाजिक क्षेत्रातील संघर्षमय जीवनप्रवासाची माहिती उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुखेडे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे बेटमोगरेकर उपस्थित होते. यावेळी प्रेरणा निवासी मतिमंद विद्यालयाचे विशेष शिक्षक कारळे सर, जाधव सर, मालीपटेल सर, एकाळे सर, कोंडेवाड सर, तोटावार सर, पठाण सर, देवणे सर, कपाळे सर, नातेवाड मॅडम, खांडेकर मॅडम यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी, डॉ. राहुल कांबळे, नर्स अधिकारी सौ. सोनाली कांबळे, उत्कर्षा व प्रगती आदी उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भारतीय मार्केट मध्ये पुन्हा नव्याने नवीन भोंदू बाबा निर्माण झाले... .
    1
    भारतीय मार्केट मध्ये पुन्हा नव्याने नवीन भोंदू बाबा निर्माण झाले...
.
    user_रावसाहेब शिंदे
    रावसाहेब शिंदे
    News Anchor मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    1
    🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा
📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे.
📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा.
☎️ 02462-235077
☎️ 1077 — टोल फ्री
माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा.
⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    15 hrs ago
  • [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न ​नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ​या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ​समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो
    1
    [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
​नांदेड:
लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
​या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
​समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
[26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी  उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरण्याच्या संदर्भामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्याचे आवाहन अन्न... वस्त्र... निवारा... आणि हेल्मेट! हेल्मेट ही आता काळाची गरज; स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन. लातूर (प्रतिनिधी) मानवाच्या जीवनातील अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि वाहतुकीचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आजच्या वेगवान युगात रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यासोबत वाढणारे अपघात पाहता ‘हेल्मेट’ हीदेखील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्ते व्यक्ती आपला जीव गमावत आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जात आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा केवळ वाहतूक विभागाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी आणि संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्याशी निगडित सामाजिक प्रश्न आहे. *हेल्मेट दंडापासून बचावासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी!* दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची वस्तू नाही, तर अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. अपघात कोणाला आणि कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र अपघाताच्या वेळी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरलेले असल्यास डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी करण्यास मोठी मदत होते.त्यामुळे ‘पोलीस कारवाई होईल म्हणून हेल्मेट घालायचे’ हा दृष्टिकोन बदलून ‘माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट घालायचे’ हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वीकारणे आवश्यक आहे. *१ सप्टेंबरपासून हेल्मेट वापर अनिवार्य.* लातूर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.हा निर्णय नागरिकांवर बंधन लादण्यासाठी नसून नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या व्यापक उद्देशाने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाकडे केवळ नियम किंवा कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता, स्वतःच्या सुरक्षिततेसाठीची सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. *समाजाभिमुख पोलीसिंगचा केंद्रबिंदू — नागरिकांची सुरक्षितता.* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या दूरदृष्टीतून लातूर पोलीस दलाकडून कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच ‘समाजाभिमुख पोलीसिंग’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांचे काम केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हेदेखील पोलिसांचे महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे.याच भावनेतून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. *‘मी हेल्मेट वापरेन’... एवढाच संकल्प पुरेसा नाही!* प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतः हेल्मेट वापरण्याबरोबरच आपल्या घरातील प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. पालकांनी आपल्या मुलांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगावे. मित्रांनी मित्राला, सहकाऱ्याने सहकाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचितांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. लातूर पोलीस दलाचे आवाहन आहे की, १ सप्टेंबरपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती लागू होण्याची वाट न पाहता आजपासूनच हेल्मेट वापरण्याची सवय लावा. स्वतः हेल्मेट वापरा, आपल्या कुटुंबीयांना हेल्मेट वापरायला सांगा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा. चला... नियमांसाठी नव्हे, तर आपल्या जीवनासाठी हेल्मेट वापरूया! चला... सुरक्षित प्रवासाची संस्कृती निर्माण करूया! चला... अपघातमुक्त आणि सुरक्षित लातूरसाठी हातात हात घालूया!
    1
    दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरण्याच्या संदर्भामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्याचे आवाहन
अन्न... वस्त्र... निवारा... आणि हेल्मेट!
हेल्मेट ही आता काळाची गरज; स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन.
लातूर (प्रतिनिधी)     मानवाच्या जीवनातील अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि वाहतुकीचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आजच्या वेगवान युगात रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यासोबत वाढणारे अपघात पाहता ‘हेल्मेट’ हीदेखील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे.
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्ते व्यक्ती आपला जीव गमावत आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जात आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा केवळ वाहतूक विभागाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी आणि संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्याशी निगडित सामाजिक प्रश्न आहे.
*हेल्मेट दंडापासून बचावासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी!*
दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची वस्तू नाही, तर अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. अपघात कोणाला आणि कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र अपघाताच्या वेळी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरलेले असल्यास डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी करण्यास मोठी मदत होते.त्यामुळे ‘पोलीस कारवाई होईल म्हणून हेल्मेट घालायचे’ हा दृष्टिकोन बदलून ‘माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट घालायचे’ हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वीकारणे आवश्यक आहे.
*१ सप्टेंबरपासून हेल्मेट वापर अनिवार्य.*
लातूर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.हा निर्णय नागरिकांवर बंधन लादण्यासाठी नसून नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या व्यापक उद्देशाने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाकडे केवळ नियम किंवा कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता, स्वतःच्या सुरक्षिततेसाठीची सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
*समाजाभिमुख पोलीसिंगचा केंद्रबिंदू — नागरिकांची सुरक्षितता.*
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या दूरदृष्टीतून लातूर पोलीस दलाकडून कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच ‘समाजाभिमुख पोलीसिंग’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांचे काम केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हेदेखील पोलिसांचे महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे.याच भावनेतून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
*‘मी हेल्मेट वापरेन’... एवढाच संकल्प पुरेसा नाही!*
प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतः हेल्मेट वापरण्याबरोबरच आपल्या घरातील प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. पालकांनी आपल्या मुलांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगावे. मित्रांनी मित्राला, सहकाऱ्याने सहकाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचितांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त करावे.
लातूर पोलीस दलाचे आवाहन आहे की, १ सप्टेंबरपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती लागू होण्याची वाट न पाहता आजपासूनच हेल्मेट वापरण्याची सवय लावा. स्वतः हेल्मेट वापरा, आपल्या कुटुंबीयांना हेल्मेट वापरायला सांगा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा.
चला... नियमांसाठी नव्हे, तर आपल्या जीवनासाठी हेल्मेट वापरूया!
चला... सुरक्षित प्रवासाची संस्कृती निर्माण करूया!
चला... अपघातमुक्त आणि सुरक्षित लातूरसाठी हातात हात घालूया!
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    1
    वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.
शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले.
यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    1 hr ago
  • केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    1
    केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न.
विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार.
लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.
शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित
या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत.
‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.
या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले.
महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    user_Santosh Dhanure S D news
    Santosh Dhanure S D news
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • देश की युवा पीढ़ी खतरे में हैं" ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... *"देश की युवा पीढ़ी खतरे में हैं" ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... कुछ इस तरह फर्ज़ी डिग्री वाले फेंकूओं की सरकार ने देश को बर्बाद किया है* *युवा इसलिए इस भ्रष्टाचारी सरकार को सपोर्ट नहीं कर रहा*
    1
    देश की युवा पीढ़ी खतरे में हैं"  ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ...
*"देश की युवा पीढ़ी खतरे में हैं"  ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... कुछ इस तरह फर्ज़ी डिग्री वाले फेंकूओं की सरकार ने देश को बर्बाद किया है*
*युवा इसलिए इस भ्रष्टाचारी सरकार को सपोर्ट नहीं कर रहा*
    user_रावसाहेब शिंदे
    रावसाहेब शिंदे
    News Anchor मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.