"आपला माणूस फाउंडेशन " च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन 5 एप्रिल रोजी "आपला माणूस फाउंडेशन " च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन 5 एप्रिल रोजी नागपूर : आपला माणूस फाउंडेशन नागपूर तर्फे यावर्षी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव आयोजित सोहळा 2026 मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. या नव्या उपक्रमाबाबत तसेच फौंडेशनच्या विविध सामाजिक कार्याची माहिती देखील आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून दिली व मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविल्या गेले आहे. प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार, चित्रकला स्पर्धा, टेनिस बॉल, क्रिकेट स्पर्धा, जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रम साई पालखी सोहळा, रक्तदान शिबिर, तसेच आरोग्य समस्यांनी ग्रस्त रुग्णांना भेट देऊन मदत करणे अशा प्रकारे आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम करीत आहे. येणाऱ्या 5 एप्रिल रोजी, सुभेदार ले आउट मधील गजानन हायस्कूल जवळ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती गगन रहांगडाले यांनी दिली. त्यामध्ये मा. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दक्षिणचे आमदार मोहन मते, आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, सुप्रसिद्ध शिव व्याख्याते सुदर्शन दादा शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संदीप जोशी, सौ.नवनीत राणा, आमदार विजय रहांगदळे, आमदार रवी राणा, राजे मुधोजी भोसले नागपूरचे महापौर व उपमहापौर व प्रभाग क्रमांक 29, 32 व 34 चे सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित राहतील. यावेळी गगन रहांगडाले, ओम प्रकाश झाडे, धनंजय जोशी, विजय रामगीरकर, कमलाकर कुमरे, अविनाश पांढूरकर, आशिष आमलीकवार आणि भूषण बोरकर हे परिश्रम घेत आहेत.

- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- हिंगणा/ नागपूर: (दि ३० मार्च) हिंगण्यातील आय सी चौकात सोसाट्याचा वारा; वाहतूक झाली शांत1