पुणे-नाशिक महामार्गावर बटाट्याची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथून पुण्याकडे बटाट्याचा माल घेऊन जाणारा हा ट्रक महामार्गावरून जात असताना, चालकाच्या लक्षात आले की वाहनातून धूर निघत आहे. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून त्यातून बाहेर पडल्याने एक मोठी दुर्घटना टळली. या आगीत ट्रकमधील मालासह वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत ट्रकसह त्यातील संपूर्ण बटाट्याचा माल जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, ट्रक आणि मालाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर बटाट्याची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथून पुण्याकडे बटाट्याचा माल घेऊन जाणारा हा ट्रक महामार्गावरून जात असताना, चालकाच्या लक्षात आले की वाहनातून धूर निघत आहे. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून त्यातून बाहेर पडल्याने एक मोठी दुर्घटना टळली. या आगीत ट्रकमधील मालासह वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत ट्रकसह त्यातील संपूर्ण बटाट्याचा माल जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, ट्रक आणि मालाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या समता यात्रेच्या आगमनामुळे आज मंठा शहर सामाजिक जागृतीच्या वातावरणाने भारावून गेले. पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली होती. स्त्री शिक्षणाच्या या ऐतिहासिक वारशाचे स्मरण व्हावे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने भिडे वाड्याची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली होती. या प्रदर्शनाद्वारे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा व विचारांचा जागर करण्यात आला. या प्रतिकृतीला नागरिक, विद्यार्थी आणि महिलांनी मोठी गर्दी केली, अनेकजणांनी महापुरुषांच्या कार्याची माहिती जाणून घेत सामाजिक परिवर्तनाच्या या चळवळीला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी निघालेली “समता यात्रा” मंठा तालुक्यात दाखल झाली. या यात्रेचे शहरात विविध ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष आणि घोषणाबाजी करत उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देणारी ही यात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. सामाजिक समता, शिक्षण, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार करणाऱ्या या यात्रेमुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. एकूणच, भिडे वाड्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन आणि समता यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत या दुहेरी सामाजिक प्रबोधन पर्वामुळे मंठा शहरात उत्साहपूर्ण आणि शांततेत महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा कार्यक्रम पार पडला.1
- जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती. या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.1
- संबोधी अकादमीने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 110 जोडपी विवाहबद्ध झाली.1
- रात्री उशिरा झालेल्या अडीच तासांच्या चर्चेनंतर सरकारने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या संघर्ष युद्धानंतर झालेल्या चर्चेत मराठा समाजाचा विजय झाला, असे सांगण्यात आले. मध्यरात्री दीड वाजता मराठा समाजात आनंदाचा गुलाल उधळून हा विजय साजरा करण्यात आला.1
- खासदार संजय जाधव यांनी आंतरवाली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे," अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी व्यक्त केली.1
- संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांनी फडणवीस सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, मराठा आरक्षणासंदर्भात ५८ लाख नोंदी सापडल्या होत्या, परंतु त्या नोंदी वेबसाईटवरून हटवण्यात आल्या आहेत. ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, तर ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांची वैधता (व्हॅलीडिटी) होत नसल्याची तक्रार जरागे पाटील यांनी केली आहे. इतका वेळ देऊनही केवळ फसवणूकच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ मनोज दादा जरागे पाटील यांच्याशी चर्चा करून मुंबईकडे रवाना झाले आहे. दरम्यान, जरागे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे की, झोपलेल्या मराठा बांधवांनी आता जागे होऊन अंतरवाली सराटी येथे यावे. ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, त्यांना कोणीही उठवू शकत नाही, असेही ते म्हणाले. "लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे," अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.1
- सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा एक भाग म्हणून संबोधी अकादमीचे अध्यक्ष डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांनी विवाह सोहळ्याच्या मंडपाची पाहणी केली.1
- संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.1
- परभणी जिल्ह्यातील मानवत येथे झालेल्या एका घटनेत, खाजगी ट्रॅव्हल्सच्या धडकेमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.1