logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोयंबतूर येथे स्थापन होणारे ऊस उत्कृष्टता केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल- हर्षवर्धन पाटील कोयंबतूर येथे स्थापन होणारे ऊस उत्कृष्टता केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल- हर्षवर्धन पाटील कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत विचारमंथन बैठक ! ऊस उत्कृष्टता केंद्रासाठी 90 कोटीचा निधी इंदापूर प्रतिनिधी ता :०१ बातमीदार गणेश कांबळे कोयंबतूर (तामिळनाडू) येथील आयसी एआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट (एसबीआय) मध्ये स्थापन होणारे ऊस उत्कृष्टता केंद्र (शुगरकेन सेंटर ऑफ एक्सलन्स ) हे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी व साखर उद्योगासाठी वरदान ठरणार आहे. या ऊस उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी संयुक्तपणे 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कोयंबतूर (तामिळनाडू) येथे शुक्रवारी (दि.30) जुलै रोजी पत्रकार परिषदेमध्ये केली. कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत झालेल्या विचारमंथन सत्र, प्रयोगशाळा भेटी आणि क्षेत्रीय संवादानंतर हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कोयंबतूर येथील आयसी एआर एसबी आयचे संचालक पी. गोविंदराज, तामिळनाडू सरकारचे अतिरिक्त आयुक्त (साखर ) अरुणराज व इस्माचे मान्यवर उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या सहकार्यातून कोयंबतूर (Coimbatore) येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये ऊस उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापन करणेसाठी साखर उद्योगाकडून 45 कोटी रुपये आणि केंद्र सरकारकडून सुमारे 45 कोटी रुपये या प्रमाणे संयुक्तपणे हा रु. 90 कोटी निधी दिला जाईल.ऊस उत्कृष्टता केंद्र हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन ऊस जातींचे संशोधन,आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अधिक ऊस उत्पादन, चांगला साखर उतारा आणि कमी खर्चात शेती करण्यासाठी मार्गदर्शन करणारे विशेष ऊस उत्कृष्टता केंद्र असणार आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. हर्षवर्धन पाटील म्हणाले की ऊस उत्कृष्टता केंद्रामध्ये उसाच्या वाणाचा कमी पाणी, जास्त पर्जन्यमान, क्षारपड जमीन आणि उष्ण हवामान यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे, खोडवा उत्पादनक्षमता आणि निविष्ठा-वापर कार्यक्षमता सुधारणे तसेच इथेनॉल, बायो- सीएनजी आणि ऊर्जेच्या गरजांसाठी वाण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.देशातील साखर उद्योग हा 6 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना, सुमारे 50 लाख कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना आणि 1 कोटींहून अधिक हंगामी मजुरांना आधार देत आहेत, ज्याची उलाढाल 1.5 लाख कोटींहून अधिक आहे. तर 16 हजार कोटींहून अधिकचे कर शासनाला मिळतो. उसाच्या वाढत्या तुटवड्यामुळे साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्वीच्या 150 ते 160 दिवसांवरून आता सुमारे 100 दिवसां वरती आला आहे. केवळ सुमारे 100 दिवसां च्या उसाच्या उपलब्धतेवर वर्षभर प्रक्रिया पायाभूत सुविधा चालवणे आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य होत चालले आहे, त्यामुळे या ऊस उत्पादना केंद्राचे महत्त्व वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञानाचा सुमारे 2 लाख शेतकरी वापर करत आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनाही ए. आय. उपक्रम अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच साखर उद्योगाला केंद्र सरकार व विविध राज्य सरकार यांचे सहकार्य मिळत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. याप्रसंगी बोलताना आयसीएआर- एसबी आयचे संचालक पी. गोविंदराज म्हणाले, या निधीमुळे पायाभूत सुविधांमधील तफावत भरून काढण्यास मदत मिळेल. त्यामुळे ऊस पिकामध्ये विविध रोगांसह उदभवणा ऱ्या जैविक आणि अजैविक ताणांना तोंड देण्यासाठी जनुकशास्त्र आणि जीनोम एडिटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन, अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक आणि हवामान बदलास सक्षम असणारे उसाच्या सुधारित वाणांच्या निर्मितीला संस्था प्रोत्साहन व पाठबळ देईल. •चौकट:- ===== कोयंबतूर ऊस संशोधन संस्था देशातील सर्वात जुनी अग्रगण्य संस्था- हर्षवर्धन पाटील ----------------------------------- कोयंबतूर (तामिळनाडू) येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही भारतातील ऊस संशोधनासाठीची सर्वात जुनी आणि अग्रगण्य संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना आय.सी.ए. आर. अंतर्गत सन 1912 मध्ये झाली असून, गेल्या 110 वर्षाहून अधिक काळामध्ये देशातील ऊस वाण विकासामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे, असे गौरोदगार या प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

3 hrs ago
user_Ganesh Kamble Reporter
Ganesh Kamble Reporter
Graphic designer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago
e269b28f-d404-4133-8558-fa747e742450

कोयंबतूर येथे स्थापन होणारे ऊस उत्कृष्टता केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल- हर्षवर्धन पाटील कोयंबतूर येथे स्थापन होणारे ऊस उत्कृष्टता केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल- हर्षवर्धन पाटील कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत विचारमंथन बैठक ! ऊस उत्कृष्टता केंद्रासाठी 90 कोटीचा निधी इंदापूर प्रतिनिधी ता :०१ बातमीदार गणेश कांबळे कोयंबतूर (तामिळनाडू) येथील आयसी एआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट (एसबीआय) मध्ये स्थापन होणारे ऊस उत्कृष्टता केंद्र (शुगरकेन सेंटर ऑफ एक्सलन्स ) हे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी व साखर उद्योगासाठी वरदान ठरणार आहे. या ऊस उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी संयुक्तपणे 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कोयंबतूर (तामिळनाडू) येथे शुक्रवारी (दि.30) जुलै रोजी पत्रकार परिषदेमध्ये केली. कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत झालेल्या विचारमंथन सत्र, प्रयोगशाळा भेटी आणि क्षेत्रीय संवादानंतर हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कोयंबतूर येथील आयसी एआर एसबी आयचे संचालक पी. गोविंदराज, तामिळनाडू सरकारचे अतिरिक्त आयुक्त (साखर ) अरुणराज व इस्माचे मान्यवर उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या सहकार्यातून कोयंबतूर (Coimbatore) येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये ऊस उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापन करणेसाठी साखर उद्योगाकडून 45 कोटी रुपये आणि केंद्र सरकारकडून सुमारे 45 कोटी रुपये या प्रमाणे संयुक्तपणे हा रु. 90 कोटी निधी दिला जाईल.ऊस उत्कृष्टता केंद्र हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन ऊस जातींचे संशोधन,आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अधिक ऊस उत्पादन, चांगला साखर उतारा आणि कमी खर्चात शेती करण्यासाठी मार्गदर्शन करणारे विशेष ऊस उत्कृष्टता केंद्र असणार आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. हर्षवर्धन पाटील म्हणाले की ऊस उत्कृष्टता केंद्रामध्ये उसाच्या वाणाचा कमी पाणी, जास्त पर्जन्यमान, क्षारपड जमीन आणि उष्ण हवामान यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे, खोडवा उत्पादनक्षमता आणि

9fdf2bb1-65a8-4843-9610-f8d3893a3fb4

निविष्ठा-वापर कार्यक्षमता सुधारणे तसेच इथेनॉल, बायो- सीएनजी आणि ऊर्जेच्या गरजांसाठी वाण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.देशातील साखर उद्योग हा 6 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना, सुमारे 50 लाख कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना आणि 1 कोटींहून अधिक हंगामी मजुरांना आधार देत आहेत, ज्याची उलाढाल 1.5 लाख कोटींहून अधिक आहे. तर 16 हजार कोटींहून अधिकचे कर शासनाला मिळतो. उसाच्या वाढत्या तुटवड्यामुळे साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्वीच्या 150 ते 160 दिवसांवरून आता सुमारे 100 दिवसां वरती आला आहे. केवळ सुमारे 100 दिवसां च्या उसाच्या उपलब्धतेवर वर्षभर प्रक्रिया पायाभूत सुविधा चालवणे आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य होत चालले आहे, त्यामुळे या ऊस उत्पादना केंद्राचे महत्त्व वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञानाचा सुमारे 2 लाख शेतकरी वापर करत आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनाही ए. आय. उपक्रम अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच साखर उद्योगाला केंद्र सरकार व विविध राज्य सरकार यांचे सहकार्य मिळत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. याप्रसंगी बोलताना आयसीएआर- एसबी आयचे संचालक पी. गोविंदराज म्हणाले, या निधीमुळे पायाभूत सुविधांमधील तफावत भरून काढण्यास मदत मिळेल. त्यामुळे ऊस पिकामध्ये विविध रोगांसह उदभवणा ऱ्या जैविक आणि अजैविक ताणांना तोंड देण्यासाठी जनुकशास्त्र आणि जीनोम एडिटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन, अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक आणि हवामान बदलास सक्षम असणारे उसाच्या सुधारित वाणांच्या निर्मितीला संस्था प्रोत्साहन व पाठबळ देईल. •चौकट:- ===== कोयंबतूर ऊस संशोधन संस्था देशातील सर्वात जुनी अग्रगण्य संस्था- हर्षवर्धन पाटील ----------------------------------- कोयंबतूर (तामिळनाडू) येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही भारतातील ऊस संशोधनासाठीची सर्वात जुनी आणि अग्रगण्य संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना आय.सी.ए. आर. अंतर्गत सन 1912 मध्ये झाली असून, गेल्या 110 वर्षाहून अधिक काळामध्ये देशातील ऊस वाण विकासामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे, असे गौरोदगार या प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती. फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती लोणंद शहरात फिरस्त्या मेंढपाळ कुटुंबाचे आगमन झाले असून सर्वत्र शेतामध्ये पिके असल्याने चारा व भूक भागवण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे निदर्शनाला आले सध्या पावसाळा सर्वत्र जिल्ह्यामध्ये असल्याने रात्री अपरात्री शेतामध्ये किंवा माळावर मेंढरास कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे या कुटुंबाचा शासनाने फेरविचार करून बारमाही चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी खास सवलत दिल्यास जीवनाचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे मेंढपाळ कुटुंबाने म्हटले आहे
    1
    फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती.
फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती
लोणंद शहरात फिरस्त्या मेंढपाळ कुटुंबाचे आगमन झाले असून सर्वत्र शेतामध्ये पिके असल्याने चारा व भूक भागवण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे निदर्शनाला आले सध्या पावसाळा सर्वत्र जिल्ह्यामध्ये असल्याने रात्री अपरात्री शेतामध्ये किंवा माळावर मेंढरास कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे या कुटुंबाचा शासनाने फेरविचार करून बारमाही चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी खास सवलत दिल्यास जीवनाचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे मेंढपाळ कुटुंबाने म्हटले आहे
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    29 min ago
  • कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
    1
    कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    1
    मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार!
परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 
भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक लढा उभारण्याचे आवाहन; शिरूर {. डेली न्यूज पोस्ट टीम 24}सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट थांबवणे हे पोलिसा बरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सजग आणि सतर्क राहूनच या संकटावर मात करता येईल. सायबर गुन्ह्यांचे संकट आता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले. शिरूर पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे व अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, राकेश मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रवींद्र भोसले म्हणाले, "छुप्या पद्धतीने तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके (APK) फाईल कधीही डाउनलोड करू नयेत. ओटीपी कोणालाही सांगू नये तसेच बनावट लोन अॅप्सपासून सावध राहावे." पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, अनोळखी व्यक्तींना ओटीपी देऊ नका, खात्री केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नका आणि बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी १९३० हा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक असल्याची माहितीही त्यांनी दिली. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना नखाते म्हणाले की, गांजा, अफू, चरस आणि विशेषतः एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थांचे व्यसन तरुणांमध्ये वाढत आहे. थ्रिलच्या नादात अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या मित्रपरिवार आणि हालचालींकडे लक्ष द्यावे. युवकांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून प्राणायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस शिरूर नगरपालिकेच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, मीना पाडळे, हनुमंत सोनवणे, राजाराम चौरे, सुदर्शन भाकरे, गणेश पवार, विशाल गदादे, संदीप पवार, रोहित दाते, अशोक पाचुंदकर, अर्चना थोरात, वर्षा पवार, सोनल गोरडे, राहुल जगताप, स्नेहल निचित, सर्जेराव बोऱ्हाडे, भानुदास रोकडे, बाबासाहेब शेलार, भास्कर ओव्हाळ, शितल गायकवाड, वैशाली गायकवाड, ऋतुजा वराळ, पल्लवी पुदगाणे, विशाल कारखिले, इंदिरा जाधव, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, रेश्मा शेख, शोभना पाचंगे, रवींद्र सानप, ज्योती गायकवाड, उर्मिला कुसेकर, उत्तम शेलार, अमित उकिरडे, दिव्या कारकूड, शोभा मंदीलकर, संदीप भोगावडे, देवल शहा, रामभाऊ सरोदे, नितीन भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अमोल गारुडी यांनी मानले.
    4
    सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक लढा उभारण्याचे आवाहन; 
शिरूर {. डेली न्यूज पोस्ट टीम 24}सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट थांबवणे हे  पोलिसा बरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सजग आणि सतर्क राहूनच या संकटावर मात करता येईल. सायबर गुन्ह्यांचे संकट आता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले.
शिरूर पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे व अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, राकेश मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रवींद्र भोसले म्हणाले, "छुप्या पद्धतीने तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके (APK) फाईल कधीही डाउनलोड करू नयेत. ओटीपी कोणालाही सांगू नये तसेच बनावट लोन अॅप्सपासून सावध राहावे."
पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, अनोळखी व्यक्तींना ओटीपी देऊ नका, खात्री केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नका आणि बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी १९३० हा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना नखाते म्हणाले की, गांजा, अफू, चरस आणि विशेषतः एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थांचे व्यसन तरुणांमध्ये वाढत आहे. थ्रिलच्या नादात अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या मित्रपरिवार आणि हालचालींकडे लक्ष द्यावे. युवकांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून प्राणायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस शिरूर नगरपालिकेच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, मीना पाडळे, हनुमंत सोनवणे, राजाराम चौरे, सुदर्शन भाकरे, गणेश पवार, विशाल गदादे, संदीप पवार, रोहित दाते, अशोक पाचुंदकर, अर्चना थोरात, वर्षा पवार, सोनल गोरडे, राहुल जगताप, स्नेहल निचित, सर्जेराव बोऱ्हाडे, भानुदास रोकडे, बाबासाहेब शेलार, भास्कर ओव्हाळ, शितल गायकवाड, वैशाली गायकवाड, ऋतुजा वराळ, पल्लवी पुदगाणे, विशाल कारखिले, इंदिरा जाधव, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, रेश्मा शेख, शोभना पाचंगे, रवींद्र सानप, ज्योती गायकवाड, उर्मिला कुसेकर, उत्तम शेलार, अमित उकिरडे, दिव्या कारकूड, शोभा मंदीलकर, संदीप भोगावडे, देवल शहा, रामभाऊ सरोदे, नितीन भंडारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार अमोल गारुडी यांनी मानले.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली अहिल्यानगर साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. *आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी* आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.
    1
    दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली 
अहिल्यानगर 
साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील  सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले.
*आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली  मागणी*
आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Journalist नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,
    1
    साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
#annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी." नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.
    1
    प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य
प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप
आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार
लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला.
यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी."
नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.