स्वामी दयानंद विद्यालयाची गुणवत्तेत यशस्वी भरारी यशाची परंपरा कायम ः इयत्ता 10 वी च्या निकालामध्ये मुलींचीच बाजी लातूर दि.11/05/2026 जेएसपीएम लातूर द्वारा संचलित स्वामी दयानंद विद्यालय, कव्हा या शाळेने इयत्ता 10 वी च्या परीक्षेमध्ये गुणवत्तेत यशस्वी भरारी मारली असून या विद्यालयाचा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 92.59 टक्के लागलेला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे उल्लेखनिय यश मिळाले असल्याची भावना शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणाताई कांदे यांनी व्यक्त केली. स्वामी दयानंद विद्यालयातून समिक्षा होळकर 68.80 टक्के गुण घेऊन प्रथम आलेली आहे. तर नंदिनी जाधव 68 टक्के गुण घेऊन द्वितीय तर श्रावणी देशमुख 67.20 टक्के गुण घेऊन तृतीय व साक्षी घार 65.80 टक्के गुण घेऊन चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिवा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक रणजीत पाटील कव्हेकर, संचालिका अदिती पाटील कव्हेकर, आर्थिक समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक विनोद जाधव, समन्वयक अनिरुद्ध पाटील, ग्रामीण शैक्षणिक समन्वयक सरदार शेख, मुख्याध्यापिका अरुणाताई कांदे, उपमुख्याध्यापक मंडोळाप्पा थंबा यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.2
- Post by नागनाथ ससाने1
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- अभिनेता विजय थालपती यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.1