मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विद्यालयात 'आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी' प्रशिक्षण संपन्न! मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विद्यालयात 'आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी' प्रशिक्षण संपन्न! अकोट तालुका प्रतिनिधी... येथील राधाबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नुकतेच 'आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी' या विषयावर आधारित दोन सत्रांचे विशेष प्रशिक्षण उत्साहात पार पडले. नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि 'आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी प्रशिक्षण प्रकल्प' अंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांचे पूर्व व अंतिम मूल्यांकन करण्यात आले. तसेच शालेय आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांचे सखोल प्रशिक्षण, प्रात्यक्षिके (क्रियाकलाप) आणि साहित्याचा समावेश या प्रशिक्षणात करण्यात आला होता.हे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण प्रशिक्षक अनंत तराळे यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत दिले.हे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी राधाबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र सोनटक्के, प्रा. माणिक राठोड, प्रा. शंकर गवई, राजेंद्र मुहेकार, मिलिंद शेलकर, विनोद रसे, आनंद चंदनकर, दिगंबर घुगे, निलेश देशमुख, हेमंत गणगणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती काळातील पूर्वतयारीबाबत जनजागृती निर्माण झाली आहे.
मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विद्यालयात 'आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी' प्रशिक्षण संपन्न! मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विद्यालयात 'आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी' प्रशिक्षण संपन्न! अकोट तालुका प्रतिनिधी... येथील राधाबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नुकतेच 'आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी' या विषयावर आधारित दोन सत्रांचे विशेष प्रशिक्षण उत्साहात पार पडले. नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि 'आपत्ती
व्यवस्थापन व पूर्वतयारी प्रशिक्षण प्रकल्प' अंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांचे पूर्व व अंतिम मूल्यांकन करण्यात आले. तसेच शालेय आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांचे सखोल प्रशिक्षण, प्रात्यक्षिके (क्रियाकलाप) आणि साहित्याचा समावेश या प्रशिक्षणात करण्यात आला होता.हे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण प्रशिक्षक अनंत तराळे यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत दिले.हे प्रशिक्षण
यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी राधाबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र सोनटक्के, प्रा. माणिक राठोड, प्रा. शंकर गवई, राजेंद्र मुहेकार, मिलिंद शेलकर, विनोद रसे, आनंद चंदनकर, दिगंबर घुगे, निलेश देशमुख, हेमंत गणगणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती काळातील पूर्वतयारीबाबत जनजागृती निर्माण झाली आहे.
- बुलढाणा :-सापाच्या विषाने नव्हे, आरोग्य यंत्रणेच्या निर्दयी दुर्लक्षाने घेतला २ जीव! रस्ता नसल्याने ३ किमी झोळीतून प्रवास, रुग्णालयात लस मिळेना; २२ वर्षीय गर्भवती मातेचा बाळासह तडफडून मृत्यू, दोषींवर कारवाई कधी?*1
- वर्धा ट्राफिक टीम आर्वी दाखल 18 वयापेक्षा कमी गाडी चालवणारे यांना चालन1
- नियमित व्यायामामुळे स्नायू सक्रिय राहतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.1
- देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन! सेनगाव/विश्वनाथ देशमुख तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.2
- इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.1
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- चिखली:-धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत कवठळच्या महिलांची महादेवाला आर्त हाक; दीड महिन्यांचा दुष्काळ अन् विजेच्या लपंडावाने पिके करपली, तातडीने भरघोस मदतीची मागणी1
- दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा1
- पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.1