सासू आणि आजी-सासूच्या जाचाला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या. ठाणे :सासू आणि आजी सासूच्या जाचाला कंटाळून ३० वर्षाच्या व्यक्तीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघींविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भिवंडी येथील शेलार भागात ३० वर्षीय व्यक्ती त्याच्या पत्नीच्या घरी वास्तव्यास होता. याच गावात तरुणाची आई देखील वास्तव्यास होती. परंतु तरुणाची सासू त्याला त्याच्या आईला भेटण्यास मनाई करत असे. अनेकदा तो त्याच्या आईला मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्याची सासू आणि आजी सासू त्याला मारहाण करत असल्याचे सांगायचा. १३ मार्चला तरुणाला त्याच्या सासू आणि आजी सासूने भर रस्त्यात मारहाण करत त्याची आई राहत असलेल्या घरापर्यंत आणले होते. त्यानंतर तरुणाच्या आईने अटकाव केला असता, त्याला दोघीही पुन्हा त्यांच्या घरी घेऊन गेल्या. १४ मार्चला तरुणाने आईला संपर्क साधून त्याला पुन्हा मारहाण झाल्याचे आणि घराबाहेर काढल्याचे सांगितले. तसेच त्याने विष प्राशन केले असल्याचे म्हणत मोबाईल ठेवून दिला. तरुणाच्या आईने त्याचा शोध घेतला असता, तो परिसरातील एका टपरी जवळ बसल्याचे आढळून आले. त्यांनी तरुणाला भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याला पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर १५ मार्चला उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी, ३० मार्चला तरुणाच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तरुणाची सासू आणि आजी सासू विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे दोघींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- राज्यसभेची जागा शरद पवार यांना दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत वाद सुरू झाले असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत हा वाद उफाळून आला आहे1
- अंबरनाथ प्रशासन नगरपालिका शिव मंदिर1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- प्रेसिडेंट कप इंडिया 2026 का उद्घाटन करने पहुंचे बॉलीवुड के भाईजान सलमान खान BNN NEWS1
- मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes1
- Post by Sanjay Dsilva1
- Post by M Veer1
- अंबड तालुक्यातील महाकाळा परिसरात आज सायंकाळी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या तीन युवकांवर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन तरुण जागीच मृत्युमुखी पडले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपशील: आज सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती परिसरात ही घटना घडली. अचानक आलेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी तीन तरुणांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. याच दरम्यान झाडावर जोरदार वीज कोसळली. यामध्ये: १. गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१ वर्षे) – जागीच मृत्यू. २. आदित्य दगडू बेद्रे (वय २० वर्षे) – जागीच मृत्यू. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यवाही: घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्याची प्रक्रिया सुरू असून, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तातडीने घटनास्थळाचा पंचनामा व सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन स्तरावरून मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.1