एकोडी क्षेत्रात रब्बी धान पिकासाठी अखंडीत वीज पुरवठा करा * सरपंच खोब्रागडेंच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीला निवेदन साकोली साकोली तालुक्यातील एकोडी परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी/उन्हाळी धान पिकासाठी अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, एकोडी येथील कार्यकारी अभियंत्यांना अतुल भैसारे यांना निवेदन देण्यात आले. . या निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले की, सध्या धान पिकासाठी वीजपुरवठा अपुरा व अनियमित मिळत असून, वारंवार लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत व उत्पादनावर परिणाम होत आहे. यामुळे तात्काळ लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरऐवजी अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.निवेदनात नमूद केलेल्या समस्या लवकर न सोडवल्यास तीव्र शेतकरी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. या वेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते व त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आपली मागणी नोंदवली. कनिष्ठ अभियंता यांनी शेतकऱ्यांना आपल्या वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांचेशी बैठक करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतांना एकोडीचे सरपंच संजय खोब्रागडे, संजय समरीत, चांदोरीचे सरपंच विठ्ठल मसराम, एकोडी ग्रामपंचायतचे सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड तसेच शेतकरी कार्तिक मेश्राम, योगराज भुरे, संदिप मेश्राम, राकेश काळसर्पे, दिलीप कापगते, अशोक भुरे ध्यक्ष त.मु.स, संजय कापगते, संदिप भुरे, चंद्रशेखर कापगते, दीपक कापगते आदी उपस्थित होते.
एकोडी क्षेत्रात रब्बी धान पिकासाठी अखंडीत वीज पुरवठा करा * सरपंच खोब्रागडेंच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीला निवेदन साकोली साकोली तालुक्यातील एकोडी परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी/उन्हाळी धान पिकासाठी अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, एकोडी येथील कार्यकारी अभियंत्यांना अतुल भैसारे यांना निवेदन देण्यात आले. . या निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले की, सध्या धान पिकासाठी वीजपुरवठा अपुरा व अनियमित मिळत असून, वारंवार लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत व उत्पादनावर परिणाम होत आहे. यामुळे तात्काळ लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरऐवजी
अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.निवेदनात नमूद केलेल्या समस्या लवकर न सोडवल्यास तीव्र शेतकरी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. या वेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते व त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आपली मागणी नोंदवली. कनिष्ठ अभियंता यांनी शेतकऱ्यांना आपल्या वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांचेशी बैठक करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतांना एकोडीचे सरपंच संजय खोब्रागडे, संजय समरीत, चांदोरीचे सरपंच विठ्ठल मसराम, एकोडी ग्रामपंचायतचे सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड तसेच शेतकरी कार्तिक मेश्राम, योगराज भुरे, संदिप मेश्राम, राकेश काळसर्पे, दिलीप कापगते, अशोक भुरे ध्यक्ष त.मु.स, संजय कापगते, संदिप भुरे, चंद्रशेखर कापगते, दीपक कापगते आदी उपस्थित होते.
- Post by मनिषा विजय काशीवार1
- मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मुख्य सोहळा आणि अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.2
- गोंदिया जिले के एकोडी स्थित जिला परिषद भारतीय उच्च माध्यमिक विद्यालय में लगातार तोड़फोड़ की घटनाएं सामने आ रही हैं। हाल ही में अज्ञात लोगों ने स्कूल की खिड़कियों के कांच तोड़ दिए, जिससे परिसर में नुकसान हुआ है। इससे पहले स्कूल में आयोजित लावणी व छत्तीसगढ़ी डांस कार्यक्रम के दौरान कुछ बच्चों द्वारा CCTV कैमरे तोड़े गए थे, जिनकी फुटेज भी सामने आई थी। उस समय डांस कमेटी ने नुकसान की भरपाई करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई भरपाई नहीं की गई। घटना को लेकर प्राचार्य की ओर से गंगाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन 9-10 दिन बीत जाने के बावजूद भी पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। लगातार हो रही घटनाओं और पुलिस की निष्क्रियता से स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं।1
- *९४*रक्तदात्यांनी केले रक्तदान* उमरेड (प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला.अगदी तोच सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंती दिनी काही तरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात १३५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण *९४* रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले. स्थानिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा यामध्ये पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले.प्रसंगी डॉ.हर्षल रेवतकर, डॉ.जितेश चव्हाण,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,अध्यक्ष मनीष बालपांडे ,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दीपक पटले,ओम साई स्पोर्टिंग क्लब चे रितेश राऊत, रिलायबल कोचिंग चे संचालक सुबोध धनविजय,नगरसेविका शालिनी गवळी,इंडिया पॉवर जिम चे किशोर आदमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रक्तपेढी लाईफ लाइन ब्लड बँक नागपूर चे डॉ.अविनाश बभारे,प्रवीण साठवणे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृती चिन्ह भेट अभिनंदन केले.कार्यक्रम संयोजक किशोर आदमने यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडला.यशस्वीतेसाठी आशिष वंजारी,विशाल बावणे,मुकेश गौतम,अक्षय श्रीखंडे,नरेंद्र बालपांडे,दिनेश ढेबूदास,प्रवीण लाडेकर,सतीश चकोले,समीर वैद्य,प्रांजल डहाके,रोशन पोकळे,उज्वल चिंदमवार,तोसिफ शेख,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,शुभम सिर्सिकर,सतीश तांबेकर ,सचिन जोधे ,राजू चाचरकर,संदीप दांडेकर,आदींचे योगदान लाभले.1
- नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना! मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.1
- Post by मनिषा विजय काशीवार2