फ्रेंडशिप डे विशेष: श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा व्यसनमुक्ती संदेश जळगाव: मेहरून येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात "मैत्रीचा हात– नशामुक्त भारताकडे वाटचाल" हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना खरी मैत्री, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी याविषयी प्रेरणादायी समुपदेशन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, "खरा मित्र तोच, जो आपल्या मित्राला चुकीच्या सवयींपासून दूर ठेवतो आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतो. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य आणि इतर कोणतेही व्यसन हे शरीर, मन, कुटुंब आणि समाजासाठी घातक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः व्यसनांपासून दूर राहून आपल्या मित्रालाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करावे." या वेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या हातात मैत्री बँड बांधत "माझा मित्र – नशामुक्त मित्र" हा संकल्प केला. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सामूहिकरीत्या व्यसनमुक्तीची शपथ घेत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमाचे आयोजन आरोग्य व स्वास्थ्य समितीच्या प्रमुख उपशिक्षिका उज्वला नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीविषयक घोषवाक्ये, मनोगते आणि जनजागृतीपर संदेश सादर करून उपस्थितांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020), मूल्यशिक्षण आणि SQAAF अंतर्गत विद्यार्थी सहभाग, जीवनकौशल्ये तसेच सामाजिक उत्तरदायित्व विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार आणि निरोगी जीवनशैली रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

- नशिराबाद जवळील बोगद्यात पाणी... नागरिक आक्रमक टोलवसुली बंद! जळगाव शहरापासून नशिराबादजवळील पोलीस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून टोलवसुली सुरूच ठेवण्यात आल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल नाका गाठत काही काळासाठी टोलवसुली बंद पाडली. आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरता पुढे सोडण्यात आले. बोगद्यातील पाणी तातडीने काढून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. टोल कंपनी नियमित शुल्क आकारते, मात्र पावसाळ्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, "प्रथम सुरक्षित रस्ता आणि नंतर टोल" अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट करत हायवे प्रशासनाला इशारा दिला.1
- भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News1
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- धुळे ब्रेकिंग: कन्हेरी नदीच्या पुरात पिता-पुत्र वाहून गेले! 2 जण बेपत्ता, 2 जण वाचवण्यात यश... Dhule News | धुळे ब्रेकिंग: कन्हेरी नदीच्या पुरात पिता-पुत्र वाहून गेले! 2 जण बेपत्ता, 2 जण वाचवण्यात यश... - धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे तालुक्यातील आंबोडे आणि मुकटी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कन्हेरी नदीला मोठा पूर आला आहे. काल दुपारी अंबोडे गावाजवळील कन्हेरी नदीच्या पुलावरून आनंदा भागवत पारखे आणि त्यांचे तीन मुलगे दिनेश, उमेश व महेश असे चौघे जण पाण्यात वाहून गेले. यापैकी उमेश व महेश या दोघांना ग्रामस्थांनी आणि बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. मात्र आनंदा पारखे व दिनेश पारखे हे दोघेही पाण्यात बेपत्ता झाले आहेत. उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. याशिवाय मुकटी गावातील 4 ते 5 तरुण देखील पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्यांना ग्रामस्थांनी वाचवले.1