तोरणडोंगरी गावच्या दिलीप गावित ची ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा अथलेटिक्स मध्ये सुवर्णभरारी** **तोरणडोंगरी गावच्या दिलीप गावित ची ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा अथलेटिक्स मध्ये सुवर्णभरारी** तोरणडोंगरी ता सुरगाणा जि. नाशिक या गावामध्ये महादू गावित व मोहनाबाई गावीत या सर्वसामान्य आदिवासी दांपत्याच्या पोटी जन्म घेतलेला दिलीप सन 2009 साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणडोंगरी ता. सुरगाणा जि.नाशिक या शाळेमध्ये दाखल झाला. शालेय जीवनामध्ये विविध सहशालेय उपक्रमांमध्ये सहभागी होत असे. त्या शाळेमधील शिक्षकांनी त्याला लहानपणापासून अभ्यास, खेळ, संगीत, सहशालेय उपक्रम या सर्व प्रकारामध्ये गोडी लावली. त्यावेळी तो शाळेमध्ये खो -खो, कब्बड्डी, धावणे या मध्ये आवडीने सहभागी होत असे.शाळेमध्ये असताना तत्कालीन मुख्याध्यापक भास्कर भुसारे पदवीधर शिक्षक केशव महाले क्रीडा शिक्षक मधुकर राऊत,सहशिक्षक गणेश पाडवी,यशवंत भोये, लक्ष्मण पवार या शिक्षकांनी त्याला सन 2009 ते 2016 या कालावधीत जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत घेण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत इयत्ता चौथी पासून त्याला खो-खो, कबड्डी, रनिंग या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीची प्रेरणा दिली. त्याच्याकडून सराव करून घेतला व त्याला प्रत्यक्ष त्या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेऊन केंद्रस्तर, बीटस्तर,तालुकास्तर व जिल्हा स्तरापर्यंत खो-खो त्याच पद्धतीने धावणे सन 2013/14 व 2015/16 या वर्षी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक तसेच प्राविण्य मिळवण्यात त्याला मार्गदर्शन केले. खऱ्या अर्थाने त्याचा पाया भक्कम करून घेण्याचे काम या जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले.शाळेमधील शिक्षक मधुकर राऊत सर यांनी दररोज शाळेमध्ये असताना त्याचप्रमाणे सकाळी त्याच्याकडून रनिंग चा सराव करून घेतला आणि अशा पद्धतीने त्याला या धावणे क्रीडा प्रकारांमध्ये गोडी निर्माण झाली. लहानपणीच उजवा हात गमवावा लागला असला तरी दिलीप ने कधीही त्याविषयी तक्रार केली नाही तो आपले कौशल्य दाखवत विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन त्यामध्ये प्रावीण्य मिळवत असे. जिल्हास्तरापर्यंत त्यांनी झेप घेतली. त्यामुळे जिल्हा परिषद नाशिक अध्यक्ष चषक स्पर्धा या स्पर्धेचा निश्चितच त्याला त्याचा पाया भक्कम करण्यासाठी,त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्याला उंच स्वप्न बघण्यासाठी या स्पर्धेने प्रेरणा दिली आणि या स्पर्धेतूनच आज तो जागतिक पातळीवरील धावपटू म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. जागतिक स्तरावरील विविध स्पर्धा पार पाडल्यानंतर त्यात यशस्वी झेप घेतल्यानंतर दिलीप आपल्या मूळ गावी आल्यानंतर शाळेला आवर्जून भेट देत असे विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधत असे त्यावेळी सुद्धा त्या शाळेतील मुख्याध्यापक दिगंबर चौधरी शिक्षक पंडित गायवन,मनोहर भोये, रामदास भोये,पुंडलिक चौधरी, श्रीकांत गवळी, मधुकर राऊत, गणेश पाडवी त्याला मार्गदर्शन करत असत. प्रेरणा देत असत. दिलीप इयत्ता 1ली ते 7 वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणडोंगरी पर्यंत शिक्षण घेतलेला दिलीप गावित आज कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2026 स्कॉटलंड या ठिकाणी पुरुष 100 मीटर त 47 स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल तोरणडोंगरी गावचे मा.सरपंच रघुनाथ भुसारे ,उपसरपंच देविदास जाधव ग्रामपंचायत सदस्य,पेसा कमिटी अध्यक्ष आनंदा गावित व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष भुसारे,सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थीयांनी अभिनंदन केले आहे. पंचायत समिती सुरगाणा गटशिक्षणाधिकारी श्रीमती अल्पा देशमुख मॅडम, अलंगून बीटाचे विस्तार अधिकारी श्री कोळी साहेब व सर्व विस्तार अधिकारी ,सर्व केंद्रप्रमुख तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांनी या यशाबद्दल शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले आहे.

- 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया2
- सर्वोच्च न्यायालयाच्या ‘समाधान समारोह’विशेष लोकअदालतीत सहभागी व्हा;न्यायालयीन प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याची संधी- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाशिक: सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेली प्रकरणे सामंजस्याने, जलद व समाधानकारक पद्धतीने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 ते 23 ऑगस्ट, 2026 या कालावधीत ‘समाधान समारोह’ या विशेष लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीत करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांशी संबंधित पक्षकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Services Authority-DLSA), नाशिक यांच्या माध्यमातून या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात प्रशिक्षित मध्यस्थ (Mediators) यांच्या उपस्थितीत संबंधित पक्षांमध्ये चर्चा, वाटाघाटी आणि कायदेशीर मार्गदर्शन करून परस्पर संमतीने प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. न्याय सर्वसामान्यांना सुलभ, जलद आणि समाधानकारक पद्धतीने मिळावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील पक्षकारांनी या संधीचा लाभ घेत सामंजस्याने वाद मिटविण्यास पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. या विशेष लोकअदालतीत सहभागी होण्यासाठी नोंदणीकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सोपा अर्ज उपलब्ध करून दिला असून, संबंधितांनी तो भरून सहभाग नोंदवावा. नाशिक जिल्ह्यातील ज्या नागरिकांची प्रकरणे मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन प्रकरणे जलद निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक आर. एन. रोकडे यांनी केले आहे.1
- बदापूर-ब्राह्मणगाव रस्त्याची दैनंदिन दुरवस्था: संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतली; नागरिक हैराण येवला:दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बदापूर ते ब्राह्मणगाव रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे रोजच लहान-मोठी वाहने फसण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास मोठा उशीर झाला. या रस्त्यावरून दररोज दुचाकी, छोटा हत्ती आणि ट्रॅक्टरसारखी वाहने चिखलात अडकून पडतात. आज अचानक शाळेची बस रस्त्यातच रुतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्यात आली. दोन जिल्ह्यांमधील दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर तातडीने 'रस्त्याचे' काम करून रस्ता दुरुस्त करावा, अशी तीव्र मागणी त्रस्त ग्रामस्थ व पालकांकडून केली जात आहे1
- 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.1
- नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा आता रस्त्यावर उतरून लढा! "ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर सामान्य माणसाची"; क्रांतीदिनी चक्काजाम जनआंदोलनाची दिली हाक मुंबई, दि. ३१ जुलै २०२६ : पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही," असे तांबे यांनी स्पष्ट केले.पुणे–नाशिक दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिकदरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, "केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो," असे आमदार तांबे यांनी ठामपणे सांगितले. शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "हे आंदोलन कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे."1
- तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद ; सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद.. तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद... सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद.. शुक्रवारी सकाळी दमदार पावसाने झोडपले... तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्याची सरासरी 39 . 25 मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली. तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा आधार झाला आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद सकाळी साडे सातच्या वाजेच्या पर्यंत तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 mm तर तालुक्यात आज अखेर एकूण 244.25 mm पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात चारही महसूल मंडळ निहाय पर्जन्यान मंडळातील आजच्या व एकूण झालेले पर्जन्यमान असे तळोदा मंडळात 37mm एकूण 198 mm, बोरद मंडळ 38 mm एकूण 229 mm, सोमावल मंडळ 63 mm व एकूण 283 mm, प्रतापपूर मंडळ 19 mm व एकूण 262 mm पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवस भर जोरदार पावसाने झोडपले आहे.1
- लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.... धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस! धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.1
- मुंबई आग्रा महामार्गावर राहुड गावाजवळ मोठ्या बाबा मंदिराजवळ मोटरसायकलचा अपघात होऊन एक जण जखमी रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या मोफत रुग्णवाहिकेचे तत्पर मदत चांदवड : दिनांक 31/ 7 /2026 रोजी दुपारी 12:42 मिनिटांच्या सुमारास अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार राहुड गावाजवळ मोठ्या बाबा मंदिराजवळ रस्त्याला खड्डा पडलेला असल्याने गाडी खड्ड्यात जाऊन अपघात झाला असून एक जण जखमी झालेला आहे. घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या विनामूल्य ॲम्बुलन्स सेवेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातातील वाहन : मोटरसायकल MH -18 -CC -8598 जखमीचे नाव : 1) निलेश राजेंद्र पाटील गाव: उंडाणे.धुळे5