विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा मिळावी, शिक्षणातील विविध संधींची माहिती व्हावी आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी व्हावी या उद्देशाने आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने शनिवार, २० जून २०२६ रोजी IES शाळा, वरसोली येथे करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी श्री. सुनील भोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटपही करण्यात आले. आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना छंद आणि करिअर यांमधील फरक स्पष्ट करत आवडी, क्षमता व कौशल्यानुसार करिअर निवडण्याचे आवाहन केले. त्यांनी या अभियानाचा सामाजिक उद्देशही मांडला. उपशिक्षणाधिकारी श्री. सुनील भोपळे यांनी यशासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि दृढ इच्छाशक्तीचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख मार्गदर्शक श्री. मिलिंद धोदरे यांनी दहावी व बारावीनंतरचे विविध शैक्षणिक शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना आणि करिअरच्या अनेक पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने व त्यासाठी आवश्यक कौशल्यांवरही प्रकाश टाकला. या अभियानाची सुरुवात IES शाळा, वरसोलीसारख्या सुंदर, स्वच्छ व शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरणात झाल्याबद्दल संस्थेने समाधान व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण पाटील, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. आगरी समाज संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुनिल तांबडकर, मार्गदर्शक श्री. अनंत म्हात्रे, श्री. उदय म्हात्रे, श्री. तुषार थळे, श्री. मनोहर पाटील व युवा कार्यकर्ते कु. श्रेयस प्रभाकर ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शैक्षणिक कार्यक्रम समितीचे श्री. मिलिंद धोदरे, श्री. राजेंद्र पाटील, सौ. शुभांगी म्हात्रे, श्री. शशिकांत मिठागरी, श्री. जयवंत पाटील व श्री. प्रकाश मिठागरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य, देणगीदार, सभासद आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीपणे सुरू झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या अभियानांतर्गत अलिबाग तालुक्यातील सुमारे ५५ दहावी व बारावीच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना करिअर, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संस्थेचा हा उपक्रम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. कार्यक्रमादरम्यान आगरी समाज संस्थेने विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीमध्ये पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी पालकांनाही या मार्गदर्शन कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन आपल्या पाल्यांना योग्य दिशा देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याच्या आगरी समाज संस्थेच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- नागपूर क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तथ्ये समोर आली आहेत. खेळाडू, कोच आणि पालक वर्गाने एकत्र येत क्रीडा विभागातील या मनमानी प्रशासनाचे सत्य माध्यमांसमोर उघड केले आहे.1
- ‘पितृ देवो भव’ या वचनानुसार, वडिलांना देवाचे रूप मानले जाते. एक वडील असे देव असतात, जे आपल्या कुटुंबासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतात.1
- भंडारा येथील 'डायट' संस्थेत १८ ते २१ जून या कालावधीत शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच २१ जून रोजी, कलाशिक्षण या विषयांतर्गत एक महत्त्वाचा भाग घेण्यात आला. यात वर्ग ३ व ४ थीसाठी शिक्षकांनी घोटीव कागदाच्या विविध वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि त्यानंतर त्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर कागदी वस्तूंचे यशस्वीरित्या सादरीकरण केले.1
- आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२६ च्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील भिलगाव येथील माकड़े सेलिब्रेशन परिसरात एक भव्य योग सोहळा आयोजित करण्यात आला. या 'योग महाकुंभा'मध्ये २०० हून अधिक लोकांनी उत्साहाने सामूहिक योगाभ्यास केला, ज्यामुळे आरोग्य आणि जनजागृतीचा महत्त्वाचा संदेश समाजात पोहोचला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व २०० पेक्षा जास्त लोकांनी स्वस्थ जीवनाचा संकल्प केला. 'Yoga for Healthy Aging' या संकल्पनेवर विशेष भर देत, योगाने दीर्घायुष्याचा संदेश या सोहळ्यातून प्रभावीपणे देण्यात आला, ज्यामुळे निरोगी आणि जागरूक जीवनाचे महत्त्व अधोरेखित झाले.1
- भंडारा येथे नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांसाठी आयोजित चार दिवसीय प्रशिक्षण सुरू आहे. आज, २१ जून रोजी या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस होता. या प्रशिक्षणादरम्यान कलाशिक्षण विषयांतर्गत रंगमंच घटकाच्या सादरीकरणात सीमा उताणे यांनी वाचिक अभिनय सादर केला.1
- नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये नागरिकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद वाचनालयाचे लोकार्पण २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीरभाऊ मेघे यांच्या शुभहस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी तत्कालीन नगर परिषद मुख्याधिकारी भारत नंदनवार, प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक नितीन काळे, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, तरुण आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. आमदार समीरभाऊ मेघे यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत वाचन संस्कृती ही समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे म्हटले. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झाले नसून, विद्यार्थी आणि तरुणांनी नियमित अभ्यास व वाचनाची सवय लावून ज्ञानसंपन्न व जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनालये केवळ पुस्तकांचे संग्रहालय नसून, ती व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जागृतीची केंद्रे असल्याचेही त्यांनी नमूद केले. वंदे भारतचे प्रतिनिधी सतीश भालेराव यांनी संपर्क साधल्यावर, तत्कालीन मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी नागरिकांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांची माहिती दिली. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि विविध विषयांवरील संदर्भ साहित्याचा लाभ सहज मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक नितीन काळे यांनी हे वाचनालय म्हणजे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले. याच्या निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत त्यांनी विद्यार्थी आणि नागरिकांना वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. वाचनालयाचे ग्रंथपाल सूरज पाठे यांनी वाचनालयाची सविस्तर माहिती दिली. येथे विविध विषयांवरील पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ साहित्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळावे यासाठी सर्व आवश्यक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे म्हटले. विशेषतः ग्रामीण आणि उपनगरीय भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास सुविधा मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एसएससी आणि नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुभाष गेडाम, राकेश राऊत आणि आकाश मेश्राम यांनीही वाचनालयाला विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरवले, ज्यामुळे त्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला नवी दिशा मिळेल. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद वाचनालय वानाडोंगरी परिसरात ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जागृतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.1
- नागपूर येथे नुकतीच नीट परीक्षा पार पडली, ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेशी संबंधित असलेल्या प्रवेश एजन्सीयांचे कर्मचारी मात्र त्यांच्या जाहिरातींमध्येच पूर्णपणे गुंग असल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.1
- आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र योग आयोग स्थापन करण्याची मागणी सातत्याने केली आहे. योग हा भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला अमूल्य वारसा असून, महाराष्ट्रात योगाचा प्रसार, संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळावी यासाठी ही मागणी करण्यात येत आहे. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यापासून ते विधानसभेत हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही चर्चा केली आहे. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर राज्य सरकारने योग आयोग स्थापनेबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे. महाराष्ट्रात स्वतंत्र योग आयोग स्थापन झाल्यास योग शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि जनजागृतीला मोठे बळ मिळेल, असे म्हटले जात आहे. योगाचा प्रसार आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक व्यापक करण्याच्या संकल्पासह आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.1