सहकार महर्षि नानासाहेब हिंगणकर यांचा अमृत महोत्सव अभूतपूर्व साजरा होणार ;नवीन वर्षात तीन जानेवारीला सत्यम पँलेस येथे "भव्य अभिष्टचिंतन सोहळा" ;मान्यवरांची मांदियाळी करणार अभिष्टचिंतन ;आयोजन समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सहकार नेते हिदायत पटेल यांची निवड ;आयोजनाच्या जय्यत तयारी बाबत माहीती देण्यासाठी सोमवारी अकोट कृउबासच्या सभागहात संपन्न झाली पत्रकार परिषद अकोट,ता.२४- ज्येष्ठ सहकार महर्षि,जिल्हा सहकारी बँक व महाराष्ट्र स्टेट को.आँप.मार्केटिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष नानासाहेब उपाख्य रमेशभाऊ हिंगणकर यांचा ७५ वाढदिवस अमृत महोत्सव म्हणून "लोकसहभातून"भव्य-दिव्य स्वरुपात व अभूतपूर्व साजरा होणार आहे.नुतन वर्ष प्रारंभ होताच तीन जानेवारीला दुपारी तीन वाजता अकोला मार्गावरील सत्यम पँलेस येथे नानासाहेबांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.या सोहळ्यासाठी आयोजन नियोजन व संयोजनाबाबत "कार्य समिती" गठीत करण्यात आली असून या समितीने लोकसहभागातून जय्यत तयारी सुरु केली आहे.मुख्य समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सहकार नेते हिदायत पटेल यांची निवड करण्यात आली आहे.या समितीच्या वतीने आयोजनाच्या तयारीबाबत माहीती देण्यासाठी सोमवार(ता.२३)ला अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन माहीती देण्यात आली. नानासाहेब हिंगणकर यांचा ७५ वर्षाचा जीवनपट गौरवशाली आहे.त्यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.त्यांनी तालुक्यापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.त्यांनी अकोटच्या कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापति,जिल्हा सहकारी बँक व महाराष्ट्र स्टेट को.आँप मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष,नवी दिल्लीतील इफको,महाराष्ट्र स्टेट कन्झुमर्स फेडरेशन(मुंबई),महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय,(पुणे) विविध पदांसह श्री शिवाजी शिक्षण संस्था(अमरावती)च्या कार्यकारी परिषदेचे संचालक म्हणून कार्य केले आहे.राज्यस्तरावर व सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे,अशा उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या कार्यकतृत्वाचा गौरव समाजाला नवी उर्जा व नव्या पिढीला प्रेरणा देणारा,ठरेल,या विचारातूनच या अभिष्टचिंतन सोहळाचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ सहकार नेते हिदायत पटेल,कृउबासचे सभापति प्रशांत पाचडे यांनी आयोजनाबाबत सविस्तर माहीती दिली.नेते हिदायत पटेल यांनी "नानासाहेब हिंगणकर अमृत महोत्सवी वर्षात" अनेक कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले.परिषदेत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश लोणकर,ज्येष्ठ संपादक हरिदास चेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या परिषदेपूर्वी सोहळ्याची रुपरेषा ठरविण्यासाठी मुख्य संयोजन समितीची सभा नेते हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे,सहकारी जिनिंग संस्थेचे अध्यक्ष सुभाष वानखडे,अनोख राहणे,सारंग मालाणी,बाळासाहेब भांबुरकर,माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे,अँड.ब्रिजमोहन गांधी,प्रा.संजय बोडखे व रामचंद्र बरेठीया,शेषराव वसु,रामदास थारकर,मुन्ना पांडे,दिलीप बोचे,कैलास गोंडचर,कुलदिप वसु,रामबिलास अग्रवाल,दयाराम धुमाळे,मुकुंद पांडे,भालचंद्र फोकमारे,हरिभाऊ मानकर,उध्दवराव टापरे,अजाबराव मोकळकार,दिपक वानखडे,दिवाकर गवई, रामदास ताडे,प्रा.गजानन चोपडे,रामदास ताडे,दयाराम धुमाळे,कैलास कवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.सारंग मालाणी यांनी सर्वांचे आभार मानले,अशी माहीती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.संयोजन सभेतील अनेक मान्यवर व तालुक्यातील पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
सहकार महर्षि नानासाहेब हिंगणकर यांचा अमृत महोत्सव अभूतपूर्व साजरा होणार ;नवीन वर्षात तीन जानेवारीला सत्यम पँलेस येथे "भव्य अभिष्टचिंतन सोहळा" ;मान्यवरांची मांदियाळी करणार अभिष्टचिंतन ;आयोजन समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सहकार नेते हिदायत पटेल यांची निवड ;आयोजनाच्या जय्यत तयारी बाबत माहीती देण्यासाठी सोमवारी अकोट कृउबासच्या सभागहात संपन्न झाली पत्रकार परिषद अकोट,ता.२४- ज्येष्ठ सहकार महर्षि,जिल्हा सहकारी बँक व महाराष्ट्र स्टेट को.आँप.मार्केटिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष नानासाहेब उपाख्य रमेशभाऊ हिंगणकर यांचा ७५ वाढदिवस अमृत महोत्सव म्हणून "लोकसहभातून"भव्य-दिव्य स्वरुपात व अभूतपूर्व साजरा होणार आहे.नुतन वर्ष प्रारंभ होताच तीन जानेवारीला दुपारी तीन वाजता अकोला मार्गावरील सत्यम पँलेस येथे नानासाहेबांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
होणार आहे.या सोहळ्यासाठी आयोजन नियोजन व संयोजनाबाबत "कार्य समिती" गठीत करण्यात आली असून या समितीने लोकसहभागातून जय्यत तयारी सुरु केली आहे.मुख्य समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सहकार नेते हिदायत पटेल यांची निवड करण्यात आली आहे.या समितीच्या वतीने आयोजनाच्या तयारीबाबत माहीती देण्यासाठी सोमवार(ता.२३)ला अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन माहीती देण्यात आली. नानासाहेब हिंगणकर यांचा ७५ वर्षाचा जीवनपट गौरवशाली आहे.त्यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.त्यांनी तालुक्यापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.त्यांनी अकोटच्या कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापति,जिल्हा सहकारी बँक व महाराष्ट्र स्टेट
को.आँप मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष,नवी दिल्लीतील इफको,महाराष्ट्र स्टेट कन्झुमर्स फेडरेशन(मुंबई),महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय,(पुणे) विविध पदांसह श्री शिवाजी शिक्षण संस्था(अमरावती)च्या कार्यकारी परिषदेचे संचालक म्हणून कार्य केले आहे.राज्यस्तरावर व सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे,अशा उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या कार्यकतृत्वाचा गौरव समाजाला नवी उर्जा व नव्या पिढीला प्रेरणा देणारा,ठरेल,या विचारातूनच या अभिष्टचिंतन सोहळाचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ सहकार नेते हिदायत पटेल,कृउबासचे सभापति प्रशांत पाचडे यांनी आयोजनाबाबत सविस्तर माहीती दिली.नेते हिदायत पटेल यांनी "नानासाहेब हिंगणकर अमृत महोत्सवी वर्षात" अनेक कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले.परिषदेत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश लोणकर,ज्येष्ठ संपादक
हरिदास चेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या परिषदेपूर्वी सोहळ्याची रुपरेषा ठरविण्यासाठी मुख्य संयोजन समितीची सभा नेते हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे,सहकारी जिनिंग संस्थेचे अध्यक्ष सुभाष वानखडे,अनोख राहणे,सारंग मालाणी,बाळासाहेब भांबुरकर,माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे,अँड.ब्रिजमोहन गांधी,प्रा.संजय बोडखे व रामचंद्र बरेठीया,शेषराव वसु,रामदास थारकर,मुन्ना पांडे,दिलीप बोचे,कैलास गोंडचर,कुलदिप वसु,रामबिलास अग्रवाल,दयाराम धुमाळे,मुकुंद पांडे,भालचंद्र फोकमारे,हरिभाऊ मानकर,उध्दवराव टापरे,अजाबराव मोकळकार,दिपक वानखडे,दिवाकर गवई, रामदास ताडे,प्रा.गजानन चोपडे,रामदास ताडे,दयाराम धुमाळे,कैलास कवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.सारंग मालाणी यांनी सर्वांचे आभार मानले,अशी माहीती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.संयोजन सभेतील अनेक मान्यवर व तालुक्यातील पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
- #vibes Dnyaneshwar maharaj हरिपाठ श्रीराम मंदिर मोठे बारागण अकोट #hindureligio electroshort_70751
- अकोट फ़ाइल परिसर में कुत्तों का आतंक,कई नागरिको को कर चुके घायल 20241
- नरनाळा किल्ला अकोट 🚩Narnala fort shahnur🚩1
- अकोला आणि अकोट शहरात गुन्हेगारीसाठी सिसिटीव्हीचा वॉच ,गावगुंडांवर कडक नियंत्रण1
- Pori jara japun danda dhar..💫🥁🎷 स्वस्तिक banjo पार्टी अकोट.. कान्हा 7+ अकोट वाला 💯1
- शिवांश💖कलेक्शन बस स्टँड रोड तेल्हारा.महाराष्ट्र🙏🏼🙏🏼ll Haripatil ll1
- गृहमंत्री होश में आओ च्या नाऱ्यांनी संग्रामपूर दणानलं संग्रामपूर येथील विराट मोर्चा काढण्यात आला1
- "गृहमंत्री होश में आओ"च्या नाऱ्यांनी संग्रामपूर दणानलं1