विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी भव्य मिरवणुकीचे आयोजन भीम गीतांनी झाली धामणगावकरांची पहाट,केक कापून भीम जयंतीला सुरुवात प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जगातील 192 देशांमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे .तेव्हा धामणगाव व तालुक्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांची जयंती उत्साहाने ,जल्लोषात सर्वत्र साजरी होत आहे. दिनांक 14/ 4 /2025 रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी नगरपरिषद प्रांगणामध्ये केक कापून सर्व अनुयायांनी एकमेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पहाटे पाच वाजता पासूनच नगरपरिषद प्रांगणामध्ये असलेले डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून महिला, पुरुष ,युवक ,युवती वृद्ध ,लहान-मोठे सर्वांनी एकच गर्दी केली होती. त्याचप्रमाणे सुंदर अशा भिम पहाट गीतांच्या कार्यक्रमाची महफिल सजविण्यात आली होती. बालकलाकारांनी भीम गीते सादर करून अनुयायांची मने जिंकली. सुंदर अशा भीम पहाटचे आयोजन धामणगाव शहरातील सर्व आंबेडकरी संघटनेने केले होते. सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी एकमेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. व सायंकाळी भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आठवडी बाजार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ,रमाबाई आंबेडकर नगर ,साईनगर व अनेक ठिकाणावरून मिरवणूक शहरांमध्ये एकत्र आल्या. जिकडे पाहावे तिकडे निळेच निळे झेंडे ,आतिशबाजी ,डीजे ,धुमाल, ढोल, ताशे व देखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. महिला, युवती, युवक ,पुरुष नाचत गाजत हजारोच्या संख्येत मिरवणुकीत सामील झाले होते . अनेक जाती-धर्माचे नागरिक मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. ठीक ठिकाणी थंड पाणी ,शरबत अल्पपहाराची व्यवस्था शहरामध्ये अनेकांनी केली होती . मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती .मिरवणुकीला दत्तापूर पोलिसांनी चौख बंदोबस्त दिला होता. शहरातील मुख्य मार्गाने होत मिरवणूक चे समापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झाले.

- वर्धा-आर्वी रस्त्यावर टायर फुटल्याने भीषण अपघात; एकाचा मृत्यू , ३ जण जखमी1
- आर्वी | आर्वित राष्ट्रवादी अजित पवार गटाने नेमकी कोणाची काढली अंत्ययात्रा.. जाणून घ्या...1
- वर्धा-आर्वी मार्गावर टायर फुटल्याने भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी1
- संध्याकाळी गेलो आर्वी भाची चे बडड्डे ला..❤️🥰🫶 // गेलो मॅगी ची पार्टी कराला डोंगरात..😂😂❤️ //1
- Amravati airport✈️l Historic Moment/ flight touchdown1