कृषी विज्ञान केंद्र, वाशिम येथे महिलांसाठी कुक्कुटपालन व सेंद्रिय खत निर्मिती विषयक प्रशिक्षण संपन्न* कुक्कुटपालन, नैसर्गिक शेती व सेंद्रिय खत निर्मितीद्वारे विषमुक्त अन्न उत्पादन आणि शाश्वत शेतीचा संदेश* रिसोड, दि. ३१ जुलै : भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र, वाशिम येथे महिलांसाठी “कुक्कुटपालन व सेंद्रिय खत निर्मिती” या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर यशस्वीरित्या संपन्न झाला. या प्रशिक्षणाचा उद्देश ग्रामीण महिलांना पूरक कृषी उद्योग, नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय निविष्ठा निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक स्वावलंबन व शाश्वत शेतीला चालना देणे हा होता. प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. रवींद्र एल. काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. तुषार देशमुख, श्री. निवृत्ती पाटील आणि श्री. मयूर देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पीक उत्पादनासोबत कुक्कुटपालन, शेळीपालन व दुग्धव्यवसाय यांसारख्या पूरक कृषी उद्योगांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे सांगितले. या व्यवसायांमधून उपलब्ध होणाऱ्या सेंद्रिय अवशेषांचा वापर करून उच्च प्रतीची सेंद्रिय खते तयार केल्यास रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन जमिनीचे आरोग्य सुधारते, उत्पादन खर्चात बचत होते आणि विषमुक्त, सकस व सुरक्षित अन्न उत्पादनास चालना मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शेतकरी कुटुंबाने “विषमुक्त अन्न उत्पादनाचा संकल्प” करून स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासोबतच मातीचे आरोग्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री. मयूर देशमुख यांनी कुक्कुटपालनाचे आर्थिक महत्त्व, सुधारित संगोपन तंत्रज्ञान, संतुलित खाद्य व्यवस्थापन, जैवसुरक्षा उपाययोजना, रोगप्रतिबंधक लसीकरण, निवास व्यवस्थापन तसेच ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगार व उत्पन्नवाढीच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. निवृत्ती पाटील यांनी शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत व इतर सेंद्रिय निविष्ठांच्या निर्मितीची वैज्ञानिक पद्धत, त्यांचे मृदास्वास्थ्य संवर्धनातील महत्त्व तसेच नैसर्गिक शेतीतील उपयोग याविषयी माहिती दिली. श्री. तुषार देशमुख यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात (National Mission on Natural Farming) महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून शेतीसाठी आवश्यक सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरी तयार कराव्यात, त्यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय बचत होईल आणि शाश्वत शेतीला बळकटी मिळेल, असे सांगितले. तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन व दुग्धव्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या सेंद्रिय अवशेषांचा प्रभावी वापर शेतीमध्ये करून मृदा सुपीकता वाढविता येते, असे त्यांनी नमूद केले. या प्रशिक्षणामध्ये दिव्यस्पर्श महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच आगरवाडी, वाडी रायताळ, तिवळी आणि शेलगाव राजगुरे येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यस्पर्श महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा सौ. बाळाबाई सोनुने यांनी प्रभावी समन्वय व नियोजनाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली.

- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- माटरगाव बेलुरा नदीवर असलेला पुल गेला वाहुन मुसळधार पावसामुळे माटरगाव–बेलुरा मार्ग बंद; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दूध व्यावसायिकांचे हाल1