*-मानस कन्येने पित्याचा ७५वा अमृत महोत्सव आनंदाश्रूंनी आणि आशीर्वादांनी केला साजरा-* ( तुषार शिंपी. एरंडोल) तळई येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री. शंकरराव धनाजी पाटील यांचा ७५ वा अमृत महोत्सव हा केवळ जन्मदिनाचा उत्सव नव्हता, तर तो वडील–कन्या या नात्यातील न बोलता व्यक्त होणाऱ्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा हृदयस्पर्शी सोहळा ठरला. शब्द अपुरे पडावेत असा हा क्षण होता—जिथे भावना डोळ्यांतून वाहत होत्या आणि आठवणी हृदयात साठून राहिल्या. जावई प्रा.डॉ. हेमंत मधुकर पाटील व मानस कन्या सौ. वैशाली हेमंत पाटील यांनी आपल्या पित्याचा अमृतमहोत्सव ज्या नितांत प्रेमाने, नतमस्तक होऊन साजरा केला, त्यातून एका लेकीची कृतज्ञता, मायेची सावली आणि आयुष्यभराची ऋणभावना प्रत्ययास आली. त्या प्रत्येक क्षणात गावातून निघालेली भव्य मिरवणूक केवळ उत्सवाची नव्हती, तर एका शिक्षकाने आयुष्यभर पेरलेल्या संस्कारांची साक्ष देणारी होती. आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून अनेक पिढ्यांना घडविणारे शंकरराव धनाजी पाटील आज सन्मानाच्या व्यासपीठावर होते. मान्यवरांच्या गौरवोद्गारांत त्यांच्या साधेपणा, शिस्तप्रियता आणि निःस्वार्थ सेवाभावाचे दर्शन घडत होते. या भावनिक क्षणी त्यांच्या अर्धांगिनी नीलम शंकरराव पाटील (माजी शिक्षिका), मोठी बहीण विमलबाई पाटील, लहान बहीण सुशिलाबाई पाटील, मावस बहीण शकुंतलाबाई पाटील, भाऊ ओंकार धनाजी पाटील, शिवाजी धनाजी पाटील, तसेच वहिनी, पुतणे, पुतण्या, सुना आणि नातवंडांनी कुटुंबातील प्रेमाचे वलय अधिक घट्ट केले. तीन पिढ्यांचे नाते एकाच छत्राखाली, एकाच भावनेत एकवटले होते. याप्रसंगी जावई प्रा. डॉ. हेमंत मधुकर पाटील, मानस कन्या सौ. वैशाली हेमंत पाटील,पुतणी सविता पाटील तसेच नातू दिशांत पाटील व नात जीनल पाटील यांनी भावनिक मनोगतातून “आप्पा” या शब्दाचा अर्थ नव्याने उमलविला. यावेळी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अमितदादा पाटील, त्यांचे बंधू अभिजीत पाटील, प्रा. मनोज पाटील सपत्नीक, डी.डी.एस.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापकवर्ग, माजीनगरसेवक राजेंद्र चौधरी, छायाताई दाभाडे, ज्ञानेश्वर आमले, वासुदेव पाटील, शालेय पोषण अधीक्षक जे.डी.पाटीलसाहेब , एरंडोल तालुक्यातील केंद्रप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, तळई गावातील अधिकारी-पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तळई माध्यमिक विद्यालयाचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ट आणि नातलगांनी उपस्थित राहून या क्षणांना साक्षीदार होण्याचा मान मिळवला. भूतो न भविष्यति साजरा केलेला हा अमृत महोत्सव सोहळा हास्य, आनंदाश्रू आणि आठवणींच्या संगमातून प्रत्येकाच्या मनात खोलवर कोरला गेला.या आनंदमयी सोहळ्यात गावपंगतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आनंदराव पाटील यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे अत्यंत ओघवते आणि भावनांना स्पर्श करणारे सूत्रसंचालन तळई माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. शशिकांत पवार सर यांनी केले.

- Ayyub Shaikh ने Aimim Party पर दिया बड़ा बयान1
- नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west1
- पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,1
- Post by Vijay Kidve1
- राजुर टेंभुर्णी रोडवर पिकप पलटी होऊनभीषण अपघातात एक जण ठार सात जण गंभीर जखमी1
- Post by Shahrukh Khan2
- धुळे शिरपूर जळालेल्या कार मध्ये आढळला मानवी सांगडा2
- *🛑याही निवडणुकीत महाशक्तींचा पराभव होणार-- विजय वहाडणे.* *👉विजय वहाडणे यांची पत्रकार परिषद संपन्न1