भाविकांच्या सहभागासाठी समन्वयाने नियोजन करा – अप्पर जिल्हाधिकारी सतिश राऊत *श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर येथे कार्यक्रम* पुणे, दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने खारघर, नवी मुंबई येथे दि. २८ फेब्रुवारी २०२६ व १ मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील भाविकांना घेऊन जाण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी सतिश राऊत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त तुषार बाबर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदाडे, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, पुणे महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ. किरण सोनटक्के, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विनायक साखरे, साहनी चरणजित सिंग तसेच गुरुद्वारा प्रशासकीय प्रमुख व समाज प्रतिनिधी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, जिल्ह्यात कार्यक्रमाच्या माहितीसाठी ठिकठिकाणी फलक उभारावेत. जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी व्यापक प्रसिद्धी व नियोजन करावे. शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करावे. कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांची नावे व संपर्क क्रमांकासह यादी संबंधित गुरुद्वारा प्रशासकीय प्रमुखांनी तयार करून प्रशासनास सादर करावी. तसेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व अन्य संबंधित विभागांनी भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. भाविकांसाठी पुरेशा बसेसची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी, पिण्याचे पाणी, नाश्ता व जेवणाची सोय करण्यात यावी. कार्यक्रमासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना सुरक्षितरित्या ने-आण करण्यासाठी सुयोग्य व शिस्तबद्ध नियोजन करावे, असेही श्री. राऊत यांनी सांगितले. 000

- रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.1
- पुण्यातील बिगवन परिसरातील1
- पुणे : मोहम्मदवाडी परिसरातील तीन गुंठा जागेच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश थोरात यांनी सदर जागेचे खरेदीखत बंद असतानाही विसर पावतीद्वारे व्यवहार सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित जागेवर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात येत असून, मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तींचे वर्चस्व सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिव्हिल प्रकारे त्रास दिला जात असल्याचे सांगत अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी पुणे पोलीस आयुक्त अमितजी कुमार यांच्याकडे धाव घेतली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरण गंभीर असून प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.1
- पुणे करांचा बहु चरचिंत रिंग रोड लवकरच पूर्णतःवास येणार जोरात काम सुरु सर्व अपडेट लवकरच आपल्या समोर येतील1
- Post by Prasad Panchal1
- २२ महिलांची सुटका... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.1
- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहे त्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे शासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे1