महाराजस्व समाधान शिबिरास" नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ सोलापूर, दि.01 -: राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच मा. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत हे "समाधान शिबिर" उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले व शिबिरात 1824 दाखल्यांचे वितरण करण्यात आले . महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान व्हावे व जनतेला एकाच छताखाली विविध विभागाच्या योजनांचा लाभ प्रमाणपत्रे, दाखले, इत्यादी लाभ मिळण्यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन उत्तर तहसील कार्यालयामार्फत अथर्व गार्डन, घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचप्रमाणे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रलंबित फेरफार, 7/12 व ई-3 दुरुस्ती, डिजिटल 7/12, उत्पन्न, जात व रहिवासी दाखले, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र, गावठाण सनद, मुख्यमंत्री बळीराजा योजना, सामाजिक अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, अतिक्रमण नियमितीकरण, जिवंत सातबारा, जन्म-मृत्यू आदेश, सिंधी विशेष अभय योजना, नोंदणी शुल्काबाबत मार्गदर्शन आदी सेवांचा समावेश होता. या शिबिराचा एकूण 1824 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी प्रांत अधिकारी पडदुणे, उत्तर तहसीलदार नीलेश पाटील, नगर सेविका रोहिणी तळवळकर, अमोल बापू शिंदे, संतोषभाऊ पवार, जुबेर बागवान, स्थायी समितीच्या सभापती रंजीताताई चाकोते, डॉ. किरण देशमुख, माजी सभागृहनेते संजय कोळी, छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रमुख राजकुमार पाटील, मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू, मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, तसेच नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध शासकीय कामे एकाच ठिकाणी जलद व सुलभ पद्धतीने मार्गी लागल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.

- फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती. फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती लोणंद शहरात फिरस्त्या मेंढपाळ कुटुंबाचे आगमन झाले असून सर्वत्र शेतामध्ये पिके असल्याने चारा व भूक भागवण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे निदर्शनाला आले सध्या पावसाळा सर्वत्र जिल्ह्यामध्ये असल्याने रात्री अपरात्री शेतामध्ये किंवा माळावर मेंढरास कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे या कुटुंबाचा शासनाने फेरविचार करून बारमाही चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी खास सवलत दिल्यास जीवनाचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे मेंढपाळ कुटुंबाने म्हटले आहे1
- कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे1
- भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- राज ठाकरे यांनी आज पुण्यात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली राज ठाकरे यांनी आज पुण्यात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली1
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी." नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.1