राज्याचे जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने नेर येथे आयोजित केलेल्या भव्य आरोग्य संकल्प अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. २१ रोजी नेहरू महाविद्यालय परिसरात पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १,४५० रुग्णांनी विविध आजारांची तपासणी करून आरोग्य सेवांचा लाभ घेतला. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नेर, दिग्रस आणि दारव्हा परिसरात अशा मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचे शिबिर मा. आरोग्य सेवा समिती यवतमाळ, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. या शिबिरात हृदयविकार, कॅन्सर, स्तन कॅन्सर, यकृत विकार, किडनी आजार, व्हेरिकोज वेन्स, प्लास्टिक सर्जरी, वंधत्व समुपदेशन, हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी अशा विविध आजारांवरील तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरात निदान झालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांवर सावंगी (मेघे) येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना पश्चिम विदर्भ प्रमुख पराग पिंगळे, जीवन पाटील, पवन जयस्वाल, विधानसभा सहसंपर्कप्रमुख भाऊराव ढवळे, नगराध्यक्षा सुनीता जयस्वाल, तालुकाप्रमुख मनोज नाल्हे, नगरसेवक सुभाष भोयर, वैशाली मासाळ, डॉ. सुमित खांदवे, दीपक आडे, अर्चना इसाळकर, पिंटू पाटील खोडे, संकेत सदावर्ते, प्रवीण राठोड, पंकज गुल्हाने, किशोर लोढा, प्रशांत मासाळ, मयूर काळे, इंद्रजीत चव्हाण, रुपेश गुल्हाने, विक्की राऊत, रितेश चिरडे, नागसेन डोंगरे, मनोज सूने, रवींद्र राऊत, दिवाकर ढोके, सुजित कुंभारे, मिथुन राठोड, झुंबरसिंग चव्हाण, रोशन चोपडे, गणेश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक स्वयंसेवकांनीही रुग्ण नोंदणी, मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने वर्षातून दोन ते तीन वेळा अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित केले जाते, ज्यामुळे हजारो गरजू नागरिकांना लाभ मिळतो. 'आरोग्य सेवा हीच खरी लोकसेवा' या भावनेतून राबवण्यात येणारे हे अभियान ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वरदान ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

- गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेली पेडगाव येथील नळ पाणीपुरवठा योजना अखेर मार्गी लागली असून, उद्यापासून ती प्रत्यक्ष सुरू होणार आहे. या योजनेमुळे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता गावकऱ्यांना घरपोच पिण्याचे पाणी मिळणार आहे. अनेक वर्षांपासून पेडगावमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होत असल्याने महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांना पाण्यासाठी खूप धावपळ करावी लागत असे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती, परंतु विविध कारणांमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. गावातील या गंभीर समस्येची दखल घेत पत्रकार विश्वास कुटे यांनी पेडगावच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून नळ योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न म्हणून त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत नळ योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला. नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचेल. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार असून, महिलांच्या श्रमात मोठी बचत होणार आहे. या योजनेचा गावातील आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल. येत्या २२ जून रोजी सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असून, सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून नळाचे पाणी भरून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी पत्रकार विश्वास कुटे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पेडगावच्या विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, पाण्याचा प्रश्न सुटल्याने गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.3
- MIDC परिसरातील 13 थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्तीनामा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.1
- वणी पोलिसांनी शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 19.27 ग्रॅम एम.डी. पावडर आणि मोबाईल फोनसह एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका वेकोली कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, वणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गणेशपूर रोड परिसरात छापा टाकण्यात आला. या छाप्यात कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (28, रा. तेलीफैल, वणी) याच्या झडतीत 1 लाख 34 हजार 890 रुपये किमतीची 19.27 ग्रॅम एम.डी. पावडर आणि 15 हजार रुपयांचा मोबाईल फोन आढळून आला. चौकशीत मेश्रामने ही एम.डी. पावडर प्रज्योत उर्फ कॉकरोच महेश उपरे याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार, दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकारातील यापूर्वी नोंद असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे, ज्यात प्रज्योत महेश उपरे (27), अविनाश विजय पाटील (42) आणि रविंद्र धनराज गुप्ता (34) यांचा समावेश आहे. यामुळे या एम.डी. रॅकेटमधील अटक आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे. अमली पदार्थांच्या या साखळीचा संपूर्ण तपास सुरू असून, पोलीस या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद, सुयोग महापुरे तसेच वणी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1
- बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचाऱ्याकडून पैशांनी भरलेली बॅग लुटून ₹४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी जलद तपास करत एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी आणि चोरीच्या रकमेपैकी ₹३० हजार ५०० रोख असा एकूण ₹१ लाख ५० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रामदास मांडवगणे (वय २४, रा. धामणगाव जुना) हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून, ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत या बालकाने इतर आरोपींची नावे उघड केली, त्यानंतर पोलिसांनी गौरव संजय डोळस (वय २३, रा. आनंदवाडी) याला अटक केली. आरोपींकडून एमएच-२७ बीएन-९१४५ आणि एमएच-४० एएच-७१७३ क्रमांकाच्या दोन दुचाकींसह चोरीच्या रकमेपैकी ₹३०,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश वडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.1
- एआयएमआयएम (AIMIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, "तू थकून जाशील, पण हिंदुस्तानचा मुसलमान थकणार नाही." ओवैसींच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे समर्थक याला मुस्लिम समुदायाच्या धैर्याची आणि हक्कांची भावना व्यक्त करणारा आवाज म्हणून पाहत आहेत, तर विरोधक याला निव्वळ राजकीय वक्तव्य संबोधत आहेत. या विधानामुळे सोशल मीडियावरही जोरदार वादविवाद सुरू झाले आहेत.1
- डॉ. झीशान हुसैन यांनी म्हटले आहे की, हिंदू-मुस्लिम एकजुटीमुळे काँग्रेसने भाजपला पराभूत केले आहे.1
- अकोल्यात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रशासनाच्या भव्य उपक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या हजारोंच्या सहभागातून योगाचा महत्त्वपूर्ण संदेश सर्वत्र पोहोचवण्यात आला.1
- ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी ६ व्या व ७ व्या वर्गांची पटसंख्या २५-३० पर्यंत पोहोचल्यामुळे या दोन्ही वर्गांची वाढ करण्याची मागणी केली आहे.1