चापोलीतील किराणा दुकान फोडून ६२ हजार ८९५ रुपयांचा ऐवज लंपास..अज्ञात चोरट्यांचा मध्यरात्री धाडसी डाव; चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू चाकूर - चाकूर तालुक्यातील चापोली येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री किराणा दुकानाचे कुलूप तोडून तब्बल ६२ हजार ८९५ रुपयांचा किराणा माल व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिंसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर व्यंकट कदम (वय २७, रा. चापोली) यांचे छत्रपती शिवाजी चौक परिसरातील 'आप्पा किराणा स्टोअर्स' हे दुकान आहे. गुरुवारी (दि. ३०) रात्री ९ वाजल्यापासून ते शुक्रवारी (दि. ३१) पहाटे २.४० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.चोरट्यांनी दुकानातील किर्ती गोल्ड खाद्यतेलाचे डबे, तांदळाचे कट्टे, साबुदाणा, काजू, बदाम, खोबरेल तेल, किर्ती गोल्डचे बॉक्स, गोदरेज नं. १ साबण तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६२ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.दरम्यान, चाकूर तालुक्यात सलग घडणाऱ्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीची गस्त अधिक प्रभावी करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी शिवशंकर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं ४१८/२०२६ कलम ३३१(४) व ३०५(अ) बीएनएस अंतर्गत अज्ञातचोरट्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे पुढील तपास करीत आहेत.

- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली. साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली.1