logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्रभर ८ ऑगस्ट २०२६ रोजी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आपली ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

15 hrs ago
user_Datta Falke
Datta Falke
Farmer अंबड, जालना, महाराष्ट्र•
15 hrs ago
bbc3d160-7d9e-4778-8c0f-48ce4dc4f6b2

महाराष्ट्रभर ८ ऑगस्ट २०२६ रोजी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आपली ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरात एका अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकल्याने चुकून काचेचे तुकडे गिळल्याने त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात सुरुवातीला बालकाच्या अन्ननलिकेत काहीतरी अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टरांनी तत्परतेने एक्स-रे, ब्रॉन्कोस्कोपी आणि इसोफॅगोस्कोपी देखील केली, मात्र त्यात कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये बालकाच्या पोटात काचेचे तुकडे असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समोर येताच शल्यचिकित्सा विभागाने तात्काळ शस्त्रक्रिया करून हे काचेचे तुकडे यशस्वीरित्या बाहेर काढले. बालरोग आणि शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी अत्यंत समन्वयाने केलेल्या या उपचारांमुळे बालकाची प्रकृती वेगाने सुधारली. काही दिवसांच्या उपचारानंतर बालक पूर्णपणे धोक्याबाहेर आल्याने डॉक्टरांनी त्याला सुखरूप घरी सोडले आहे. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या या तत्परतेचे आणि कौशल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे।
    1
    छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरात एका अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकल्याने चुकून काचेचे तुकडे गिळल्याने त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात सुरुवातीला बालकाच्या अन्ननलिकेत काहीतरी अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टरांनी तत्परतेने एक्स-रे, ब्रॉन्कोस्कोपी आणि इसोफॅगोस्कोपी देखील केली, मात्र त्यात कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये बालकाच्या पोटात काचेचे तुकडे असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समोर येताच शल्यचिकित्सा विभागाने तात्काळ शस्त्रक्रिया करून हे काचेचे तुकडे यशस्वीरित्या बाहेर काढले.

बालरोग आणि शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी अत्यंत समन्वयाने केलेल्या या उपचारांमुळे बालकाची प्रकृती वेगाने सुधारली. काही दिवसांच्या उपचारानंतर बालक पूर्णपणे धोक्याबाहेर आल्याने डॉक्टरांनी त्याला सुखरूप घरी सोडले आहे. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या या तत्परतेचे आणि कौशल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे।
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
    1
    औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
    user_ARK NEWS 20
    ARK NEWS 20
    Voice of people औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथे १९९० च्या दशकातील डॉन बाबा फर्जंन याच्या घरावर पोलिसांनी रात्री उशिरा मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी डॉनच्या घरातून तब्बल ६,३५० काडतुसे, शस्त्रे, पैसे आणि सोने-चांदी जप्त केली आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली होती. संबंधित डॉन बाबा फर्जंन याचा मागील महिन्यातच डायबेटिजने मृत्यू झाला असून, सध्या पोलिसांनी या कारवाईदरम्यान डॉनच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर येथे १९९० च्या दशकातील डॉन बाबा फर्जंन याच्या घरावर पोलिसांनी रात्री उशिरा मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी डॉनच्या घरातून तब्बल ६,३५० काडतुसे, शस्त्रे, पैसे आणि सोने-चांदी जप्त केली आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली होती. संबंधित डॉन बाबा फर्जंन याचा मागील महिन्यातच डायबेटिजने मृत्यू झाला असून, सध्या पोलिसांनी या कारवाईदरम्यान डॉनच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • फुलंब्री नगरपंचायतीने शहरात धडाकेबाज कामगिरी करत एका विशेष मोहिमेअंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटवली आहेत. नगरपंचायतीच्या या कारवाईमुळे अरुंद रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणचा अनधिकृत ताबा काढण्यात यश आले आहे.
    1
    फुलंब्री नगरपंचायतीने शहरात धडाकेबाज कामगिरी करत एका विशेष मोहिमेअंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटवली आहेत. नगरपंचायतीच्या या कारवाईमुळे अरुंद रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणचा अनधिकृत ताबा काढण्यात यश आले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
    2
    नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले.

स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
    user_Amol kolte press reporter phul
    Amol kolte press reporter phul
    फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांविरुद्ध मंठा पोलिसांनी गुरुवारी, ९ जुलै रोजी धडक मोहीम राबवत दोन स्वतंत्र छापे टाकले. या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली कारवाई सायंकाळी ७:४५ वाजता तळणी येथील 'राहुल किराणा अँड कोल्ड्रिंक्स' या दुकानावर करण्यात आली. या ठिकाणी राहुल बाबन पवार (वय २७, रा. तळणी) याच्याकडून २,८०४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरी कारवाई रात्री ९:०५ वाजता मंठा येथील सुगंधनगरमधील 'जनता किराणा' दुकानात झाली. येथे मेहबूब अली सय्यद (वय ५२, रा. सुगंधनगर) याच्या ताब्यातून ९०० रुपयांचा गोवा गुटखा जप्त करण्यात आला असून, त्याच्यावरही संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मंठा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. भविष्यातही अवैध गुटखा विक्री आणि साठ्याविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करत, नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्याला देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
    1
    महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांविरुद्ध मंठा पोलिसांनी गुरुवारी, ९ जुलै रोजी धडक मोहीम राबवत दोन स्वतंत्र छापे टाकले. या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली कारवाई सायंकाळी ७:४५ वाजता तळणी येथील 'राहुल किराणा अँड कोल्ड्रिंक्स' या दुकानावर करण्यात आली. या ठिकाणी राहुल बाबन पवार (वय २७, रा. तळणी) याच्याकडून २,८०४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरी कारवाई रात्री ९:०५ वाजता मंठा येथील सुगंधनगरमधील 'जनता किराणा' दुकानात झाली. येथे मेहबूब अली सय्यद (वय ५२, रा. सुगंधनगर) याच्या ताब्यातून ९०० रुपयांचा गोवा गुटखा जप्त करण्यात आला असून, त्याच्यावरही संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मंठा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. भविष्यातही अवैध गुटखा विक्री आणि साठ्याविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करत, नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्याला देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत गेल्या दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. या गंभीर समस्येमुळे शाळेतील लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी घरी जावे लागत आहे. विशेष म्हणजे, या शाळेत जिल्हा परिषद सदस्य असतानाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि सोयीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची सुविधा अद्यापही उपलब्ध नसल्याने शाळेतील परिस्थिती बिकट बनली आहे.
    1
    फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत गेल्या दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. या गंभीर समस्येमुळे शाळेतील लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी घरी जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, या शाळेत जिल्हा परिषद सदस्य असतानाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि सोयीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची सुविधा अद्यापही उपलब्ध नसल्याने शाळेतील परिस्थिती बिकट बनली आहे.
    user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अकरम आणि त्यांच्या कुटुंबीयांना एका अज्ञात व्यक्तीकडून एसएमएसद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने तात्काळ पोलिस आयुक्त कार्यालयात भेट देऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. शिष्टमंडळाने पोलिसांकडे मागणी केली आहे की, धमकी देणाऱ्या या अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
    1
    छत्रपती संभाजीनगर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अकरम आणि त्यांच्या कुटुंबीयांना एका अज्ञात व्यक्तीकडून एसएमएसद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने तात्काळ पोलिस आयुक्त कार्यालयात भेट देऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. शिष्टमंडळाने पोलिसांकडे मागणी केली आहे की, धमकी देणाऱ्या या अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.