logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सशक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांमध्ये कायद्याविषयक जागरूकता आवश्यक - न्यायमूर्ती अनिल किलोर नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास बहुमोल असे संविधान दिले. संविधानाने नागरिकांना अधिकार दिले. राज्यघटनेतील तरतुदीनुसार शासकीय योजना आकारास आल्या. यातून प्रत्येकाला विकासाची संधी दिली. या योजना आपल्या विकासाचा मार्ग देणाऱ्या आहेत ही भावना व जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्हावी यासाठी हे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी योजनेचा लाभ घेताना ती यशस्वी व्हावी अशी मनोभूमिका ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले. भिवापूर तालुक्यातील नक्षी येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती प्रफुल्ल खुबाळकर, आमदार संजय मेश्राम, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा, नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. प्रविण उन्हाळे, न्या. एस. जे. लाड, न्या. अंकुश खानोरकर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपस्थित होते. ग्रामीण लोकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच लाभ देण्यासाठी या महामेळाव्याचे आयोजन आहे. आपल्या राज्यघटनेने प्रत्येकाला अधिकार बहाल केले आहेत. आजवर जे न्यायाच्या कक्षेत आले नाहीत त्यांना अशा उपक्रमातून आपल्या समस्या सोडविण्याची संधी मिळते. शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागामार्फत असलेल्या विविध योजना प्रभावीपणे गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचाव्यात असे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी सांगितले. या ठिकाणी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डीपी सुराणा तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांचे कौतुक केले. झुडपी जंगलाचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे आता नक्षीवासीयांना जमिनीचे पट्टे देण्यात येणार आहे आहे त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबाळकर म्हणाले की, गावकऱ्यांना इथेच सर्व सुविधा मिळणार आहेत. योजनांचा प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा लाभही देण्यात येणार आहे. शासनाच्या योजनांची माहिती तळागाळात पोहोचावी असा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर क्राईम, सोशल मीडिया द्वारे होणारी फसवणूक, वित्तहानी यापासून अधिक जागरूकता व दक्षता घेण्यास सांगितले. यावेळी आमदार संजय मेश्राम यांनी सांगितले की, लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यास शासकीय यंत्रणा ही कटिबद्ध आहे. त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी न्यायव्यवस्था, विधी मंडळाचे प्रतिनिधी दक्ष आहेत. असे मेळावे व कार्यक्रम हे कायदेविषयक साक्षरतेसाठी महत्त्वाचे असतात असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात दारूबंदी झाली पाहिजे, त्यामुळे नागरिकांचे जीवन सुलभ होईल, या भागातील रस्ते दुरुस्ती तसेच नवीन भागाना जोडणारे रस्ते पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महामेळाव्यामध्ये ग्रामीण लोकांना इथेच सर्व योजनांची माहिती व योजनांचा प्रातिनिधिक लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले. नागरिकांना विविध योजनांच्या पात्रतानुसार त्यांचे हक्क व लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद समन्वयाने काम करीत आहे. नक्षी व परिसरातील गावांना नदीच्या पुरामुळे फार त्रास सहन करावा लागतो. त्या अनुषंगाने नदीवर संरक्षित भिंत उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. गावकऱ्यांना आपल्या लहान कामासाठी तहसीलच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे आता प्रत्येक गावात आपले सेवा केंद्र उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. झुडपी जंगलांचा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे सोडविण्यात आला असून हजारो हेक्टर जमीन मोकळी होणार आहे. सद्य स्थितीत 565 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे 1996 आधीच्या सर्व जमीनधारकांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे. यातून अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी संवाद साधला. ग्रामीण भागात प्रभावीपणे आरोग्य विषयक विविध सुविधा पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षी येथे नवीन वाचनालय तसेच प्रगत अंगणवाडी सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांनी पोलीस विभागातर्फे हाती घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली. मेळाव्यात पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, ड्रोन, सायकल, श्रावण बाळ योजनेचे प्रमाणपत्र, सनद, शासकीय जमिनीवरील नागरिकांची अतिक्रमने नियमानुकूल करून पट्टे वाटप, बचत गटांना बळीराजा समूह शेती योजनेअंतर्गत प्रातिनिधिक धनादेश याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या महामेळाव्यात विविध विभागाचे सुमारे 40 स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती नागपूर खंडपीठाचे सचिव न्या सुनिल हाके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. प्रविण उन्हाळे, न्या. एस. जे. लाड, तहसीलदार संजय राठोड, गटविकास अधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हयातील न्यायिक अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
12061752-9832-4d2b-91e2-e37cb1d18a55

सशक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांमध्ये कायद्याविषयक जागरूकता आवश्यक - न्यायमूर्ती अनिल किलोर नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास बहुमोल असे संविधान दिले. संविधानाने नागरिकांना अधिकार दिले. राज्यघटनेतील तरतुदीनुसार शासकीय योजना आकारास आल्या. यातून प्रत्येकाला विकासाची संधी दिली. या योजना आपल्या विकासाचा मार्ग देणाऱ्या आहेत ही भावना व जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्हावी यासाठी हे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी योजनेचा लाभ घेताना ती यशस्वी व्हावी अशी मनोभूमिका ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले. भिवापूर तालुक्यातील नक्षी येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती प्रफुल्ल खुबाळकर, आमदार संजय मेश्राम, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष

9ad27956-e55b-4809-a0f8-5d2bd8d0fd77

दिनेश पी. सुराणा, नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. प्रविण उन्हाळे, न्या. एस. जे. लाड, न्या. अंकुश खानोरकर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपस्थित होते. ग्रामीण लोकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच लाभ देण्यासाठी या महामेळाव्याचे आयोजन आहे. आपल्या राज्यघटनेने प्रत्येकाला अधिकार बहाल केले आहेत. आजवर जे न्यायाच्या कक्षेत आले नाहीत त्यांना अशा उपक्रमातून आपल्या समस्या सोडविण्याची संधी मिळते. शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागामार्फत असलेल्या विविध योजना प्रभावीपणे गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचाव्यात असे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी सांगितले. या ठिकाणी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डीपी सुराणा तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांचे कौतुक केले. झुडपी जंगलाचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे आता नक्षीवासीयांना जमिनीचे पट्टे देण्यात येणार आहे आहे त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबाळकर म्हणाले की, गावकऱ्यांना इथेच सर्व सुविधा मिळणार आहेत. योजनांचा प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा

081aab2c-53e8-4ca5-957c-dfc79a705ab2

लाभही देण्यात येणार आहे. शासनाच्या योजनांची माहिती तळागाळात पोहोचावी असा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर क्राईम, सोशल मीडिया द्वारे होणारी फसवणूक, वित्तहानी यापासून अधिक जागरूकता व दक्षता घेण्यास सांगितले. यावेळी आमदार संजय मेश्राम यांनी सांगितले की, लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यास शासकीय यंत्रणा ही कटिबद्ध आहे. त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी न्यायव्यवस्था, विधी मंडळाचे प्रतिनिधी दक्ष आहेत. असे मेळावे व कार्यक्रम हे कायदेविषयक साक्षरतेसाठी महत्त्वाचे असतात असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात दारूबंदी झाली पाहिजे, त्यामुळे नागरिकांचे जीवन सुलभ होईल, या भागातील रस्ते दुरुस्ती तसेच नवीन भागाना जोडणारे रस्ते पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महामेळाव्यामध्ये ग्रामीण लोकांना इथेच सर्व योजनांची माहिती व योजनांचा प्रातिनिधिक लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले. नागरिकांना विविध योजनांच्या पात्रतानुसार त्यांचे हक्क व लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद समन्वयाने काम करीत आहे. नक्षी व परिसरातील गावांना नदीच्या पुरामुळे फार त्रास सहन करावा लागतो. त्या अनुषंगाने नदीवर संरक्षित भिंत उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. गावकऱ्यांना आपल्या लहान कामासाठी तहसीलच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे आता प्रत्येक गावात आपले सेवा केंद्र उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. झुडपी जंगलांचा प्रश्न सुप्रीम

442590a6-4466-46a5-8f37-739fa6be2431

कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे सोडविण्यात आला असून हजारो हेक्टर जमीन मोकळी होणार आहे. सद्य स्थितीत 565 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे 1996 आधीच्या सर्व जमीनधारकांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे. यातून अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी संवाद साधला. ग्रामीण भागात प्रभावीपणे आरोग्य विषयक विविध सुविधा पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षी येथे नवीन वाचनालय तसेच प्रगत अंगणवाडी सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांनी पोलीस विभागातर्फे हाती घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली. मेळाव्यात पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, ड्रोन, सायकल, श्रावण बाळ योजनेचे प्रमाणपत्र, सनद, शासकीय जमिनीवरील नागरिकांची अतिक्रमने नियमानुकूल करून पट्टे वाटप, बचत गटांना बळीराजा समूह शेती योजनेअंतर्गत प्रातिनिधिक धनादेश याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या महामेळाव्यात विविध विभागाचे सुमारे 40 स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती नागपूर खंडपीठाचे सचिव न्या सुनिल हाके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. प्रविण उन्हाळे, न्या. एस. जे. लाड, तहसीलदार संजय राठोड, गटविकास अधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हयातील न्यायिक अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • श्री झेनीथ व सौ विजेता जवादे यांनी केले सर्व भिक्खू संघांना धम्म व अर्थ दान स्व. रामवतार जवादे पुण्यमोदन निमित्त भिक्खु संघातर्फे परित्रण पाठ संपन्न नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर (दि १८) : सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण जवादे यांच्या निवासस्थानी २५ भिक्खूंना चिवरदान करून संपन्न झाले. हा पुण्यमोदनाचा कार्यक्रम कांजी हाऊस चौक बिनाकी मंगलवारी येथील जवादे यांच्या राहत्या घरी संपन्न झाला. स्व. रामवतार जवादे यांच्या पत्नी कुसुम जवादे , सुपुत्र संचालक झेनिथ जवादे व सून सौ विजेता जवादे यांच्या वतीने सर्व भिक्षूंना चिवर दान, धम्म दान करण्यात आले. परित्रण पाठास कुटुंबातील प्रा निलिमा डोंगरे, प्रा मनोज डोंगरे, श्रेयस डोंगरे, श्री राहुल पाटील, सौ पल्लवी पाटील, कु हर्षिता पाटील, श्री अशोक पाटील (मामा) चंद्रपूर, सौ उपासना वासनिक, स्वरा व श्राव्या वासनिक, अशोक गोंडाने, प्रशांत सोमकुवर आदीसह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    3
    श्री झेनीथ व सौ विजेता जवादे यांनी केले  सर्व भिक्खू संघांना धम्म व अर्थ दान
स्व. रामवतार जवादे पुण्यमोदन निमित्त  भिक्खु संघातर्फे परित्रण पाठ संपन्न
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि १८) : सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण जवादे यांच्या निवासस्थानी २५ भिक्खूंना चिवरदान करून संपन्न झाले. हा पुण्यमोदनाचा कार्यक्रम कांजी हाऊस चौक बिनाकी मंगलवारी येथील जवादे यांच्या राहत्या घरी संपन्न झाला.
स्व. रामवतार जवादे यांच्या पत्नी कुसुम जवादे , सुपुत्र संचालक झेनिथ जवादे व सून सौ विजेता जवादे यांच्या वतीने सर्व भिक्षूंना चिवर दान, धम्म दान करण्यात आले. परित्रण पाठास कुटुंबातील प्रा निलिमा डोंगरे, प्रा मनोज डोंगरे, श्रेयस डोंगरे, श्री राहुल पाटील, सौ पल्लवी पाटील, कु हर्षिता पाटील, श्री अशोक पाटील (मामा) चंद्रपूर, सौ उपासना वासनिक, स्वरा व श्राव्या वासनिक, अशोक गोंडाने, प्रशांत सोमकुवर आदीसह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    1
    Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    user_Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Nagpur (Urban), Maharashtra•
    14 hrs ago
  • पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन
    1
    पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    Nagpur (Rural), Maharashtra•
    20 hrs ago
  • There are two types of Energy inside Negative & Positive
    1
    There are two types of Energy inside Negative & Positive
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कुही तालुक्यात भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार मदनापूर फाट्याजवळील दुर्घटनेने परिसरात हळहळ कुही(शरद शहारे):- कुही तालुक्यात मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास मदनापूर फाट्याजवळ भीषण रस्ता अपघात घडून एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी वाहन क्रमांक MH 38 0492 यांनी दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार उज्ज्वल ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४, रा. मांढळ, ता. कुही) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात चारचाकी वाहनाच्या उजव्या बाजूचा टायर फुटल्याने. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालकाच्या ठोठावरील दुखापत झाली आहे. जखमी चालकाला उपचारासाठी कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास वेलतूर पोलीस स्टेशनं चे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनिराम भुरे, अवी मस्के व इतर सहकारी करीत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे मांढळ परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी मदनापूर फाट्याजवळ वेगमर्यादा व वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
    7
    कुही तालुक्यात भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
मदनापूर फाट्याजवळील दुर्घटनेने परिसरात हळहळ
कुही(शरद शहारे):- 
कुही तालुक्यात मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास मदनापूर फाट्याजवळ भीषण रस्ता अपघात घडून एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी वाहन क्रमांक MH 38 0492 यांनी दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार उज्ज्वल ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४, रा. मांढळ, ता. कुही) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
अपघातात चारचाकी वाहनाच्या उजव्या बाजूचा टायर फुटल्याने. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालकाच्या ठोठावरील दुखापत झाली आहे. जखमी चालकाला उपचारासाठी कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास वेलतूर पोलीस स्टेशनं चे ठाणेदार  प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनिराम भुरे, अवी मस्के व इतर सहकारी करीत आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे मांढळ परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी मदनापूर फाट्याजवळ वेगमर्यादा व वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सालों की तपस्या के बाद बना अतरार घाट पुल, पर आवाजाही पर लगा 'अफ़सरशाही' का ताला; #Aurai #virals #short #videos #BiharNews #viralshorts #worldmedianews #aakashpriyadarshi
    1
    सालों की तपस्या के बाद बना अतरार घाट पुल, पर आवाजाही पर लगा 'अफ़सरशाही' का ताला;
#Aurai #virals #short #videos #BiharNews #viralshorts #worldmedianews #aakashpriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    31 min ago
  • जवादे यांच्या निवासस्थानी भिक्खु संघाचे आगमन भोजनानंतर परित्रण पाठास होणार प्रारंभ नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर (दि १८) : उत्तर नागपुरातील सेंट रिंझाई पब्लिक स्कूल, कांजी हाऊस बिनाकी मंगलवारी येथील स्कूल चे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण असल्याने संचालक झेनिथ जवादे यांच्या घरी भिक्खु संघाचे आगमन झाले
    1
    जवादे यांच्या निवासस्थानी भिक्खु संघाचे आगमन
भोजनानंतर परित्रण पाठास होणार प्रारंभ
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि १८) : उत्तर नागपुरातील सेंट रिंझाई पब्लिक स्कूल, कांजी हाऊस बिनाकी मंगलवारी येथील स्कूल चे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण असल्याने संचालक झेनिथ जवादे यांच्या घरी भिक्खु संघाचे आगमन झाले
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.