कर्जतमध्ये दिंडीला भीषण अपघात ; १ ठार, चौघे गंभीर जखमी आज रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. अहिल्यानगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील निमगाव डाकूजवळ हा भीषण अपघात झाला. पंढरपूरच्या दिशेने पायी चाललेल्या दिंडीतील वारकऱ्यांना अज्ञात वाहनाने धडक देऊन हा अपघात झाला. दिंडीतील लोक हे नगर तालुक्यातील कवडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मयत झालेल्या महिलेचे नाव पंकाबाई किसन पवार, वय ६३ वर्षे असे आहे. तर जखमींमध्ये मारुती सोनाजी लिपणे, वय ६७, बबन शिंगाडे, वय ७०, बाबासाहेब बाप्पाजी सांगोळे, वय ६५ व अन्य एका महिलेचा समावेश आहे. कर्जत पोलिसांनी तात्काळ अपघात स्थळी भेट दिली. अपघातानंतर रुग्णांना मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेसह १०८ ॲम्बुलन्समधून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

- Post by कर्जत लाईव्ह1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- Post by Vijay Meher1
- hajaron logon ka nuksan ho gaya hai please kripya kisanon ka madad Karen aap log kisanon ka khet mein Aag lag Gaya Bhari bharkar nuksan ho gaya hai nuksan ke Karan Kisan log pareshan hai unki madad karne ke liye yah news Dala gaya hai2
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसुटी येथे दोन पिंजऱ्यात दोन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान, काल पिंपळसुटी येथे लावलेल्या दोन पिंजऱ्यात दोन बिबट जेरबंद झाले .नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे असून दोन्ही बिबटे माणिकडोह या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.ही दोन्ही बिबटे एकाच मादीचे पिल्ले असून त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात जे्रबंद करण्यात आले होते नंतर यादोन्ही बिबट्याना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या दोन्ही बिबटयाना माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.4
- Post by AapTak Hindi News Channel1
- Post by Vijay Meher1