logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक:*माझी वसुंधरा ५.० अंतर्गत ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर* *दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात लासलगाव ग्रामपंचायतीचा राज्यात ५ वा तर विभागात प्रथम क्रमांक* *लासलगाव, :-* माझी वसुंधरा ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण व शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १०,००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या गटात लासलगाव ग्रामपंचायतीने राज्य स्तरावर ५ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून ग्रामपंचायतीस ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये हरित आच्छादन वाढविणे, जलसंवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त अभियान, सौरऊर्जेचा वापर, स्वच्छता मोहिमा व जनजागृती यांसारख्या विविध घटकांवर गुणांकन करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये लासलगाव ग्रामपंचायतीने सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध व परिणामकारक कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणा, सौरऊर्जेवरील दिवे बसविणे, तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या उपक्रमांमुळे लासलगाव गाव शाश्वत विकासाच्या दिशेने आदर्श ठरत आहे. *बक्षीसाच्या रकमेतून प्रस्तावित विकासकामे* ५० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेचा विनियोग पर्यावरणपूरक व शाश्वत विकास प्रकल्पांसाठी करण्यात येणार असून त्यामध्ये पुढील कामांना प्राधान्य देण्यात येईल यामध्ये... १) हरित आच्छादन वाढविणे – मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण, स्मृतीवन, सार्वजनिक उद्याने २) विद्यमान हरित क्षेत्रांचे संवर्धन व देखभाल ३) रोपवाटिका निर्मिती ४) जलसंवर्धन व परकोलेशन प्रकल्प ५) रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम ६) नदी, तळे व नाल्यांचे पुनर्जीवन ७) नूतनीकरणयोग्य ऊर्जा वापरास प्रोत्साहन ८) सौरऊर्जेवरील / एलईडी दिव्यांची उभारणी ९) स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणा १०) पर्यावरण जनजागृती व स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण प्रतिक्रिया “१०,००० पेक्षा अधिक लोकसंख्या गटात लासलगाव ग्रामपंचायतीने राज्यात ५ वा व विभागात प्रथम क्रमांक मिळवून ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळवले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ग्रामस्थांचा सहभाग, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे नियोजनबद्ध प्रयत्न यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यातही लासलगाव पर्यावरण संवर्धनात आदर्श ठरेल, असा विश्वास आहे. या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील,उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन. *छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य* पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. लासलगाव ग्रामपंचायतीने दाखविलेली एकजूट आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे हे यश मिळाले आहे. ५० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेतून आणखी पर्यावरणपूरक व विकासाभिमुख प्रकल्प राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. *समीर भुजबळ, माजी खासदार*

18 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
18 hrs ago
81fa1a2e-5243-43a0-88e5-b6e22ad4d685

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खबर महाराष्ट्र नाशिक से अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे। रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं
    2
    खबर महाराष्ट्र 
नाशिक से 
अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक  पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे।  रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by VK ONLINE INFORMATION
    10
    Post by VK ONLINE INFORMATION
    user_VK ONLINE INFORMATION
    VK ONLINE INFORMATION
    Graphic designer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड! ​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार.... शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ​निवडणूक प्रक्रिया व घोषणा ​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. ​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा ​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. ​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे ​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू." ​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ ​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    4
    येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड!
​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार....
शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
​निवडणूक प्रक्रिया व घोषणा
​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा
​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे
​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ
​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मोदीजी समाज को बाटो समाज मे फुट डालो आखिर मोदी जी ऐसा क्यू कह रहे है क्या सच सामने आ रहा है क्या अंदर की बात मन की बात बहार आ रही है कमेंट मे जरूर बताये आपका क्या विचार है इस पर
    1
    मोदीजी समाज को बाटो समाज मे फुट डालो आखिर मोदी जी ऐसा क्यू कह रहे है क्या सच सामने आ रहा है क्या अंदर की बात मन की बात बहार आ रही है कमेंट मे जरूर बताये आपका क्या विचार है इस पर
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by आबासाहेब साठे
    2
    Post by आबासाहेब साठे
    user_आबासाहेब साठे
    आबासाहेब साठे
    Local Politician Ulhasnagar, Thane•
    9 hrs ago
  • Post by Narendra singh
    1
    Post by Narendra singh
    user_Narendra singh
    Narendra singh
    Gutter Cleaning Service भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    38 min ago
  • Post by Narendra singh
    5
    Post by Narendra singh
    user_Narendra singh
    Narendra singh
    Gutter Cleaning Service भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    51 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.