विलासराव जाधव यांची भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवासी तथा आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे निकटवर्तीय विलासराव जाधव यांची भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सेनगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली. भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताक आणि किसान मोर्चाचे प्रभारी आमदार संजय कुटे यांच्या स्वाक्षरीने जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. विलासराव जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम करीत आहेत. प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी तसेच पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी या पदाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जाधव यांच्या नियुक्तीबद्दल माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, खासदार रामराव वडकुते, फुलाजी शिंदे, के. के. शिंदे, बाबाराव बांगर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी अभिनंदन केले आहे.भाजपा किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, किसान मोर्चाचे प्रभारी तसेच आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, सेनगाव तालुक्यासह जिल्ह्यात भाजपा किसान मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठीही कार्य करणार असल्याचे विलासराव जाधव यांनी सांगितले.

- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes1
- कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .1