श्री क्षेत्र बाबीर देवस्थानला ब दर्जासह शंभर एकर जमीन उपलब्ध करून द्यावी : डॉ. आकाश कांबळे देवस्थान विकासासाठी पर्यटन विकास आराखड्याला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्याची मागणी इंदापूर प्रतिनिधी ता.15 बातमीदार गणेश कांबळे श्री क्षेत्र बाबीर देवस्थान गडावरील मंदिराच्या जीर्णोद्धार व कलशारोहण लोकार्पण सोहळा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते (दि.13) सेप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी आपल्या भाषणातून श्री क्षेत्र बाबीर देवस्थानच्या सर्वांगीण विकासा साठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. डॉ. कांबळे यांनी सांगितले की, भगवान बाबा गडाच्या विकासासाठी राज्य शासनाने ज्या पद्धतीने निर्णय घेतला, त्याच धर्तीवर वन जमिनीमधून शंभर एकर जमीन ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी. तसेच श्री क्षेत्र बाबीर देवस्थानला सध्या असलेल्या क दर्जाऐवजी ब दर्जा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. देवस्थानला ब दर्जा प्राप्त झाल्यास राज्य शासना कडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने निरा नरसिंहपूर देवस्थानचा विकास व कायापालट केला त्याच धर्तीवर श्री क्षेत्र बाबीर देवस्थानचा देखील सर्वांगीण विकास करणे शक्य होईल असे डॉ. आकाश कांबळे यांनी नमूद केले.पर्यटन विकास आराखड्यास मंजुरीची मागणी श्री बाबीर देवस्थान परिसरातील सुशोभीकरण, भाविकांसाठी भक्तनिवास, गेस्ट हाऊस तसेच विविध मूलभूत व पर्यटन विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या श्री बाबीर देवस्थान पर्यटन विकास आराखड्याला येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात यावी अशी मागणी डॉ. कांबळे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. यापूर्वी बाबीर देवस्थानच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी मिळाली होती त्यासाठी सन २०१७-१८ मध्ये ५५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता तसेच काही दिवसांन पूर्वी देखील पर्यटन विकास महामंडळाने १.६८ लाख रूपये इतक्या रकमेची मंजुरी दिली आहे परंतु निधी अभावी आराखडा रखडला आहे अशी माहिती डॉ. कांबळे यांनी दिली. मात्र, देवस्थान क दर्जामध्ये असल्यामुळे निधी उपलब्ध होण्यात अनेक अडचणी येत आहेत.त्यामुळे देवस्थानला ब दर्जा मिळाल्यास निधी व आवश्यक सुख सुविधा जलदगतीने उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. देवस्थान कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पाच कोटींच्या निधीची मागणी बाबीर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडकवासला कालवा असून, कालव्यावरील पूल अरुंद असल्याने भाविक व नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारे पत्र देण्यात आले असल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले. या कामासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली.तसेच हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, प्रविण माने यांनी देखील आपल्या भाषणामधून वरील विषया संदर्भात आपल्या भाषणामधून प्रतिसाद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची अनुकूलता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आपल्या भाषणातून डॉ.आकाश कांबळे यांनी मांडलेल्या विविध मागण्या बाबत अनुकूलता दर्शविली. श्री क्षेत्र बाबीर देवस्थानच्या विकासासंदर्भातील जमीन दर्जा वाढ, पर्यटन विकास आराखडा व रस्त्याच्या प्रश्नासह विविध विषय मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार यशवंत माने, प्रवीण भैय्या माने, प्रदीप गारटकर, डॉ. सुधीर तांबे, बुवाजी पुणेकर महाराज, आमोल भिसे, यशवंत कचरे, विष्णू मारकड, नाना थोरात, बाळासाहेब भगत, तानाजी मारकड, आबासाहेब थोरात, ॲड. अमरसिंह मारकड, संदीपान लावंड रुई ग्रामपंचायतचे प्रशासक संजीव मारकड यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन नीलेश धापटे यांनी केले.

- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांचा शहरात रूट मोर्चा1
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- देश भरात लाडक्या बाप्पाचे आगमन चिमुकली आपल्या बाप्पा ला घरी आणताना वायरल...1