अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘यलो अलर्ट’ ; नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभाग यांनी निर्गमित केलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात दि. २ व ३ एप्रिल २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’जारी करण्यात आला आहे. तसेच दि. ४ एप्रिल २०२६ रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली थांबू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये; विद्युतवाहक वस्तूंना स्पर्श टाळावा.मोकळी मैदाने, टॉवर्स, विद्युत खांब, धातूची कुंपणे, ट्रान्सफॉर्मर यांपासून दूर राहावे.जाहिरात फलक (होर्डिंग्ज) जवळ थांबू नये; कोसळण्याचा धोका संभवतो.मोकळ्या जागेत अडकले असल्यास गुडघ्यावर बसून डोके खाली झाकून घ्यावे व जमिनीशी कमी संपर्क ठेवावा.धरण, नदी, कालवे येथे पर्यटनासाठी जाताना विशेष काळजी घ्यावी; पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये.शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान टाळण्यासाठी शेतीमालाचे योग्य नियोजन करावे.बाजारात आणलेला किंवा साठवलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४/ २३५६९४० वर संपर्क साधावा. वादळ, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews1
- पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Maharashtra 18 news1
- Post by कर्जत लाईव्ह1