logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका.... तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त... bhandara :- भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे.भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...

8 hrs ago
user_A K
A K
भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
8 hrs ago

तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका.... तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त... bhandara :- भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे.भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साकोली तालुक्यातील सुदरी येथील तलाव फूटला साकोली :- साकोली तहसील के अंतर्गत आने वाले सुंदरी ग्राम में बीती रात हुई तेज बारिश ने किसानों पर कहर बरपा दिया। ग्राम के तालाब की पार (बांध) टूट जाने से करीब 20 से 25 हेक्टेयर में लगी धान की फसल पूरी तरह बर्बाद हो गई। इस घटना से 8 से 9 किसानों को भारी आर्थिक नुकसान उठाना पड़ा है। प्राप्त जानकारी के अनुसार, सुंदरी ग्राम के सर्वे क्रमांक 47, 48 और 49 स्थित तालाब की पार बीती रात अचानक हुई झमाझम बारिश के कारण टूट गई। पार टूटने के बाद तालाब का पानी और मिट्टी तेजी से खेतों में बह गई, जिससे धान की खड़ी फसल पूरी तरह नष्ट हो गई। देखते ही देखते किसानों की महीनों की मेहनत पर पानी फिर गया। इस प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों में विजय झोडे, योगेंद्र झोडे, अरविंद झोडे, देवराम झोडे, धीरज झोडे तथा शिवशंभू झोडे सहित अन्य किसान शामिल हैं। किसानों ने बताया कि इस वर्ष पहले ही अपेक्षा से कम बारिश होने के कारण वे चिंतित थे, और अब अचानक हुई तेज बारिश ने उनकी बची-खुची उम्मीद भी खत्म कर दी। घटना के बाद सुंदरी ग्राम पंचायत से किसानों ने मांग की है कि नुकसानग्रस्त फसलों का तत्काल पंचनामा किया जाए और उन्हें उचित मुआवजा प्रदान किया जाए। साथ ही तालाब की टूटी हुई पार की मरम्मत के लिए शासन स्तर पर निधि मंजूर कर जल्द से जल्द दुरुस्ती कार्य कराया जाए, ताकि भविष्य में ऐसी घटनाओं से बचा जा सके। किसानों का कहना है कि यदि समय रहते तालाब की पार
    1
    साकोली तालुक्यातील सुदरी येथील तलाव फूटला 

साकोली :- साकोली तहसील के अंतर्गत आने वाले सुंदरी ग्राम में बीती रात हुई तेज बारिश ने किसानों पर कहर बरपा दिया। ग्राम के तालाब की पार (बांध) टूट जाने से करीब 20 से 25 हेक्टेयर में लगी धान की फसल पूरी तरह बर्बाद हो गई। इस घटना से 8 से 9 किसानों को भारी आर्थिक नुकसान उठाना पड़ा है।

प्राप्त जानकारी के अनुसार, सुंदरी ग्राम के सर्वे क्रमांक 47, 48 और 49 स्थित तालाब की पार बीती रात अचानक हुई झमाझम बारिश के कारण टूट गई। पार टूटने के बाद तालाब का पानी और मिट्टी तेजी से खेतों में बह गई, जिससे धान की खड़ी फसल पूरी तरह नष्ट हो गई। देखते ही देखते किसानों की महीनों की मेहनत पर पानी फिर गया।

इस प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों में विजय झोडे, योगेंद्र झोडे, अरविंद झोडे, देवराम झोडे, धीरज झोडे तथा शिवशंभू झोडे सहित अन्य किसान शामिल हैं। किसानों ने बताया कि इस वर्ष पहले ही अपेक्षा से कम बारिश होने के कारण वे चिंतित थे, और अब अचानक हुई तेज बारिश ने उनकी बची-खुची उम्मीद भी खत्म कर दी।

घटना के बाद सुंदरी ग्राम पंचायत से किसानों ने मांग की है कि नुकसानग्रस्त फसलों का तत्काल पंचनामा किया जाए और उन्हें उचित मुआवजा प्रदान किया जाए। साथ ही तालाब की टूटी हुई पार की मरम्मत के लिए शासन स्तर पर निधि मंजूर कर जल्द से जल्द दुरुस्ती कार्य कराया जाए, ताकि भविष्य में ऐसी घटनाओं से बचा जा सके।

किसानों का कहना है कि यदि समय रहते तालाब की पार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    1
    दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक

दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली.
या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते.
ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    14 min ago
  • नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली
    1
    नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नागपुरात मंगळवारी जोरदार पाऊस , नागपूर महानगर पालिकेचा पुन्हा भोंगड कारभार उघड , नाली सफाईछे काम.अपूर्ण नागपुरात मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस रस्ते जलमय् , रस्ते आणी पूल यांच्या कामामुळे बऱ्याच भागात वाहतूक कोंडी नागरिकांना प्रचंड त्रास
    1
    नागपुरात मंगळवारी जोरदार पाऊस , नागपूर महानगर पालिकेचा पुन्हा भोंगड कारभार उघड , नाली सफाईछे काम.अपूर्ण
नागपुरात मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस 
रस्ते जलमय् , रस्ते आणी पूल यांच्या कामामुळे बऱ्याच भागात वाहतूक कोंडी
नागरिकांना प्रचंड त्रास
    user_Sachin Ukey
    Sachin Ukey
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
    1
    रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती
प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन
भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी )
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न
प्रादेशिक परिवहन अधिकारी  रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच  कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक  प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन  संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    1
    आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    9 min ago
  • सेंदूरवाफा टोलनाक्यावर पोलिसांची धडक कारवाई 199 किलो गांजासह ट्रक जप्त; बिहार व पश्चिम बंगालमधील दोन आरोपी ताब्यात 1 कोटी 34 लाख 78 हजारांचा गांजा एसपी नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसरी मोठी कारवाई; राष्ट्रीय महामार्गावरील अमली पदार्थ तस्करीला पोलिसांचा मोठा दणका साकोली : ओडिशा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकमधून तब्बल 199.560 किलो गांजा जप्त करून कोटी 34 लाख 78 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी साकोली पोलिसांनी केली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदूरवाफा टोलनाक्यावर राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत बिहार व पश्चिम बंगालमधील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात 245 किलो गांजा जप्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत झालेली ही दूसरी मोठीसाकोली पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 606/2026 अन्वये कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) एनडीपीएस अॅक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक किशोर अरुण मानकर (वय 36) असून त्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीसांना 27 जुलैच्या पहाटे ओडिशा राज्यातून गांजाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक WB 23 F8785) रायपूर-राजनांदगाव-देवरी-साकोली राष्ट्रीय महामार्ग मार्गे नागपूरकडे जात असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदूरवाफा टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला.पहाटे सुमारे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान संशयित ट्रक अडवून त्याची पंचांसमक्ष कायदेशीर तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला 199.560 किलो गांजा आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 9 लाख 78 हजार इतकी असून ट्रकची किंमत 35 लाख असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे एकूण कोटी 34 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत ट्रक चालक पंकजकुमार भुषण यादव (वय 30, रा. खुजहटिता, मांजी, जिल्हा छपरा, बिहार) तसेच क्लीनर बापी बादल मालीक (वय 38, रा. नवग्राम, जमालपुर थाना, जिल्हा वर्धमान, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत करीत आहेत. या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी साकोली पोलीस ठाण्यास भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करुन अमली पदार्थांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे, 30 जून 2026 रोजीही साकोली पोलिसांनी मुंबई नार्कोटिक्स विभागाच्या सहकार्याने सेंदूरवाफा टोलनाक्यावर मोठी कारवाई करून 245 किलो गांजा जप्त केला होता. ओडिशाहून नागपूरकडे निघालेल्या आयशर ट्रकमधील कॅरेटच्या खाली अत्यंत चतुराईने लपवून ठेवलेला हा अमली पदार्थ पोलिसांनी शोधून काढला होता. त्या प्रकरणातही चालक व क्लीनरला ताब्यात घेण्यात आले होते. सलग दोन मोठ्या कारवायांमुळे राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात साकोली पोलीस प्रभावीपणे काम करत असल्याचे अधोरेखित झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अमली पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी साकोली पोलीस सातत्याने गुप्त माहिती संकलन, नाकाबंदी व तपास मोहिमा राबवत आहेत. त्यामुळे तस्करांचे मोठे जाळे उद्ध्वस्त होण्यास मदत होत असून समाजाला घातक असलेल्या अमली पदार्थांच्या साखळीवर प्रभावी प्रहार होत आहे. वरिष्ठांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस करत असलेली ही कारवाई जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच मार्गदर्शनाखाली सपोनि जितेंद्र राऊत, पोउपनि किशोर भपोउपनि अर्जुन बेडवाल, पोलीस हवालदार स्वप्नील गोस्वामी तसेच पोलीस अंमलदार नरेंद्र झलके, सचिन राऊत, टेकचंद बुरडे आणि धनविजय गणवीर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
    1
    सेंदूरवाफा टोलनाक्यावर पोलिसांची धडक कारवाई

199 किलो गांजासह ट्रक जप्त; बिहार व पश्चिम बंगालमधील दोन आरोपी ताब्यात

1 कोटी 34 लाख 78 हजारांचा गांजा

एसपी नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसरी मोठी कारवाई; राष्ट्रीय महामार्गावरील अमली पदार्थ तस्करीला पोलिसांचा मोठा दणका
साकोली : ओडिशा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकमधून तब्बल 199.560 किलो गांजा जप्त करून कोटी 34 लाख 78 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी साकोली पोलिसांनी केली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदूरवाफा टोलनाक्यावर राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत बिहार व पश्चिम बंगालमधील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात 245 किलो गांजा जप्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत झालेली ही दूसरी मोठीसाकोली पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 606/2026 अन्वये कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) एनडीपीएस अॅक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक किशोर अरुण मानकर (वय 36) असून त्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलीसांना 27 जुलैच्या पहाटे ओडिशा राज्यातून गांजाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक WB 23 F8785) रायपूर-राजनांदगाव-देवरी-साकोली राष्ट्रीय महामार्ग मार्गे नागपूरकडे जात असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदूरवाफा टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला.पहाटे सुमारे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान संशयित ट्रक अडवून त्याची पंचांसमक्ष कायदेशीर तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला 199.560 किलो गांजा आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 9 लाख 78 हजार इतकी असून ट्रकची किंमत 35 लाख असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे एकूण कोटी 34 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत ट्रक चालक पंकजकुमार भुषण यादव (वय 30, रा. खुजहटिता, मांजी, जिल्हा छपरा, बिहार) तसेच क्लीनर बापी बादल मालीक (वय 38, रा. नवग्राम, जमालपुर थाना, जिल्हा वर्धमान, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत करीत आहेत.

या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी साकोली पोलीस ठाण्यास भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करुन अमली पदार्थांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे, 30 जून 2026 रोजीही साकोली पोलिसांनी मुंबई नार्कोटिक्स विभागाच्या सहकार्याने सेंदूरवाफा टोलनाक्यावर मोठी कारवाई करून 245 किलो गांजा जप्त केला होता. ओडिशाहून नागपूरकडे निघालेल्या आयशर ट्रकमधील कॅरेटच्या खाली अत्यंत चतुराईने लपवून ठेवलेला हा अमली पदार्थ पोलिसांनी शोधून काढला होता. त्या प्रकरणातही चालक व क्लीनरला ताब्यात घेण्यात आले होते. सलग दोन मोठ्या कारवायांमुळे राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात साकोली पोलीस प्रभावीपणे काम करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील अमली पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी साकोली पोलीस सातत्याने गुप्त माहिती संकलन, नाकाबंदी व तपास मोहिमा राबवत आहेत. त्यामुळे तस्करांचे मोठे जाळे उद्ध्वस्त होण्यास मदत होत असून समाजाला घातक असलेल्या अमली पदार्थांच्या साखळीवर प्रभावी प्रहार होत आहे. वरिष्ठांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस करत असलेली ही कारवाई जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच मार्गदर्शनाखाली सपोनि जितेंद्र राऊत, पोउपनि किशोर भपोउपनि अर्जुन बेडवाल, पोलीस हवालदार स्वप्नील गोस्वामी तसेच पोलीस अंमलदार नरेंद्र झलके, सचिन राऊत, टेकचंद बुरडे आणि धनविजय गणवीर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)
    1
    नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल

नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल
नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है।
पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई।
इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया।
मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी
इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी।
प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)—
हत्या (Murder)
हत्या का प्रयास (Attempt to Murder)
धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना
भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं
आधिकारिक प्रतिक्रिया :-
एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी।
जांच जारी :- 
घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा।
Vande Bharat News TV 24
Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief
(नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • निवी निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार निवी संदीप निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विशेष गौरव भिवापूर । उमरेड भिवापूर येथील केडीके इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. निवी संदीप निंबार्ते हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करून भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिने डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय चलनी नोटांच्या सर्व सहा मूल्यवर्गांवरील सिरीयल क्रमांक अवघ्या 29 सेकंदांत अचूक ओळखून वाचण्याचा अनोखा विक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली असून तिच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कौशल्याचे विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी विशेष कौतुक केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर येथे डाँ, किरण मिडब्रेन ॲकडमी आयोजित India World Record Felicitation Ceremony 2026 मध्ये भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते निवीला प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास श्रीमंत मुधोजी महाराज भोसले नागपूर, मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नागपूर तसेच डॉ. सुलक्षणा भोयर प्राचार्या, नारायणा ई-टेक्नो स्कूल, नागपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवीच्या असामान्य बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवीने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे डॉ. काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, अकादमीचे प्रशिक्षण तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल केडीके इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. किरण मिडब्रेन ॲकडमी चे संचालक डॉ. किरण पवन काकडे, तसेच निवीचे पालक श्री. संदीप निंबार्ते व सौ. किर्ती निंबार्ते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, निवीच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर केडीके इंटरनॅशनल स्कुल, भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे." राजीव पोतदार यांनी केले कौतुक विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांनी घरी भेट देत कु.निवीच्या अनोख्या कामागिरीचे कौतुक केले.
    1
    निवी निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार
निवी संदीप निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री  नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विशेष गौरव
भिवापूर । उमरेड
भिवापूर येथील केडीके इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. निवी संदीप निंबार्ते हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करून भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.
कु. निवी संदीप निंबार्ते हिने डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय चलनी नोटांच्या सर्व सहा मूल्यवर्गांवरील सिरीयल क्रमांक अवघ्या 29 सेकंदांत अचूक ओळखून वाचण्याचा अनोखा विक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली असून तिच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कौशल्याचे विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी विशेष कौतुक केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर येथे डाँ, किरण मिडब्रेन ॲकडमी आयोजित India World Record Felicitation Ceremony 2026 मध्ये भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते निवीला प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास श्रीमंत मुधोजी महाराज भोसले नागपूर,  मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नागपूर तसेच डॉ. सुलक्षणा भोयर प्राचार्या, नारायणा ई-टेक्नो स्कूल, नागपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवीच्या असामान्य बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
संचालक डॉ. किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवीने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे डॉ. काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, अकादमीचे प्रशिक्षण तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले.
या यशाबद्दल केडीके इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. किरण मिडब्रेन ॲकडमी चे संचालक डॉ. किरण पवन काकडे, तसेच निवीचे पालक श्री. संदीप निंबार्ते व सौ. किर्ती निंबार्ते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, निवीच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कु. निवी संदीप निंबार्ते हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर केडीके इंटरनॅशनल स्कुल, भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे."
राजीव पोतदार यांनी केले कौतुक
विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांनी घरी भेट देत कु.निवीच्या अनोख्या कामागिरीचे कौतुक केले.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.