logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लोहा तालुक्यात शेवडी (बा) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न. नांदेड दि. 18 एप्रिल :- सामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने लोहा तालुक्यात चौथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर लोहा तालुक्यात शेवडी (बा) येथे नुकतेच संपन्न झाले. आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ घेतला. शासन नागरिकांच्या दारी येऊन त्यांच्या समस्या सोडवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. समाधान शिबिरामुळे नागरिकांचा वेळ व पैसे दोन्ही वाचला आहे, असे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मार्गदर्शन करून शिबिरातील विविध स्टॉला भेटी दिल्या. कामकाजाची पाहणी केली व त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने व उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेवडी (बा) येथे आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये महसूल,कृषी,आरोग्य,पंचायत समिती, भूमी अभिलेख, जि.प.बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक, पशुधन विकास तसेच शिक्षण विभाग अशा विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या आपापल्या विभागातील विविध योजनांची सविस्तर माहिती देत लाभार्थ्याकडून अर्ज स्वीकारले. तहसील कार्यालय लोहा यांच्यावतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये ऑनलाईन सातबारा उतारे व आठ-अ उतारे फेरफार उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 20 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय 7/12 व फेरफार, 16 नवीन शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले तसेच शिधापत्रिका दुरुस्त्या संदर्भातील 30 अर्जही स्वीकारण्यात आले. शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असे एकूण 13 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, या अभियानांतर्गत जिवंत 7/12 मोहिमेंतर्गत अद्यावत अभिलेख उपलब्ध करून देण्यात आले, 8-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या. तहसिलदार परळीकर यांनी प्रास्ताविकात अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार निळकंठ पांडागळे ग्रा.म. अधिकारी यांनी केले. याप्रसंगी महसूल विभागाचे अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शेवडी (बा) चे मंडळ अधिकारी के. बी. रेणके, ग्राम महसूल अधिकारी उमाकांत भांगे, मोतीराम पवार, मुर्गेश नाडार, सचिन नरवाडे, निळकंठ पांडागळे, नेताजी रायाजी, कैलास बोधगिरे, निखील सुंदरगिरवार, महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भुवनेश्वर विभुते तसेच कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, महसूल सेवक यांनी उपस्थित राहून या अभियानास सहकार्य केले. नायब तहसिलदार राजेश पाठक, संदीप हाडगे, पुरवठा निरीक्षण अधिकारी नागार्जुन खैरे, तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी ही उपस्थित होते.

on 18 April
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    1
    मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर :  शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार
डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे.
या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा   शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    1
    महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    14 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress
    1
    शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! 
नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला 
शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले 
शेतकरी सक्षम तर देश सक्षम! 
अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा!
#SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    1
    आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.