श्री शिवाजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी! श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य गजानन भिसडे, पर्यवेक्षक खुशाल राठोड, ज्येष्ठ प्राध्यापक अरुण लिमजे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपप्राचार्य गजानन भिसडे म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हा घोष देऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांनी शिक्षण, पत्रकारिता आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत केली. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, पोवाडे आणि लोककलेच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. त्यांच्या कार्यातून सामाजिक समता, बंधुता आणि मानवी मूल्यांचा संदेश मिळतो. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महान विभूतींचे विचार आत्मसात करून राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठा जोपासावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका तसेच कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- माटरगाव बेलुरा नदीवर असलेला पुल गेला वाहुन मुसळधार पावसामुळे माटरगाव–बेलुरा मार्ग बंद; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दूध व्यावसायिकांचे हाल1