खरीप पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी आज शेवटची संधी... प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग व उडीद या पिकांसाठी शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी पीकविमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. खरीप हंगाम 2026-27 साठी प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे एग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत कापूस पिकासाठी प्रति हेक्टर 69 हजार रुपये, सोयाबीनसाठी 62 हजार 500 रुपये, तुरीसाठी 47 हजार रुपये, मुगासाठी 30 हजार रुपये आणि उडदासाठी 27 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित बँक, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) किंवा राष्ट्रीय पीकविमा पोर्टलच्या माध्यमातून विहित मुदतीत अर्ज करावा. शेतकऱ्यांनी पीकविमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. सीएससी चालकांना विमा कंपनीकडून प्रति अर्ज 40 रुपये मानधन देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान 0.10 हेक्टर क्षेत्रावर संबंधित पिकाची लागवड केलेली असणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत, तर बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँक अथवा सीएससीच्या माध्यमातून योजनेत सहभागी व्हावे. पीकविमा योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांसाठी 14447 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता दि. 31 जुलै 2026 पूर्वी पीकविमा काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.1
- डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे. ⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा वर तक्रार नोंदवा. 🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा! #DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.2