logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा -खासदार नागेश पाटील आष्टीकर विविध विकास कामांचा 'दिशा समिती'कडून सर्वंकष आढावा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने प्रभावीपणे काम करावे. सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विकास योजना व कामांचा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी समितीचे सहअध्यक्ष खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, दिशा समितीचे सदस्य संदीप ससे, दयानंद पतंगे, श्रीमती शारदा पोपळघाट, श्रीमती शशिकला भवर, भास्कर घोडके, श्रीमती अश्विनी इंगोले पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मागील बैठकीतील निर्णयांवर झालेल्या कार्यवाहीचा तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. विविध विकास योजनांची सद्यस्थिती, उद्दिष्टपूर्ती, पूर्ण व अपूर्ण कामे आणि प्रलंबित कामांची कारणे याबाबत विभागनिहाय माहिती घेण्यात आली. महावितरण, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग आणि जलजीवन मिशनसह विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, जलजीवन मिशन, भारतनेट, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, समाजकल्याण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, आरोग्य आणि शिक्षण विभागातील योजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. विविध योजनांबाबत बैठकीसाठी परिपूर्ण आणि अचूक माहिती सादर करावी. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे. अपूर्ण माहिती सादर झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार रामराव वडकुते यांनी दिला. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तसेच शाळांमध्ये सौर पॅनल उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार आष्टीकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या. आयुष्मान भारत कार्ड वाटपाला गती आयुष्मान भारत कार्ड पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. सामान्य नागरिकांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे खासदार आष्टीकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील विकास योजनांची उद्दिष्टपूर्ती, प्रलंबित कामांना गती आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

57 min ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
57 min ago
e1635c97-8019-4de0-bbb9-9947f31c3492

More news from Hingoli and nearby areas
  • वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    1
    वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.
शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले.
यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    8 hrs ago
  • 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी
    1
    🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध!

शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾

“आपली जमीन, आपला हक्क!”

🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध!
शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾
“आपली जमीन, आपला हक्क!”
शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪
#खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून  4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .
    1
    गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल
कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून  4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    1
    बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय  म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील
हृदया दीपक शेठ पाटील  हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    user_Vishnu shirame
    Vishnu shirame
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
    1
    शेख फयाज शेख शब्बीर यांची 
शिवसेना अल्पसंख्याक पाथरी 
विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
शेख फयाज शेख शब्बीर यांची 
शिवसेना अल्पसंख्याक पाथरी 
विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • 🚨 Nanded Crime | अवैध विदेशी दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा छापा; ₹६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त 📍नायगाव | २७ ऑगस्ट २०२६ नायगाव परिसरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत ४७७ बाटल्या विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ₹६,०१,७९० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वडजे हॉस्पिटलजवळ पोलिसांनी सापळा रचून MH-12-NJ-2346 क्रमांकाची कार तपासली असता विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी विशाल बहादुरमल भंडारी, संजय शंकर बानेवाड आणि गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव यांच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) व ६५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 💰 दारू : ₹१,०१,७९० 🚗 कार : ₹५ लाख 📦 एकूण मुद्देमाल : ₹६,०१,७९० या कारवाईबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NandedCrime #Naigaon #NandedPolice #PoliceAction #MaharashtraNews #NandedUpdates #NandigramTimes #nandedfirstnews #shaikhjahurdudhadkar #NandedUpdates #nanded
    1
    🚨 Nanded Crime | अवैध विदेशी दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा छापा; ₹६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त
📍नायगाव | २७ ऑगस्ट २०२६
नायगाव परिसरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत ४७७ बाटल्या विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ₹६,०१,७९० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वडजे हॉस्पिटलजवळ पोलिसांनी सापळा रचून MH-12-NJ-2346 क्रमांकाची कार तपासली असता विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
या प्रकरणी विशाल बहादुरमल भंडारी, संजय शंकर बानेवाड आणि गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव यांच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) व ६५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
💰 दारू : ₹१,०१,७९०
🚗 कार : ₹५ लाख
📦 एकूण मुद्देमाल : ₹६,०१,७९०
या कारवाईबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedNews #NandedCrime #Naigaon #NandedPolice #PoliceAction #MaharashtraNews #NandedUpdates #NandigramTimes
#nandedfirstnews #shaikhjahurdudhadkar #NandedUpdates #nanded
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    14 min ago
  • ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही! या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर #रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस
    1
    ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली?
७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली?
हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे.
शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही!
या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर
#रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.