logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देगलुरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांबद्दल मोठी चर्चा सुरू आहे, कारण त्यांचे गोव्यात 'मौजमजा' करत असल्याबाबतचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये नगरसेवक बीचवर नाचताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर, नागरिक आणि विरोधी पक्षांकडून नगरसेवकांवर जोरदार टीका केली जात आहे. जनतेच्या गंभीर समस्या आणि प्रश्नांपेक्षा अशा प्रकारची मौजमजा अधिक महत्त्वाची आहे का, असा सवाल आता मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जात आहे.

19 hrs ago
user_ALM Bharat
ALM Bharat
Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
19 hrs ago

देगलुरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांबद्दल मोठी चर्चा सुरू आहे, कारण त्यांचे गोव्यात 'मौजमजा' करत असल्याबाबतचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये नगरसेवक बीचवर नाचताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर, नागरिक आणि विरोधी पक्षांकडून नगरसेवकांवर जोरदार टीका केली जात आहे. जनतेच्या गंभीर समस्या आणि प्रश्नांपेक्षा अशा प्रकारची मौजमजा अधिक महत्त्वाची आहे का, असा सवाल आता मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नांदेड विमानतळावरून खासदार संजय जाधव आणि खासदार संजय देशमुख एकाच खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. या घटनेमुळे 'ऑपरेशन टायगर' सुरू झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
    1
    नांदेड विमानतळावरून खासदार संजय जाधव आणि खासदार संजय देशमुख एकाच खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. या घटनेमुळे 'ऑपरेशन टायगर' सुरू झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उमरखेड शहरात मंगळवारी (१६ जून) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते रमेश चव्हाण यांच्यावर तोंडाला कपडा बांधलेल्या तीन अज्ञात तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. आमदार किसनराव वानखेडे यांच्या परिसरालगत घडलेल्या या हल्ल्यात रमेश चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेश चव्हाण यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली, मात्र घटनास्थळावरून अनेक नागरिक जात असतानाही तात्काळ मदतीसाठी कोणीही पुढे आले नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते सरोज देशमुख यांनी परिस्थितीची पाहणी करून तातडीने उमरखेड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेगाने प्रतिसाद देत जखमी चव्हाण यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्लेखोर कोण होते, त्यामागे वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य की अन्य कोणता हेतू होता, याचा तपास पोलीस करत आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, कटकारस्थान तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल. उमरखेडसारख्या शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, हल्लेखोरांना तात्काळ अटक करून घटनेमागील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    3
    उमरखेड शहरात मंगळवारी (१६ जून) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते रमेश चव्हाण यांच्यावर तोंडाला कपडा बांधलेल्या तीन अज्ञात तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. आमदार किसनराव वानखेडे यांच्या परिसरालगत घडलेल्या या हल्ल्यात रमेश चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेश चव्हाण यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली, मात्र घटनास्थळावरून अनेक नागरिक जात असतानाही तात्काळ मदतीसाठी कोणीही पुढे आले नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते सरोज देशमुख यांनी परिस्थितीची पाहणी करून तातडीने उमरखेड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेगाने प्रतिसाद देत जखमी चव्हाण यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्लेखोर कोण होते, त्यामागे वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य की अन्य कोणता हेतू होता, याचा तपास पोलीस करत आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, कटकारस्थान तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल. उमरखेडसारख्या शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, हल्लेखोरांना तात्काळ अटक करून घटनेमागील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • श्रीपाद नगर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अधिक मासाच्या शुभ मुहूर्तावर १७ जून रोजी कलशारोहण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
    1
    श्रीपाद नगर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अधिक मासाच्या शुभ मुहूर्तावर १७ जून रोजी कलशारोहण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात, १६ जून रोजी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक महिला शेतकरी व तिच्या एका बैलाचा जागीच करुण अंत झाला. ४७ वर्षीय शेतकरी महिला संगीता किसन नरवाडे आणि तिच्या दोन बैलांना एका भरधाव डिझेल टँकरने धडक दिली, ज्यात ते अक्षरशः चाकाखाली चिरडले गेले. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील रहिवासी असलेल्या संगीता नरवाडे नेहमीप्रमाणे आपल्या दोन बैलांना घेऊन महामार्गालगतच्या शेतात चारा-पाणी करण्यासाठी गेल्या होत्या. बैलांना व्यवस्थित चारून त्या हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरून डोंगरगावकडे परतत असताना, कळमनुरीकडून नांदेडकडे निष्काळजीपणे व भरधाव वेगात डिझेलची वाहतूक करणारा एमएच २६ एडी ०९३९ क्रमांकाचा टँकर आला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या टँकरने संगीताबाईंना आणि त्यांच्या दोन्ही बैलांना जोरदार धडक दिली, ज्यात त्यांच्या एका बैलाचाही मृत्यू झाला, तर दुसरा बैल जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचनामा केला. मयत संगीता नरवाडे यांचे बंधू संदीप किशन नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर टँकरच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहीणकर करत आहेत.
    1
    हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात, १६ जून रोजी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक महिला शेतकरी व तिच्या एका बैलाचा जागीच करुण अंत झाला. ४७ वर्षीय शेतकरी महिला संगीता किसन नरवाडे आणि तिच्या दोन बैलांना एका भरधाव डिझेल टँकरने धडक दिली, ज्यात ते अक्षरशः चाकाखाली चिरडले गेले. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील रहिवासी असलेल्या संगीता नरवाडे नेहमीप्रमाणे आपल्या दोन बैलांना घेऊन महामार्गालगतच्या शेतात चारा-पाणी करण्यासाठी गेल्या होत्या. बैलांना व्यवस्थित चारून त्या हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरून डोंगरगावकडे परतत असताना, कळमनुरीकडून नांदेडकडे निष्काळजीपणे व भरधाव वेगात डिझेलची वाहतूक करणारा एमएच २६ एडी ०९३९ क्रमांकाचा टँकर आला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या टँकरने संगीताबाईंना आणि त्यांच्या दोन्ही बैलांना जोरदार धडक दिली, ज्यात त्यांच्या एका बैलाचाही मृत्यू झाला, तर दुसरा बैल जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचनामा केला. मयत संगीता नरवाडे यांचे बंधू संदीप किशन नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर टँकरच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहीणकर करत आहेत.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मनपा स्कूल क्रमांक ९, किला येथे नुकताच 'दाखिला उत्सव' (प्रवेशोत्सव) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण घोडा सवारी होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष जोश आणि उत्साह संचारला. या विशेष प्रसंगी, शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश आणि शूज प्रदान करण्यात आले.
    1
    मनपा स्कूल क्रमांक ९, किला येथे नुकताच 'दाखिला उत्सव' (प्रवेशोत्सव) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण घोडा सवारी होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष जोश आणि उत्साह संचारला. या विशेष प्रसंगी, शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश आणि शूज प्रदान करण्यात आले.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    20 hrs ago
  • विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे नांदेड जिल्हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीची चुरस वाढत असतानाच, नांदेडमधील भाजप आणि देगलूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नगरसेवक सध्या गोव्यात ‘टूर’ एन्जॉय करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, नागरिक “काही वर्षांपूर्वी आमदार गुवाहाटीला गेले होते, आता नगरसेवक गोव्याला गेलेत का?” असा खोचक सवाल उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाला एका व्हायरल व्हिडिओमुळे उधाण आले आहे. देगलूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगरसेवकांनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील (बीच) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे नगरसेवक गाण्यांवर थिरकताना आणि मौजमजा करताना स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
    1
    विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे नांदेड जिल्हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीची चुरस वाढत असतानाच, नांदेडमधील भाजप आणि देगलूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नगरसेवक सध्या गोव्यात ‘टूर’ एन्जॉय करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, नागरिक “काही वर्षांपूर्वी आमदार गुवाहाटीला गेले होते, आता नगरसेवक गोव्याला गेलेत का?” असा खोचक सवाल उपस्थित करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाला एका व्हायरल व्हिडिओमुळे उधाण आले आहे. देगलूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगरसेवकांनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील (बीच) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे नगरसेवक गाण्यांवर थिरकताना आणि मौजमजा करताना स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नांदेडच्या तामसा रोडवरील घाट परिसरात एका मादी बिबट्याचे तिच्या तीन बछड्यांसह मुक्तसंचार करतानाचे दृश्य समोर आले आहे. हे थरारक दृश्य काही वाहनधारकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लहान-लोन गावाजवळ रात्रीच्या वेळी हे बिबट कुटुंब रस्त्यावरील एका खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी पिताना दिसले. हे दृश्य पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची एकच गाळण उडाली. या घटनेमुळे तामसा परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वनविभागाने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी आणि सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे.
    1
    नांदेडच्या तामसा रोडवरील घाट परिसरात एका मादी बिबट्याचे तिच्या तीन बछड्यांसह मुक्तसंचार करतानाचे दृश्य समोर आले आहे. हे थरारक दृश्य काही वाहनधारकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लहान-लोन गावाजवळ रात्रीच्या वेळी हे बिबट कुटुंब रस्त्यावरील एका खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी पिताना दिसले. हे दृश्य पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची एकच गाळण उडाली.

या घटनेमुळे तामसा परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वनविभागाने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी आणि सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.