शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन कामे करा - पालकमंत्री अतुल सावे... शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन कामे करा - पालकमंत्री अतुल सावे खरीप हंगाम नियोजन बैठकीत विविध विषयांचा आढावा जलसंपदा, महावितरण यांनी समन्वयाने सुविधा द्याव्यात खतसाठा, पाणी, वीज पुरवठाबाबत लोकप्रतिनिधी यांच्या सूचना नांदेड, दिनांक १ मे: खरीप हंगाम सर्वांनी समन्वय ठेऊन यशस्वी करावा. आगामी हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांना पाणी, वीज, खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. कामात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 'खरीप हंगाम-२०२६' बैठक पार पडली. बैठकीस खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी पाटील कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके (बोंढारकर),आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदी उपस्थित होते. पालकमंत्री सावे म्हणाले, बोगस बियाणे, खतांची साठेबाजी, पीक कर्ज देण्यात अडथळा आदी बाबत प्रशासनाने नियमानुसार कारवाई करावी. याबाबत कृषीशी संबंधित असलेल्या शासकीय, खासगी यंत्रणा यांच्याशी बैठक आयोजित करावी. तसेच महावितरण बाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत राज्यस्तरावर बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात यईल, असेही पालकमंत्री म्हणाले. खतांची साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथके नेमून यावर आळा घालण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना सोलार पंप विहित वेळेत उपलब्ध करुन न देणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश त्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील खताचा साठा इतर राज्यात जावू नये यासाठी भरारी पथके नेमली आहेत. खत उपलब्धतेसाठी क्युआर कोड केले आहेत. क्युआर कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताची उपलब्धतेची माहिती मिळेल. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा नियमित होण्यासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. जिल्ह्यात अल निनोच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्हा चारा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही बाबीची अडचणी येणार नाहीत याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापक यंत्र लावण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मिर्ची संशोधन केंद्र, सोयाबीन, केळी संशोधन केंद्राचे प्रस्ताव लवकरच शासनास सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नांदेड शहरात कृषी भवनासाठी जागा उपलब्ध करुन याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कृषी विभागाची ही पहिलीच बैठक होत असल्याने, बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्री सावे यांच्या उपस्थितीत दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांचा गौरव खरीप हंगाम सन २०२५ मधील 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'अंतर्गत जिल्ह्यात ८१३ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाल्याबद्दल, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचा पालकमंत्री सावे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. याबाबतचा अभिनंदनाचा ठराव आमदार चिखलीकर यांनी मांडला आणि पालकमंत्री सावे यांनीही प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी मांडल्या. त्यांच्यासह खासदार रवींद्र चव्हाण, आमदार चिखलीकर, आमदार कल्याणकर, आमदार तिडके, आमदार पवार, आमदार श्रीजया चव्हाण यांनीही विविध सूचना मांडल्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेली कार्यवाही आणि आगामी नियोजन याबाबत माहिती सादर केली. प्रास्ताविक कळसाईत यांनी केले. बैठकीतील प्रमुख आढावा आणि कामकाज: या बैठकीत 'खरीप हंगाम २०२५' मधील कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच मागील बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. याव्यतिरिक्त खालील महत्त्वपूर्ण कृषी विषयक बाबींचा व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला: कृषी सांख्यिकी व पर्जन्यमान: नांदेड जिल्ह्याची कृषी विषयक सर्वसाधारण माहिती, ११ व्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यातील सीमांत, अत्यल्प, अल्प व इतर खातेदार आणि त्यांची जमीन धारणा, तसेच सन २०२५ मधील महिनानिहाय पर्जन्यमान. नैसर्गिक आपत्ती व पीक नुकसान: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पीक नुकसान आणि २०२६ च्या मोसमी पावसाचे दीर्घावधी पूर्वानुमान. शेतकरी कल्याण व विमा योजना: खरीप हंगाम सन २०२५ मधील 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सहभागी शेतकरी व त्यांना मिळालेली नुकसान भरपाई, 'पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना' (आंबिया बहार), 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान' आणि 'पीएम किसान' योजना. कर्ज, निविष्ठा व खरेदी नियोजन: यंत्रणानिहाय शेतमाल खरेदी, २०२६-२७ या वर्षासाठी पीकनिहाय प्रति हेक्टरी पीक कर्ज दर आणि पीक कर्ज वितरण. इतर योजना व वितरण कार्यवाही: सौर-कृषीपंप जोडणी, बियाणे नियोजन, रासायनिक खतांची मागणी, पुरवठा व विक्री आणि वितरण कार्यवाही आदींसह विविध कृषी योजनांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला.

- विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Shaikh Rafik Qureshi1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by नागनाथ ससाने1
- Post by Today One Live1
- ट्रॅक्टरवरील कोटींच्या दरोडेखोरीला आळा घाला – कॉम्रेड राजन क्षीरसागर1
- Post by Latur 241