logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

युवा कवी संतोष पावरा यांची 'खेड्यात राहता' कविता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अभ्यासक्रमात समाविष्ट युवा कवी संतोष पावरा यांची 'खेड्यात राहता...' कविता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अभ्यासक्रमात समाविष्ट नंदुरबार जिल्ह्यातील युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांच्या ढोल काव्यसंग्रहातील " खेड्यात राहता." ही कविता नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती, विद्यापीठ येथील B.A मराठी भाग ३-४ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. या पूर्वी देखील पावरा यांच्या ढोल काव्यसंग्रहातील 'कुपोषण ' कविता क. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे B.A च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. "खेड्यात राहता...आश्रम शाळेत शिकता म्हणून काय झाले. आम्हालाही आहे डोकं नाही रिकामे हे खोकं " अशी कवितेची सुरुवात आहे. खेड्यातील लोकांना तसेच आश्रम शाळेत शिकून पुढे शहरात गेले की खेड्यातील लोकांना शहरी लोकं अनेक टोमणे मारून त्यांच्या आत्मसन्मान दुखवून त्यांच्या आत्मविश्वास दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण केला जातो. त्यामुळं ते प्रगती करू शकत नाही. त्यांवर कवी पावरा यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून खेड्यातील आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रतिभा त्यांची गुणवत्ता बद्दल प्रत्युत्तर देऊन त्यांच्यातील विविध कला गुणांचा उल्लेख करून आत्मविश्वास वाढवला आहे. वास्तविकता दाखवलेली आहे. कवी संतोष पावरा यांचे ढोल काव्यसंग्रह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच आपल्या मातृभाषा पावरीसह भीलोरी बोली मराठी आणि हिंदीत ही त्यांचे साहित्य प्रकाशित आहे. त्यांच्या साहित्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक मानाचे सन्मान मिळालेले आहे. संतोष पावरा साहित्यासोबतच आदिवासी बोलीभाषेसाठी जतन संवर्धन करण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहे. आदिवासी संस्कृती, साहित्य, इतिहास आणि निसर्ग जतन संवर्धन व विविध सामाजिक प्रश्नांवर कवी पावरा यांचे लिखाण आहे. याच विषयावर सतत त्यांचे अनेक उपक्रम सुरू असतात. ' खेड्यात राहता...' ही कवी संतोष पावरा यांची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल परिसरातून शुभेच्छाचे वर्षाव त्यांच्या वर होत आहे. संत गाडगेबाबा अमरावती, विद्यापीठाचे व मराठी अभ्यास मंडळाचे देखील पावरा यांनी आभार मानले आहे. अशी माहिती पावरा यांनी दिली.

1 hr ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
1 hr ago
92ea678a-1724-40db-a419-97b8af711dcd

युवा कवी संतोष पावरा यांची 'खेड्यात राहता' कविता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अभ्यासक्रमात समाविष्ट युवा कवी संतोष पावरा यांची 'खेड्यात राहता...' कविता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अभ्यासक्रमात समाविष्ट नंदुरबार जिल्ह्यातील युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांच्या ढोल काव्यसंग्रहातील " खेड्यात राहता." ही कविता नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती, विद्यापीठ येथील B.A मराठी भाग ३-४ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. या पूर्वी देखील पावरा यांच्या ढोल काव्यसंग्रहातील 'कुपोषण

5fb934f4-e259-44aa-a2d9-5477df12cdd9

' कविता क. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे B.A च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. "खेड्यात राहता...आश्रम शाळेत शिकता म्हणून काय झाले. आम्हालाही आहे डोकं नाही रिकामे हे खोकं " अशी कवितेची सुरुवात आहे. खेड्यातील लोकांना तसेच आश्रम शाळेत शिकून पुढे शहरात गेले की खेड्यातील लोकांना शहरी लोकं अनेक टोमणे मारून त्यांच्या आत्मसन्मान दुखवून त्यांच्या आत्मविश्वास दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण केला जातो. त्यामुळं ते प्रगती करू शकत नाही.

d24b685b-318d-4436-a7c7-4b0e7f8c9a6d

त्यांवर कवी पावरा यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून खेड्यातील आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रतिभा त्यांची गुणवत्ता बद्दल प्रत्युत्तर देऊन त्यांच्यातील विविध कला गुणांचा उल्लेख करून आत्मविश्वास वाढवला आहे. वास्तविकता दाखवलेली आहे. कवी संतोष पावरा यांचे ढोल काव्यसंग्रह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच आपल्या मातृभाषा पावरीसह भीलोरी बोली मराठी आणि हिंदीत ही त्यांचे साहित्य प्रकाशित आहे. त्यांच्या साहित्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक मानाचे सन्मान मिळालेले आहे. संतोष पावरा साहित्यासोबतच आदिवासी बोलीभाषेसाठी जतन संवर्धन करण्यासाठी

53e01dda-00d4-4ea8-99d0-4450ce02a769

देखील प्रयत्न करीत आहे. आदिवासी संस्कृती, साहित्य, इतिहास आणि निसर्ग जतन संवर्धन व विविध सामाजिक प्रश्नांवर कवी पावरा यांचे लिखाण आहे. याच विषयावर सतत त्यांचे अनेक उपक्रम सुरू असतात. ' खेड्यात राहता...' ही कवी संतोष पावरा यांची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल परिसरातून शुभेच्छाचे वर्षाव त्यांच्या वर होत आहे. संत गाडगेबाबा अमरावती, विद्यापीठाचे व मराठी अभ्यास मंडळाचे देखील पावरा यांनी आभार मानले आहे. अशी माहिती पावरा यांनी दिली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत..... वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. या अचानक आलेल्या पावसामुळे व आलेल्या पुराने काठावर रहाणाऱ्या सर्व घरात पाणी गेले. सर्व घरात चिखल झाला. निवासी जन जिव घेवून पळाले. पण गृहोपयोगी साहित्यावर पाणी फिरले.काही घरे वाहुन गेले. नाल्यात या चार माणसे वाहुन गेली. दोन बेपत्ता आहेकपडे लत्ते वह्या पुस्तके ओली झाली.व निरोपयोगी झाली. त्यामुळे जेवण काय करायचं,रहाणार कोठे, झोपणार कोठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
    1
    ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.....
वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला.
वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. या अचानक आलेल्या पावसामुळे व आलेल्या पुराने काठावर रहाणाऱ्या सर्व घरात पाणी गेले. सर्व घरात चिखल झाला. निवासी जन जिव घेवून पळाले. पण गृहोपयोगी साहित्यावर पाणी फिरले.काही घरे वाहुन गेले. नाल्यात या चार माणसे वाहुन गेली. दोन बेपत्ता आहेकपडे लत्ते वह्या पुस्तके ओली झाली.व निरोपयोगी झाली. त्यामुळे जेवण काय करायचं,रहाणार कोठे, झोपणार कोठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी! Dhule News | धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी! - #dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #dhulemahanagarpalika #maharashtranews
    1
    धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी!
Dhule News | धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी!
-
#dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #dhulemahanagarpalika #maharashtranews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली. भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी
बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली.
भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • करंजवण धरण 90 टक्के भरले.. :- नाशिकच्या दिंडोरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळदार पावसाने करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने धरणाने 90 टक्क्याचा टप्पा भर केला असून,धरणातून 19 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. करंजवन धरण भरल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाड शहराचा पिण्याचा पाण्याचा मिटला. आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण - करंजवण थेट पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने मनमाडकर नागरिकांनी समाधान व्यक्त की. तर शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागली..
    1
    करंजवण धरण 90 टक्के भरले..
:- नाशिकच्या दिंडोरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळदार पावसाने करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने धरणाने 90 टक्क्याचा टप्पा भर केला असून,धरणातून 19 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. करंजवन धरण भरल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाड शहराचा पिण्याचा पाण्याचा मिटला. आ. सुहास  कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण - करंजवण  थेट पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने मनमाडकर नागरिकांनी समाधान व्यक्त की. तर शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागली..
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • चांदसैली घाटात मलबा हटविण्यात काम सुरू. घाटात एकेरी मार्ग वाहतूक सुरू... चांदसैली घाटात मलबा हटविण्यात काम सुरू... घाटात एकेरी मार्ग वाहतूक सुरू... वाहनधारकांनी सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा.. सातपुड्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी यंत्राने दरड हटविण्याचे काम सुरू असून तूर्तास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे तळोदा धडगाव रस्त्यावर घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने जेसीबी यंत्राने दरड हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न करून काम सुरू असून तूर्तास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सावधगिरीने प्रवास करावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    1
    चांदसैली घाटात मलबा हटविण्यात काम सुरू. घाटात एकेरी मार्ग वाहतूक सुरू...

चांदसैली घाटात मलबा हटविण्यात काम सुरू...
घाटात एकेरी मार्ग वाहतूक सुरू...
वाहनधारकांनी सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा..
सातपुड्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत  जेसीबी यंत्राने दरड हटविण्याचे काम सुरू असून तूर्तास एकेरी  वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे तळोदा धडगाव रस्त्यावर घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने  जेसीबी यंत्राने दरड हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न करून काम सुरू असून तूर्तास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
वाहनचालकांनी वाहतूक पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सावधगिरीने प्रवास करावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.