Shuru
Apke Nagar Ki App…
युद्धजन्य परिस्थितीच्या अफवांचा फटका: भिगवणमध्ये भारत गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची प्रचंड तारांबळ...
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
युद्धजन्य परिस्थितीच्या अफवांचा फटका: भिगवणमध्ये भारत गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची प्रचंड तारांबळ...
More news from महाराष्ट्र and nearby areas
- JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.... : संभाजी कदम, पोलीस उपायुक्त #हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज #Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews1
- Post by AapTak Hindi News Channel1
- आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..1
- स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥ सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥ निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥ अर्थ स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.1
- अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.” तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.1
- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतीथी निमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने सालाबादा प्रमाणे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवास आज मोठ्या भक्तीभावाने सुरूवात करण्यात आली. या धर्मसंकीर्तन महोत्सवातील पहिले पुष्प आज नाशिकच्या गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिकांच्या भक्तीसंगीत गायनाने फुलले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी गायिका मीरा कुलकर्णी व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे या भक्ती संगीत गायन सेवेत गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिका अर्चना कुलकर्णी, वीणा देशपांडे यांनी एकल व समिश्र गायन सेवेतून भक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, शंभू शिवशंकर, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, निघालो घेऊनी दत्ताची पालखी, तारकमंत्र आदीसह अनेक भावगीते गाऊन श्री चरणी सेवा समर्पित केली. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर जगदीश सोनवणे, हार्मोनियमवर ओंकार पाठक, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथ संगत केली. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, बाळासाहेब सरदेशमुख, राजाभाऊ सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, मल्लिनाथ बोधले, प्रा.शिवशरण अचलेर, राजू भोसले सर, रमेश शिंदे सर, अमर पाटील, बाळासाहेब एकबोटे, संतोष पराणे, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार, नरसिंग क्षीरसागर, सागर गोंडाळ, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.1