Shuru
Apke Nagar Ki App…
विशेष तपास न्युज
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांचा थरारक पाठलाग करून ५ आरोपी अटकेत पिंपरी : प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी थरारक पाठलाग करून अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. ९ मार्च रोजी रहाटणी येथील शिवराजनगर परिसरातून एका व्यापाऱ्याचे स्विफ्ट कारमधून अपहरण करून आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी अपहृत व्यक्तीला उत्तरप्रदेशकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम व स्विफ्ट कारसह एकूण १८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींनी अपहृत व्यक्तीला चंदनापुरी घाट परिसरात सोडून दिले होते. पोलिसांनी शोध घेऊन त्या व्यक्तीला सुखरूप ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व काळेवाडी पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Maharashtra 18 news1
- #psi #atulshete #pcmc #pune #marathinews1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तत्काळ केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता... #पिंपरीचिंचवड #डांगेचौक #ट्रान्सफॉर्मरआग #आगघटना #वीजपुरवठा #पिंपरीचिंचवडबातम्या #स्थानिकबातमी #आगनियंत्रण #वीजखंडित #PimpriChinchwad #DangeChowk #TransformerFire #FireIncident #PowerSupply #LocalNews #PimpriChinchwadNew #ElectricTransformer #PowerCut1
- मांजरी बुद्रुक ब्रिजखालील बोगद्यात कचऱ्याचा खच मांजरी बुद्रुक येथील ब्रिजखालील बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. काही बेफिकीर नागरिकांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- नांदेड येथे उद्योजक मा.नितीन भाऊ गवळी यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे1