logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तळोदा तालुक्यातील शिर्वे येथील शासकीय आश्रमशाळेच्या पत्र्याच्या इमारतीवर १० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक एक मोठे जीर्ण झाड कोसळल्याने इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटना घडली तेव्हा सर्व विद्यार्थी मैदानावर असल्याने मोठा अनर्थ टळला आणि विद्यार्थी सुरक्षित राहिले. मात्र, या दुर्घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी नाला आश्रमशाळेचे ३४५ आणि शिर्वे शाळेचे ७५० असे एकूण ११०० हून अधिक विद्यार्थी अत्यंत दाटीवाटीने निवासासह शिक्षण घेत आहेत. नाला आश्रमशाळेचे विद्यार्थी सध्या शिर्वे येथील जुन्या, मुदत संपलेल्या आणि धोकादायक इमारतीत राहत आहेत. कंत्राटदारांचा अति नफा मिळवण्याचा हेतू आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे या शाळांचे बांधकाम अनेक वर्षांपासून मुद्दाम लांबवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. वेळेत बांधकाम पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना अशा धोकादायक आणि गैरसोयीच्या वातावरणात राहावे लागत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, नाशिकचे आयुक्त आणि तळोदा प्रकल्प कार्यालयाला निवेदन दिले आहे. सुरू असलेले हे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

1 hr ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
1 hr ago
734f7554-9b70-434f-b58b-38eed3bb7dfd

तळोदा तालुक्यातील शिर्वे येथील शासकीय आश्रमशाळेच्या पत्र्याच्या इमारतीवर १० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक एक मोठे जीर्ण झाड कोसळल्याने इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटना घडली तेव्हा सर्व विद्यार्थी मैदानावर असल्याने मोठा अनर्थ टळला आणि विद्यार्थी सुरक्षित राहिले. मात्र, या दुर्घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी नाला आश्रमशाळेचे ३४५

adcd72a8-0f22-4ec2-910c-ce1670d85d07

आणि शिर्वे शाळेचे ७५० असे एकूण ११०० हून अधिक विद्यार्थी अत्यंत दाटीवाटीने निवासासह शिक्षण घेत आहेत. नाला आश्रमशाळेचे विद्यार्थी सध्या शिर्वे येथील जुन्या, मुदत संपलेल्या आणि धोकादायक इमारतीत राहत आहेत. कंत्राटदारांचा अति नफा मिळवण्याचा हेतू आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे या शाळांचे बांधकाम अनेक वर्षांपासून मुद्दाम लांबवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. वेळेत बांधकाम पूर्ण होत

4f0bc5d9-dcb0-4177-9813-755318b95f08

नसल्याने विद्यार्थ्यांना अशा धोकादायक आणि गैरसोयीच्या वातावरणात राहावे लागत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, नाशिकचे आयुक्त आणि तळोदा प्रकल्प कार्यालयाला निवेदन दिले आहे. सुरू असलेले हे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
    1
    नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते.

यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पाचोरा शहरातील लोकप्रिय आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PMJ ॲडव्हेंचर पार्कला खान्देशातील सुप्रसिद्ध कलाकार आणि बिग बॉस फेम सचिन कुमावत यांनी आपल्या कुटुंबासह सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनामुळे पार्क परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी PMJ ॲडव्हेंचर पार्कचे संचालक संदीप जैन आणि अमोल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन सचिन कुमावत यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार केला. सचिन कुमावत यांनी पार्कमधील विविध साहसी खेळ, मनोरंजनाच्या सुविधा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आकर्षक उपक्रमांची पाहणी करत येथील सुविधांचे आणि संकल्पनेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे पाचोरा शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याच कार्यक्रमात, नुकताच 'लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार' प्राप्त झालेले पत्रकार, जनलक्ष्य न्यूजचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बारी यांचा बिग बॉस फेम सचिन कुमावत यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला दीपक माने, प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
    1
    पाचोरा शहरातील लोकप्रिय आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PMJ ॲडव्हेंचर पार्कला खान्देशातील सुप्रसिद्ध कलाकार आणि बिग बॉस फेम सचिन कुमावत यांनी आपल्या कुटुंबासह सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनामुळे पार्क परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी PMJ ॲडव्हेंचर पार्कचे संचालक संदीप जैन आणि अमोल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन सचिन कुमावत यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार केला. सचिन कुमावत यांनी पार्कमधील विविध साहसी खेळ, मनोरंजनाच्या सुविधा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आकर्षक उपक्रमांची पाहणी करत येथील सुविधांचे आणि संकल्पनेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे पाचोरा शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याच कार्यक्रमात, नुकताच 'लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार' प्राप्त झालेले पत्रकार, जनलक्ष्य न्यूजचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बारी यांचा बिग बॉस फेम सचिन कुमावत यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला दीपक माने, प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली. आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.
    1
    बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत.

तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली.

आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नाशिकच्या दत्तनगर भागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे अखेर स्थानिकांचा संयम सुटला आहे. पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन नगरसेवक नितीन दातीर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. या वेळी नागरिकांनी तीव्र निदर्शने करत कार्यालयाला घेराव घातला आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली. प्रदर्शनकर्त्या नागरिकांच्या मते, या पाणीसमस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या दुर्लक्षाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता या गंभीर जलसंकटावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    नाशिकच्या दत्तनगर भागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे अखेर स्थानिकांचा संयम सुटला आहे. पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन नगरसेवक नितीन दातीर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. या वेळी नागरिकांनी तीव्र निदर्शने करत कार्यालयाला घेराव घातला आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली.

प्रदर्शनकर्त्या नागरिकांच्या मते, या पाणीसमस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या दुर्लक्षाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता या गंभीर जलसंकटावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत धडगाव तालुक्यातील मांडवी येथील शासकीय आश्रम शाळेतील ५० ते ६० विद्यार्थिनींनी शाळेतील असुविधा आणि त्रासाला कंटाळून थेट पायी मोर्चा काढला. आश्रमशाळेत पुरेसे शिक्षक आणि पुस्तके उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या या विद्यार्थिनींनी आपल्या विविध प्रश्नांवर दाद मागण्यासाठी तब्बल २२ किलोमीटर पायपीट केली. शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्याने त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्यात यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. मांडवी आश्रमशाळेतून तळोदा येथील प्रकल्प कार्यालयाकडे पायी निघाल्या असताना, वाटेत नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत, सियाराम पाडवी, चेतन साळवे, राजेश गुरुजी, प्रेमसिंग गुरुजी व इतर सहकारी त्यांना भेटले. कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता विद्यार्थिनींनी आपले गाऱ्हाणे मांडले. यानंतर कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींची समस्या समजून घेत त्यांना बिजरी आश्रमशाळेत नेले. नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाबाबत तळोदा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तातडीने दाद मागितली आहे. आश्रमशाळेतील या असुविधांच्या विरोधात कडक कारवाई करून विद्यार्थिनींना त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत धडगाव तालुक्यातील मांडवी येथील शासकीय आश्रम शाळेतील ५० ते ६० विद्यार्थिनींनी शाळेतील असुविधा आणि त्रासाला कंटाळून थेट पायी मोर्चा काढला. आश्रमशाळेत पुरेसे शिक्षक आणि पुस्तके उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या या विद्यार्थिनींनी आपल्या विविध प्रश्नांवर दाद मागण्यासाठी तब्बल २२ किलोमीटर पायपीट केली. शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्याने त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्यात यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.

मांडवी आश्रमशाळेतून तळोदा येथील प्रकल्प कार्यालयाकडे पायी निघाल्या असताना, वाटेत नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत, सियाराम पाडवी, चेतन साळवे, राजेश गुरुजी, प्रेमसिंग गुरुजी व इतर सहकारी त्यांना भेटले. कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता विद्यार्थिनींनी आपले गाऱ्हाणे मांडले. यानंतर कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींची समस्या समजून घेत त्यांना बिजरी आश्रमशाळेत नेले.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाबाबत तळोदा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तातडीने दाद मागितली आहे. आश्रमशाळेतील या असुविधांच्या विरोधात कडक कारवाई करून विद्यार्थिनींना त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पिशोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोठा दणका बसला आहे.
    1
    औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पिशोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोठा दणका बसला आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने गेल्या दोन वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की, ७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित येथील रेल्वे पोल क्रमांक १७४/१३१५ जवळ काम सुरू असताना, गुलाबसिंग आखाडे याने कोणतेही कारण नसताना एका मजुरावर लोखंडी पहारीने जीवघेणा हल्ला केला होता. या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होता. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत असल्याचे शोधून काढले. पोलिसांच्या विशेष पथकाने दोन दिवस सलग शोधमोहीम राबवून ग्राम चोली (ता. माहेश्वर, जि. खरगोन) येथून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५०, रा. बेरछा, ता. भिकनगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
    3
    नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने गेल्या दोन वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की, ७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित येथील रेल्वे पोल क्रमांक १७४/१३१५ जवळ काम सुरू असताना, गुलाबसिंग आखाडे याने कोणतेही कारण नसताना एका मजुरावर लोखंडी पहारीने जीवघेणा हल्ला केला होता. या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होता.

गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत असल्याचे शोधून काढले. पोलिसांच्या विशेष पथकाने दोन दिवस सलग शोधमोहीम राबवून ग्राम चोली (ता. माहेश्वर, जि. खरगोन) येथून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५०, रा. बेरछा, ता. भिकनगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • दक्षिणी विएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या फू क्वोक बेटाजवळ शनिवारी एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. ३२ भारतीय पर्यटक आणि चालक दलाच्या ४ सदस्यांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रात उलटली. या भीषण अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही बोट एका बेटाच्या सफरीवरून परतत होती. किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच, समुद्रातील प्रचंड लाटा आणि खराब हवामानामुळे बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले आणि २१ लोकांना सुखरूप बाहेर काढले।
    1
    दक्षिणी विएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या फू क्वोक बेटाजवळ शनिवारी एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. ३२ भारतीय पर्यटक आणि चालक दलाच्या ४ सदस्यांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रात उलटली. या भीषण अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही बोट एका बेटाच्या सफरीवरून परतत होती. किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच, समुद्रातील प्रचंड लाटा आणि खराब हवामानामुळे बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले आणि २१ लोकांना सुखरूप बाहेर काढले।
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.