logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढा सुरूच – ॲड. अजित काळे सोनपेठ (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची थकित रक्कम मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ अजित काळे यांचा शेळगाव महाविष्णू (ता. सोनपेठ) येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरील संघर्षही सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. २०२० मधील पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात निःशुल्क दावा लढवून शेतकऱ्यांना शेकडो कोटी रुपये व्याजासह मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ तसेच शेतकरी संघटना चे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या सत्कारासोबतच “शेतकरी हक्क परिषद” देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट होते. तर सुधीर बिंदू, अमृत शिंदे, बंडू सोळंके, दगडूबा वजीर, इरशाद चाँद पाशा, किरण चक्रपाणी, शिवाजी बोबडे आणि अनंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील अनेक शेतकरी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत पिक विमा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल ॲड. अजित काळे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. अजित काळे म्हणाले की, न्यायव्यवस्था कागदोपत्री प्रक्रियेवर चालत असली तरी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पिक विमा हा शेतकऱ्यांवर कोणताही उपकार नसून तो केंद्र व राज्य शासनाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील पिक विमा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाच्या योजना समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात की नाही यावर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा निर्माण झाली नाही, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी संघटित नसल्यामुळे अनेक प्रश्न दुर्लक्षित राहतात. त्यामुळे धाडसाने प्रश्न विचारणे आणि हक्कासाठी आवाज उठवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरील संघर्ष सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. तसेच शेतकऱ्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात शेतकरी चळवळीतील हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे आणि कालीदास आपेट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेळगाव महाविष्णू येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

1 day ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
1 day ago
d62d08f8-713e-4263-a4b9-94a2e4fbcf5f

शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढा सुरूच – ॲड. अजित काळे सोनपेठ (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची थकित रक्कम मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ अजित काळे यांचा शेळगाव महाविष्णू (ता. सोनपेठ) येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरील संघर्षही सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. २०२० मधील पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात निःशुल्क दावा लढवून शेतकऱ्यांना शेकडो कोटी रुपये व्याजासह मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ तसेच शेतकरी संघटना चे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या सत्कारासोबतच “शेतकरी हक्क परिषद” देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट होते. तर सुधीर बिंदू, अमृत शिंदे, बंडू सोळंके, दगडूबा वजीर, इरशाद चाँद पाशा, किरण चक्रपाणी, शिवाजी बोबडे आणि अनंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील अनेक शेतकरी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत पिक विमा मिळवून

d551b5c1-6456-48d5-bf19-414fe25ca137

देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल ॲड. अजित काळे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. अजित काळे म्हणाले की, न्यायव्यवस्था कागदोपत्री प्रक्रियेवर चालत असली तरी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पिक विमा हा शेतकऱ्यांवर कोणताही उपकार नसून तो केंद्र व राज्य शासनाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील पिक विमा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाच्या योजना समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात की नाही यावर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा निर्माण झाली नाही, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी संघटित नसल्यामुळे अनेक प्रश्न दुर्लक्षित राहतात. त्यामुळे धाडसाने प्रश्न विचारणे आणि हक्कासाठी आवाज उठवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरील संघर्ष सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. तसेच शेतकऱ्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात शेतकरी चळवळीतील हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे आणि कालीदास आपेट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेळगाव महाविष्णू येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंठा प्रतिनिधी मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील शेतकरी शिवाजी चंदू राठोड यांच्या शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना दि. ९मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली असून गट क्रमांक 219 मधील त्यांच्या दीड एकर शेतातील गहू जळून खाक आहे . मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील वीजवाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच आगीने उभ्या गव्हाच्या पिकाला वेढा घातला. आग लागल्याचे लक्षात येताच शेतकरी व परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दीड एकर क्षेत्रातील गव्हाचे उभे पीक जळून खाक झाले. या आगीत शेतकरी शिवाजी राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच वीज विभागाने शेतातील वीजवाहिन्यांची तपासणी करून अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.
    1
    मंठा प्रतिनिधी 
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील शेतकरी शिवाजी चंदू राठोड यांच्या शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना दि. ९मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली असून गट क्रमांक 219 मधील त्यांच्या दीड एकर शेतातील गहू जळून खाक आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील वीजवाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच आगीने उभ्या गव्हाच्या पिकाला वेढा घातला. आग लागल्याचे लक्षात येताच शेतकरी व परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दीड एकर क्षेत्रातील गव्हाचे उभे पीक जळून खाक झाले.
या आगीत शेतकरी शिवाजी राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच वीज विभागाने शेतातील वीजवाहिन्यांची तपासणी करून अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज
    1
    राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..
    1
    महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।
    1
    देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    10 hrs ago
  • Communist Party Protests Against US-Israel Attack on Iran
    2
    Communist Party Protests Against US-Israel Attack on Iran
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत रस्ते सोयी सुविधा या संदर्भात लक्षवेधी मध्ये सरकारचे लक्ष वेधले.. #DevendraFadnavis #EknathShinde #ArjunKhotkar
    1
    आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत रस्ते सोयी सुविधा या संदर्भात लक्षवेधी मध्ये सरकारचे लक्ष वेधले..
#DevendraFadnavis #EknathShinde #ArjunKhotkar
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.