logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई मुंबई, दि. १९ : देशातील सार्वत्रिक निवडणुका व पोटनिवडणुका 2026 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील बेकायदेशीर व दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. सर्व संबंधितांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने व नैतिकतेने वापर करावा, असे आयोगाने सांगितले आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000, आयटी नियम 2021 आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेला किंवा फेरफार केलेला कोणताही भ्रामक अथवा बेकायदेशीर मजकूर निदर्शनास आल्यानंतर संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी 3 तासांच्या आत कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रचार प्रतिनिधींनी प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या AI-आधारित किंवा डिजिटलरीत्या बदललेल्या मजकुरावर “AI-Generated”, “Digitally Enhanced” किंवा “Synthetic Content” अशी स्पष्ट नोंद करणे आवश्यक असून, त्या मजकुराच्या मूळ स्त्रोताची माहिती देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास टिकवण्यास मदत होईल, असे आयोगाने नमूद केले आहे. सध्या आसाम, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि पश्चिम बंगाल राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांदरम्यान सोशल मीडियावरील आचारसंहिता भंग करणारे, कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू शकणारे किंवा मतदान प्रक्रियेविषयी चुकीची माहिती पसरवणारे पोस्ट्सवर संबंधित राज्यांच्या आयटी नोडल अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवून तात्काळ कारवाई केली जात आहे. 15 मार्च 2026 रोजी निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत अशा 11 हजारांहून अधिक सोशल मीडिया पोस्ट्स/URL ओळखून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मजकूर हटविणे, गुन्हे नोंदविणे (FIR), स्पष्टीकरणे आणि खंडन जारी करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे. याशिवाय, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 126 अंतर्गत मतदान संपण्यापूर्वीच्या 48 तासांच्या शांतता कालावधीत कोणत्याही प्रकारचे निवडणूक प्रचार साहित्य प्रसारित करण्यास बंदी असल्याची तरतूदही आयोगाने पुन्हा अधोरेखित केली आहे. दूरदर्शन, रेडिओ, मुद्रित माध्यमे तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, नागरिक, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ECINET वरील C-Vigil अॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 15 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत एकूण 3,23,099 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 96.01 टक्के म्हणजेच 3,10,393 तक्रारींचे निकाली काढण्यात आले असल्याचे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. #ElectionCommission #SocialMediaRules #AIGenerated #FakeNewsAlert #ModelCodeOfConduct #ITRules2021 #cVIGIL #DigitalElection #Election2026 #DeepfakeAwareness #CyberSecurity #Transparency #VoteResponsibly #FactCheck #अहिल्यानगर #निवडणूक_आयोग #आचारसंहिता #CyberCell #EthicalCampaigning

16 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे : 1) सोनई पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. आरोपी: आसिफ आतीक कुरेशी (फरार) लियाकत इस्माईल कुरेशी (फरार) उबेद कुरेशी (फरार) (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) 2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी: सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर एकूण कारवाई: 2 गुन्हे दाखल 11 गोवंशीय जनावरे मुक्त 1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार) ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
    1
    चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे.
पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :
1) सोनई पोलीस स्टेशन हद्द
गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली.
आरोपी:
आसिफ आतीक कुरेशी (फरार)
लियाकत इस्माईल कुरेशी (फरार)
उबेद कुरेशी (फरार)
(सर्व रा. चांदा, ता. नेवासा)
2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द
गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपी:
सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर
एकूण कारवाई:
2 गुन्हे दाखल
11 गोवंशीय जनावरे मुक्त
1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार)
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Changdev Barge
    1
    Post by Changdev Barge
    user_Changdev Barge
    Changdev Barge
    राहाता, अहमदनगर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    1
    सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। 
बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    user_Akhtar maliq
    Akhtar maliq
    Gangapur, Aurangabad•
    17 hrs ago
  • ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
    1
    -----
(प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.
    1
    BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ​येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. ​नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. ​सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला
    1
    ​येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत.
​नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे.
​सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.