चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन - सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार मुंबई । राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तीन तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. या समितीने देशातील विविध राज्ये तसेच परदेशातील चित्रपट उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये चित्रपट निर्मितीदरम्यान येणाऱ्या अडचणी, चित्रीकरणासाठी आवश्यक सुविधा, परवानग्या तसेच उद्योगवृद्धीसाठी आवश्यक धोरणात्मक बदल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, प्रोडयुसर गिल्ड ऑफ इंडिया ग्रुपचे अध्यक्ष शिबासिश सरकार, उपाध्यक्ष मधू भोजवानी, लव्ह फिल्मचे भागीदार अंकुर गर्ग, मोशन पिक्चरचे व्यवस्थापकीय संचालक उदय सिंह, टी सिरीजचे शिव चनाना, रेड चिलिजचे आशिष सिंह, निर्माता नितीन तेज आहुजा, धर्मा प्रॉडक्शन अपुर्वा मेहता, जंगली पिक्चर्सच्या अमृता पांडे, निर्माता अजय कपूर, पिपल मिडिया फॅक्टरीचे निशित वर्मा, पॅनोरामाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम मिरचंदानी तसेच हेनल मेहता उपस्थित होते. मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध पायाभूत विकासकामांमुळे काही चित्रीकरण स्थळांवर तात्पुरत्या मर्यादा निर्माण झाल्या असल्या तरी विकासकामे पूर्ण झाल्यानंतर नव्या लोकेशन्स उपलब्ध होतील. राज्यात नवीन चित्रीकरण केंद्रे विकसित करण्यावर शासनाचा भर असून, कोल्हापूर येथे रेल्वे स्टेशनसह दोन ते तीन नवीन शूटिंग डेस्टिनेशन्स विकसित केली जात आहेत. नागपूरमधील रामटेक आणि नाशिक येथे जमीन संपादन पूर्ण झाले असून तेथे नवीन चित्रनगरी उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एन. डी. स्टुडिओचे आधुनिकीकरण शासनाच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फिल्म सिटीसाठी पूर्वी काढलेल्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता खासगी सहभागासह ‘हायब्रिड मॉडेल’ विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या सुलभ करण्यासाठी ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ प्रणाली विकसित करण्यात आली असून, सर्व परवानग्या ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय चित्रपट आणि माध्यम क्षेत्रातील कौशल्यविकासासाठी फिल्म सिटीमध्ये एफटीआयआयचे अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचा (IACT) कॅम्पसही एनएफडीसी कार्यालयात सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री ॲड. शेलार यांनी दिली. मालाड पश्चिम येथे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १०० एकरांहून अधिक जागेचा विकास करून ती कोस्टल रोड आणि सी-लिंकशी जोडण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

- 👉*“प्रतिमा पर विवाद, राजनीति में बढ़ा टकराव!”* 👉*मिरा-भाईंदर की सियासत में बयानबाजी तेज, विधायक Narendra Mehta ने मंत्री Pratap Sarnaik को दो टूक कहा* 👉*“आप अपना काम करें, हमें अपना काम करने दें।”*1
- Post by Nirbhay Nagri1
- हिम्मत है तो मुस्लिम देशों से आने वाले पेट्रोल डीजल का बहिष्कार करो,जितेंद्र आव्हाड का बयान || Islamuddin Khan हिम्मत है तो मुस्लिम देशों से आने वाले पेट्रोल डीजल का बहिष्कार करो,जितेंद्र आव्हाड का बयान || Islamuddin Khan1
- Accident opp Jupiter Hospital, Thane West. More details awaited.1
- बिजनौर के कस्बा मंडावर में पेड़ पर चढ़ा गुलदार! वन विभाग ने घंटों बाद किया रेस्क्यू..!#mandawarnews #Mandawar #Leopard #Guldar #ForestDepartment #RescueOperation #Bijnor #BreakingNews #ViralVideo #Wildlife #UPNews #HindiNews #YouTubeShorts1
- मार्शल आर्ट्स केवळ लढाईची कला नाही, तर आत्मविश्वास, शिस्त आणि स्वसंरक्षणाची शक्ती आहे. प्रत्येक महिलेला सुरक्षित, निर्भय आणि शक्तिशाली वाटणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण महिलांना आत्मविश्वास देऊन त्यांना स्वतःचे रक्षण करण्यास शिकवते.1
- ज्या बिल्डरची निवड स्वतःहा सोसाटीने केली त्या सोसायटीला विचारात न घेता बिल्डर पुनर्वसन इमारतीचा आराखडा कसा मंजूर करू शकतो..?? याला जबाबदार केवळ SRA चे अधिकारी आहेत. *पुनर्वसन आमचं म्हणता मग आमचं नियोजन आम्हाला न विचारता बिल्डर आणि अधिकारी कस करतो, हे नाही चालणार.1
- ठाणे में तेंदुए दिखने से लोगो मे दहशत, अलर्ट पर प्रशासन ठाणे में तेंदुए की दहशत, अलर्ट पर प्रशासन1
- ठाणे जिल्ह्यातील कौसा बायपास जंक्शनवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे हा परिसर वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून प्रवाशांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, विशेषतः लग्न समारंभांच्या वेळी.1