logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या तोडक कारवाईमुळे वसई-विरारमधील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. काही वर्षांपूर्वी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बेकायदा बांधकामे हटवल्याने वसई, विरार आणि नालासोपारा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर झाले होते. आता वांद्रे येथील या कारवाईमुळे वसई-विरार शहरात बोरीवली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पश्चिम रेल्वे प्रशासनाने वांद्रे पूर्वेतील गरीबनगर परिसरात बेकायदा बांधकामांविरोधात १९ मे ते २२ मे दरम्यान तोडक कारवाई केली. २० मे रोजी या भागातील रहिवाशांनी केलेल्या दगडफेकीमुळे परिस्थितीला हिंसक वळण लागले होते. तरीही रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू ठेवत ५,३०० चौरस मीटर जागेवरील ५०० पैकी ४०० अनधिकृत बांधकामे पाडली. या कारवाईमुळे सुमारे २,००० ते २,५०० रहिवासी बेघर झाले आहेत. यामुळे, बेघर झालेल्या विस्थापितांचा हा लोंढा वांद्रे येथील त्यांच्या मूळ वस्तीपासून जवळ आणि योग्य निवाऱ्याच्या शोधात वसई-विरार शहराकडे वळणार, अशा चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाल्या होत्या. मात्र, वसई-विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या केवळ वाऱ्यावरच्या चर्चा सत्यात उतरू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

2 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
0785af1f-0497-4d12-8beb-d77beb380228

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    2
    या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    user_Ashraf Ahmed
    Ashraf Ahmed
    Contractor उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.
    1
    उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.
    1
    सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
    1
    ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सैय्यद अली भाई साहब यांनी मुंब्रा शहराबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंब्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने आजवर शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेले नाही, ज्यामुळे या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे सूचित होते.
    1
    सैय्यद अली भाई साहब यांनी मुंब्रा शहराबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंब्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने आजवर शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेले नाही, ज्यामुळे या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे सूचित होते.
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या ताजमहालला भेट देण्यासाठी पोहोचली आहे. याबाबतची माहिती BNN NEWS ने दिली.
    1
    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या ताजमहालला भेट देण्यासाठी पोहोचली आहे. याबाबतची माहिती BNN NEWS ने दिली.
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.
    1
    सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.