केज येथे 'वर्षावास २०२६' अंतर्गत ग्रंथवाचन व धम्म प्रवचन मालिकेचे दिमाखात उद्घाटन आयू. जयपाल मस्के यांचे "प्रत्येक नगरात वर्षावास सुरू करा" असे आवाहन केज (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा, केज च्या वतीने आयोजित 'वर्षावास २०२६' अंतर्गत ग्रंथवाचन व धम्म प्रवचन मालिकेच्या उद्घाटन सोहळ्याचे अतिशय भव्य, उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात आयोजन करण्यात आले. हा सोहळा बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता वेळूवन बुद्ध विहार, भीमनगर (केज) येथे पार पडला. आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीत बौद्ध धम्मात वर्षावासाचे व्रत पाळले जाते. या पवित्र कालावधीत युगप्रवर्तक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या अमूल्य ग्रंथाचे वाचन केले जाते. याच औचित्याने केज येथे या विशेष ग्रंथवाचन व धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले असून, या मालिकेतील पहिला विषय 'विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध' हा होता. सोहळ्याची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून तसेच त्रिशरण-पंचशील ग्रहण करून करण्यात आली. धम्म प्रवचनाची आजच्या काळात खरी गरज : मा. अरुण पटेकर या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा (पूर्व) चे संघटक मा. अरुण पटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी आषाढ पौर्णिमेचे तथागत बुद्धांच्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व विस्तृतपणे विशद केले. तसेच वर्षावासाचे महत्त्व, 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाची थोरवी आणि आजच्या आधुनिक काळात धम्म विचारांची असणारी निकड यावर सविस्तर प्रकाश टाकला. प्रत्येक नगरात वर्षावास सुरू व्हावा : आयू. जयपाल मस्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना भारतीय बौद्ध महासभा केज चे शहराध्यक्ष आयू. जयपाल मस्के यांनी सर्वांना आषाढ पौर्णिमा व वर्षावासानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी, "शहरातील प्रत्येक नगरात वर्षावास सुरू करून धम्म कार्य तळागाळापर्यंत पुढे न्यावे," असे कळकळीचे आवाहन केले. तसेच शहरातील सर्व बौद्ध बंधू-भगिनींनी या संपूर्ण धम्म प्रवचन मालिकेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. महिला उपासिकांची लक्षणीय उपस्थिती व नवपदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला उपासिकांची झालेली प्रचंड उपस्थिती! महिला तालुका शाखेतर्फे: महानंदा गायकवाड, मीरा खरात, प्रमिला मस्के, बबिता मस्के, संगीता साळवे, कौशल्या मस्के यांची हजेरी होती. महिला शहर शाखेतर्फे: सुरेखा मस्के, कुसुम मस्के, रत्नमाला मस्के, आशा मस्के, हौसाबाई हजारे, कलावती हजारे, सुनीता हजारे, सावित्राबाई कांबळे, शीतल लोमटे, वर्षा हजारे व मैनाबाई मस्के उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थिती व खीरदान सोहळ्यास परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत मस्के, महेंद्र मस्के, कल्याण मस्के, डॉ. प्रभाकर ठोके व दीपक मस्के यांचा समावेश होता. वर्षावास उद्घाटन सोहळ्यानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव कल्याण मस्के यांच्या परिवाराकडून उपस्थित सर्व बौद्ध बांधव, उपासक-उपासिका आणि बालकांसाठी 'खीरदान' करण्यात आले. प्रसन्न वातावरणात सांगता मुख्याध्यापक आयू. नंदकुमार मस्के यांनी अतिशय नेटके आणि अभ्यासपूर्ण संचलन केले. शेवटी सरनत्त घेऊन तसेच 'जय भीम' आणि 'नमो बुद्धाय' च्या अभूतपूर्व जयघोषात या सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाला भीमनगर परिसरातील नागरिकांसह लहान बालक-बालिकांचीही मोठी उपस्थिती लाभली होती.

- हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.1
- *बद्रीनाथ में चोरी करने वाले के पास मिला सोना-चांदी:* आज खत्म हो रही रिमांड; PA ने घर में छिपाई थी चांदी की मूर्ति-विदेशी करेंसी बद्रीनाथ धाम के बहुचर्चित चढ़ावा चोरी मामले में मुख्य आरोपी प्रमोद नौटियाल की 4 दिनों की पुलिस कस्टडी रिमांड आज (31 जुलाई 2026) समाप्त हो रही है। चमोली पुलिस की विशेष जांच टीम (SIT) ने रिमांड के दौरान आरोपी के बद्रीनाथ और देहरादून स्थित ठिकानों पर ताबड़तोड़ छापेमारी कर भारी मात्रा में चोरी का सामान और संपत्तियों के दस्तावेज बरामद किए हैं।छापेमारी में बरामद हुआ 'खजाना'बद्री-केदार मंदिर समिति (BKTC) के अध्यक्ष के पूर्व निजी सहायक (PA) प्रमोद नौटियाल के पास से मिली सामग्रियां इस प्रकार हैं:मूर्तियां और धार्मिक वस्तुएं: बद्रीनाथ स्थित नीलकंठ वीवीआईपी गेस्ट हाउस के सरकारी आवास से भगवान नारायण की एक चांदी की मूर्ति, चांदी का नाग और मंदिर का पवित्र शालिग्राम पत्थर बरामद हुआ है।विदेशी और भारतीय करेंसी: तलाशी में 500-500 रुपये के नोटों की गड्डियों के साथ 150 नोट नेपाली करेंसी (विदेशी मुद्रा) और चांदी के सिक्के मिले हैं। ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा1
- उपसंचालकांचा आदेश असतानाही शिक्षकांची नियुक्ती नाही? सामाजिक संघटनांचे निवेदन व मागणी नेकनूर येथील डी.एड महाविद्यालय येथे शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याचे निवेदन सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आले1
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2
- अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल1
- जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण1
- उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोलीस चौकी अथवा पोलीस दूरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात उपळी येथील सौ. रूपाली कचरे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ मधील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी अथवा दूरक्षेत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, उपळी परिसरात गेल्या पाच वर्षांत ३१ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, महिला, विद्यार्थिनी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपळी येथे तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आणि पोलीस चौकी सुरू करण्यास झालेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनानंतर उपळी परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासन व गृह विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1