राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज (२९ मे) जालना जिल्ह्याचा दौरा करत विविध विकास प्रकल्प आणि शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात दरेगाव (ता. जालना) येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या पाहणीने झाली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली, तसेच कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी जालना शहरातील मोतीबाग चौपाटी येथे सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांची पाहणी करत कामाची गुणवत्ता, प्रगती आणि नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. शहर सौंदर्यीकरणाच्या कामांमध्ये दर्जा राखण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. त्यानंतर, जालना येथील सिरसवाडी रोडवरील जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेत भेट देऊन त्यांनी येथील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, विकास खारगे यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना तहसील कार्यालय आणि जालना येथील आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी केली. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहितीही घेतली. बदनापूर येथील कृषी विज्ञान/संशोधन केंद्रालाही त्यांनी भेट दिली. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना दिल्या.
राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज (२९ मे) जालना जिल्ह्याचा दौरा करत विविध विकास प्रकल्प आणि शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात दरेगाव (ता. जालना) येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या पाहणीने झाली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली, तसेच कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी जालना शहरातील मोतीबाग चौपाटी येथे सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांची पाहणी करत कामाची गुणवत्ता, प्रगती आणि नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. शहर सौंदर्यीकरणाच्या कामांमध्ये दर्जा राखण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला
निर्देश दिले. त्यानंतर, जालना येथील सिरसवाडी रोडवरील जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेत भेट देऊन त्यांनी येथील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, विकास खारगे यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना तहसील कार्यालय आणि जालना येथील आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी केली. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहितीही घेतली. बदनापूर येथील कृषी विज्ञान/संशोधन केंद्रालाही त्यांनी भेट दिली. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना दिल्या.
- जालना जिल्ह्यातील गाढेगव्हाण येथे गाव गुंडांनी केलेल्या अतिक्रमणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयावर धरणे आणि निदर्शने आंदोलन केले.1
- जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती. या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.1
- मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.1
- बनावट शिक्का प्रकरणामध्ये जाफ्राबाद पोलिसांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केला, ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईला एक मोठा झटका लागल्याचे दिसून येत आहे.1
- संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.1
- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी तांडा येथील पारस भालचंद्र जाधव या युवकाचे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी ऊसतोडीच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर अंबड पोलिसांनी एका चित्रपटातील थरारक कथेला साजेशी कामगिरी बजावत तब्बल सात महिन्यांनंतर त्याचा कर्नाटक राज्यातून सुखरूप शोध लावला. २७ मे २०२६ रोजी पारस जाधव सुखरूप सापडल्यानंतर त्याला अंबड पोलीस ठाण्यात आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी खरात व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आरोपी अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होते. या शोधमोहिमेत बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पीडित कुटुंबीयांनी युवा सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव यांच्याकडे धाव घेतल्यानंतर, त्यांनी तात्काळ रविकांत भाऊ राठोड यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रविकांत भाऊ राठोड यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्यासोबत चर्चा केली आणि तपासाची गती वाढवण्यासाठी नवीन तपास पथक नेमण्याची मागणी केली, ज्यामुळे तपासाला वेग आला. पोलीस उपनिरीक्षक बी. बी. नरोडे, पोलीस हवालदार यशवंत मुंडे, दीपक पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल अरुण मुंडे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कसून शोधमोहीम राबवत हा तपास यशस्वी केला. पोलिसांच्या या अथक प्रयत्नांमुळे पारस जाधव यांच्या कुटुंबीयांनी अंबड पोलिसांचे तसेच रविकांत भाऊ राठोड आणि अविनाश जाधव यांचे आभार मानले असून, समाजबांधवांकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.1
- मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी एक शिष्टमंडळ पोहोचले आहे.1
- तिरुप्पूर शहरात जोरदार वाऱ्यामुळे एक बॅनर कोसळले. या घटनेत एका दुचाकीस्वाराची गाडी घसरली, मात्र सुदैवाने दुचाकीचा चालक सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.1