प्री-पीएच.डी. कोर्सवर्कचा समारोप सोहळा उत्साहात नागपूर : ता.१८-२-२०२६ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या सेंटर फॉर हायर लर्निंग अॅण्ड रिसर्च, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व श्री निकेतन आर्ट्स कॉमर्स कॉलेज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्री-पीएच.डी. कोर्सवर्क (दि. ९ ते १६ फेब्रुवारी २०२६) चा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देवेंद्र भोंगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता तथा श्री निकेतन आर्ट्स कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मेधा कानेटकर ह्या होत्या. मान्यवर पाहुणे म्हणून मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या आगमनाने व विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर कोर्सवर्क समन्वयक डॉ. भारती गोस्वामी यांनी अभ्यासक्रमाचा अहवाल सादर केला. प्री पीचडी कोर्स वर्क मध्ये एकूण ६२ रिसर्च स्कॉलर्स समाविष्ट होते. नयना वोरा, मुकेश मानकर व आश्विन गंगारे या संशोधकांनी आठ दिवसांच्या कार्यशाळेबाबत आपले अनुभव व्यक्त करत अभ्यासक्रम संशोधनाभिमुख व उपयुक्त ठरल्याचे सांगितले. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संशोधन नीतिमत्ता, आंतरशाखीय अध्ययन व दर्जेदार संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे डॉ. देवेंद्र भोंगाडे यांनी संशोधकांना समाजोपयोगी व गुणवत्तापूर्ण संशोधन करण्याचे आवाहन केले, तर अध्यक्ष डॉ. मेधा कानेटकर यांनी कोर्सवर्कमुळे संशोधकांचा संशोधन पद्धतीवरील आत्मविश्वास वाढत असल्याचे सांगितले. सदर कोर्सवर्कमध्ये डॉ. मेधा कानेटकर, डॉ. निखिल अटाले, डॉ. आशीष लिंगे, डॉ. मृणमयी कानेटकर, डॉ. शायनी चिब, डॉ. वीणा प्रकाशे, डॉ. मंगला हिरवडे, डॉ. सुमित अरोरा, डॉ. केशव वाळके, डॉ. रेखा शर्मा व डॉ. भारती गोस्वामी या तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपाचे संचालन डॉ. भारती गोस्वामी यांनी केले तर व्यवसाय व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. राहुल खराबे यांनी सर्वांचे आभार मानले.

- नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद1
- Post by The Indian Matrimony1
- Post by Samachar king digital1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur1
- कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन ता. प्रतिनिधी कुही :- कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले. बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला. विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले. कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight1
- काळ पुढे सरकत जातो. जबाबदाऱ्या वाढत जातात. जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात. पण मनाच्या एका कोपऱ्यात मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते' फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत… आणि अशीच एक हाक आली.. चला.. अंकुर व्हॅली येथे . 'दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर!' साठी. जवळजवळ चार दशकांनंतर कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय चे माजी विद्यार्थी ‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले. ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती; ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती. ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती. अहमदनगरपासून काही अंतरावर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील 'अंकुर व्हॅली'मध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आगमनाच्या क्षणीच गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. त्या सुगंधी क्षणांनी मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच भेटीत सुंदर सुरुवात दिली. धुळीत हरवलेली पायवाट आज पुन्हा हसत भेटली; वय वाढलं, काळ बदलला, पण मैत्री तशीच राहिली. रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती, मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं; पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं. एकेक आठवण उलगडत गेली, हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला. या सुंदर मेळाव्यामागे ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती. एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. त्यांना साथ देणारे सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले , दत्ता नेवसे, सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे, , सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे यांचे आणि उपस्थित सर्वांचेच..परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले. प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे,अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले.. दादा पाटील महाविद्यालयातून ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो. गुरुजनांचे संस्कार, आई-वडिलांची पुण्याई आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली. शिक्षण, नोकरी, संसार या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं; स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली. “तेव्हाचा मी आणि आजचा मी” असं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत साठीकडे झुकलेलं वय.. पण मन मात्र अजूनही तरुण! हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली; आठवणी बोलक्या झाल्या; आज पुन्हा एकदा आपण ‘आपले’ झालो. या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग. गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे आणि मनमोकळं हास्य या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं. मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते, तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं. हसण्यातून हसू वाढतं, आणि आयुष्य अधिक हलकं होतं. या प्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांना "प्रफुल्लित मने" हे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते; तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती. निरोपाच्या क्षणी आप्पासाहेब होले यांनी एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन आदरपूर्वक निरोप दिला. त्या क्षणातही आपुलकीची ऊब होती. 'अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण, आपुलकीचे आदरातिथ्य, सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था' या सर्वांनी आनंद द्विगुणित केला. हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती; तो काळाशी केलेला संवाद होता. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही.. ती फक्त नव्याने उमलत राहते… असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत… मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो. हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा...!2