Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव ग्रंथोत्सवात श्री. निंबा कुंभार यांचा सन्मान; 'संत गोराबा काका' पुस्तकाचे प्रकाशन जळगाव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 'जळगाव ग्रंथोत्सव २०२६' मध्ये हिंगोणे बु॥ (ता. धरणगाव) येथील श्री. निंबा पुंडलिक कुंभार यांचा गौरव करण्यात आला. २४ व २५ मार्च रोजी संपन्न झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात श्री. निंबा कुंभार लिखित 'संत गोराबा काका' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील साहित्याचा असा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Kiran Mali
जळगाव ग्रंथोत्सवात श्री. निंबा कुंभार यांचा सन्मान; 'संत गोराबा काका' पुस्तकाचे प्रकाशन जळगाव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 'जळगाव ग्रंथोत्सव २०२६' मध्ये हिंगोणे बु॥ (ता. धरणगाव) येथील श्री. निंबा पुंडलिक कुंभार यांचा गौरव करण्यात आला. २४ व २५ मार्च रोजी संपन्न झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात श्री. निंबा कुंभार लिखित 'संत गोराबा काका' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील साहित्याचा असा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- पैठण तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पैठण तालुक्यात आज अवकाळी गारांचा जोरदार पाऊस झाला. रांजणगाव, दांडगा परिसरात अचानक वातावरण बदलून आकाशात काळे ढग दाटले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारांच्या तडाख्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.1