चांदवड-देवळा तालुक्यातील आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या आठ दिंड्यांमधील हजारो वारकरी बांधवांसाठी आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या वतीने २,००० शबनम कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. धोडप किल्ला परिसर, विजयनगर, कानमंडळे, पाथरशेंबे, तळेगाव, वडाळीभोई, देनेवाडी आणि दहिवड (ता. देवळा) येथून निघालेल्या या दिंड्यांमधील वारकऱ्यांना त्यांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा आणि आवश्यक साहित्य सुरक्षितपणे सोबत ठेवता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामागे "प्रदूषणमुक्त वारी – निर्मल वारी" हा संदेश पोहोचवणे, कापडी पिशव्यांचा वापर वाढवून प्लास्टिकमुक्त वारी घडवून आणणे हा मुख्य हेतू आहे. आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांनी यावेळी नमूद केले की, "वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा" असून, या भावनेतून श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संरक्षणाचा हा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वारकरी बांधवांनीही या उपक्रमाचे स्वागत करत आमदारांचे मनापासून आभार मानले. याप्रसंगी ह.भ.प. श्री. सौरभ महाराज जाधव, ह.भ.प. श्री. समाधान महाराज, ह.भ.प. श्री. निळोबा महाराज बोरसे, भाजप तालुका अध्यक्ष श्री. संदीप काळे, माजी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ॲड. शांताराम भवर, तसेच श्री. बाजीराव वानखेडे, श्री. पिंटू भोईटे, श्री. राजेश गांगुर्डे, श्री. दीपक उशीर, श्री. राहुल हांडेग, श्री. शशिकांत बोरसे, श्री. मनोज किरकडे, श्री. संतोष सलादे, श्री. भाऊलाल आहेर, श्री. महेंद्र रकीबे, श्री. मुकुंद बोरसे आणि श्री. राजेंद्र पाटील यांच्यासह विविध दिंड्यांमधील हजारो वारकरी उपस्थित होते. शेवटी सर्व वारकऱ्यांची आषाढी वारी सुखरूप, मंगलमय व आनंदमय पार पडावी आणि प्रदूषणमुक्त वारीचा संदेश समाजात रुजावा, अशी प्रार्थना विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी करण्यात आली.
चांदवड-देवळा तालुक्यातील आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या आठ दिंड्यांमधील हजारो वारकरी बांधवांसाठी आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या वतीने २,००० शबनम कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे.
धोडप किल्ला परिसर, विजयनगर, कानमंडळे, पाथरशेंबे, तळेगाव, वडाळीभोई, देनेवाडी आणि दहिवड (ता. देवळा) येथून निघालेल्या या दिंड्यांमधील वारकऱ्यांना त्यांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा आणि आवश्यक साहित्य सुरक्षितपणे सोबत
ठेवता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामागे "प्रदूषणमुक्त वारी – निर्मल वारी" हा संदेश पोहोचवणे, कापडी पिशव्यांचा वापर वाढवून प्लास्टिकमुक्त वारी घडवून आणणे हा मुख्य हेतू
आहे. आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांनी यावेळी नमूद केले की, "वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा" असून, या भावनेतून श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संरक्षणाचा हा सुंदर संगम साधण्याचा
प्रयत्न केला गेला आहे. वारकरी बांधवांनीही या उपक्रमाचे स्वागत करत आमदारांचे मनापासून आभार मानले. याप्रसंगी ह.भ.प. श्री. सौरभ महाराज जाधव, ह.भ.प. श्री. समाधान महाराज, ह.भ.प. श्री. निळोबा महाराज बोरसे,
भाजप तालुका अध्यक्ष श्री. संदीप काळे, माजी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ॲड. शांताराम भवर, तसेच श्री. बाजीराव वानखेडे, श्री. पिंटू भोईटे, श्री. राजेश गांगुर्डे, श्री. दीपक उशीर, श्री.
राहुल हांडेग, श्री. शशिकांत बोरसे, श्री. मनोज किरकडे, श्री. संतोष सलादे, श्री. भाऊलाल आहेर, श्री. महेंद्र रकीबे, श्री. मुकुंद बोरसे आणि श्री. राजेंद्र पाटील यांच्यासह विविध दिंड्यांमधील हजारो
वारकरी उपस्थित होते. शेवटी सर्व वारकऱ्यांची आषाढी वारी सुखरूप, मंगलमय व आनंदमय पार पडावी आणि प्रदूषणमुक्त वारीचा संदेश समाजात रुजावा, अशी प्रार्थना विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी करण्यात आली.
- चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील शिंदेवस्ती परिसरात आज सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत ५२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. दरेगाव येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई संतोष देवरे या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात माहेरी आल्या होत्या. नात शिक्षणासाठी तिथेच त्यांच्या भावाकडे राहत असून, वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इंदुबाई कालच राजदेरवाडीला पोहोचल्या होत्या. आज सकाळी इंदुबाई नेहमीच्या नित्यक्रमासाठी आणि प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा अनर्थ घडला. शिंदेवस्ती जवळील डोंगराचा भाग अचानक खचल्याने त्यावरून एक मोठा दगड थेट त्यांच्या अंगावर कोसळला. वजनी दगडाखाली दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कालपर्यंत आनंदाचे वातावरण असलेल्या घरात एका क्षणात शोककळा पसरली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे दरेगाव आणि राजदेरवाडी दोन्ही गावांवर शोकवदना पसरली असून परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.2
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।1
- नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.1
- बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली. आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.1
- नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.1
- नाशिकच्या दत्तनगर भागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे अखेर स्थानिकांचा संयम सुटला आहे. पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन नगरसेवक नितीन दातीर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. या वेळी नागरिकांनी तीव्र निदर्शने करत कार्यालयाला घेराव घातला आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली. प्रदर्शनकर्त्या नागरिकांच्या मते, या पाणीसमस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या दुर्लक्षाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता या गंभीर जलसंकटावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने गेल्या दोन वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की, ७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित येथील रेल्वे पोल क्रमांक १७४/१३१५ जवळ काम सुरू असताना, गुलाबसिंग आखाडे याने कोणतेही कारण नसताना एका मजुरावर लोखंडी पहारीने जीवघेणा हल्ला केला होता. या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होता. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत असल्याचे शोधून काढले. पोलिसांच्या विशेष पथकाने दोन दिवस सलग शोधमोहीम राबवून ग्राम चोली (ता. माहेश्वर, जि. खरगोन) येथून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५०, रा. बेरछा, ता. भिकनगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.3
- येवला तालुक्यातील देवदरी येथील दाणे वस्ती परिसरात शनिवारी रात्री ८:३० च्या सुमारास एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अज्ञात चोरट्याने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आहे. कमल दामू दाणे असे या जखमी वृद्ध महिलेचे नाव असून, त्या घराच्या परिसरात असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात त्यांच्या डोक्याला, कमरेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांना राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेद्वारे येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. तपासाला वेग देण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.1