logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड जिल्हा पोलीस दलात पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या बदल्यांचे आदेश दिले असून, यात नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांचाही समावेश आहे. त्यांच्या रिक्त जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज रोजी नेकनूर पोलीस ठाण्याचा पदभार चंद्रकांत गोसावी यांच्याकडून स्वीकारला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी नेकनूर पोलीस ठाण्याचा पदभार सुमारे अडीच वर्षांसाठी सांभाळला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखणे, अवैध धंद्यांवर कारवाई करणे, तसेच नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवून उल्लेखनीय कार्य केले. यातून त्यांनी पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यामुळे गोसावी यांच्या बदलीमुळे नेकनूरची जनता भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनीही नेकनूर पोलीस ठाण्याचा पदभार घेताच नेकनूरकरांना त्यांची दमदार एन्ट्री दिसून आली आहे. त्यांनी अवैध धंद्यांना थारा नाही, आणि कायदा व सुव्यवस्थेला कायमच प्राधान्य राहील असे आवाहन केले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी मंगेश साळवे यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

1 hr ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago
79478f6e-dc09-4e34-921a-a3464b888f8c

बीड जिल्हा पोलीस दलात पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या बदल्यांचे आदेश दिले असून, यात नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांचाही समावेश आहे. त्यांच्या रिक्त जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज रोजी नेकनूर पोलीस ठाण्याचा पदभार चंद्रकांत गोसावी यांच्याकडून स्वीकारला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी नेकनूर पोलीस ठाण्याचा पदभार सुमारे अडीच वर्षांसाठी सांभाळला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखणे, अवैध धंद्यांवर कारवाई करणे, तसेच नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवून उल्लेखनीय कार्य केले. यातून त्यांनी पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यामुळे गोसावी यांच्या बदलीमुळे नेकनूरची जनता भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनीही नेकनूर पोलीस ठाण्याचा पदभार घेताच नेकनूरकरांना त्यांची दमदार एन्ट्री दिसून आली आहे. त्यांनी अवैध धंद्यांना थारा नाही, आणि कायदा व सुव्यवस्थेला कायमच प्राधान्य राहील असे आवाहन केले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी मंगेश साळवे यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जनता न्यूजने पिंपरी-चिंचवडसाठी २६ मे रोजीच्या दिवसभराचे संपूर्ण अपडेट्स सादर केले आहेत.
    1
    जनता न्यूजने पिंपरी-चिंचवडसाठी २६ मे रोजीच्या दिवसभराचे संपूर्ण अपडेट्स सादर केले आहेत.
    user_जनता न्यूज
    जनता न्यूज
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी करत, एका तरुणीची अश्लील हावभाव करून छेडछाड करणाऱ्या विकृताला अटक केली आहे.
    1
    पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी करत, एका तरुणीची अश्लील हावभाव करून छेडछाड करणाऱ्या विकृताला अटक केली आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पिंपरी चिंचवडमधून अजित पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि विधान परिषद लढण्यास इच्छुक असलेले योगेश बहल यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. बहलांच्या मते, जर 'अजित दादा हयात असते' तर भाजपने पुणे विधान परिषदेच्या जागेवर हक्क दाखवत अशा 'वल्गना' केल्या नसत्या. या विधानामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. बहलांना विचारण्यात आले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेने नवख्या असल्याने भाजप याचा फायदा घेऊ इच्छित आहे का, आणि भाजप सुनेत्रा वहिणींची कोंडी करत आहे का? यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपने सुनेत्रा वहिणींची कोंडी करत असल्याचे म्हटले, ज्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, बहलांनी यासोबतच सुनेत्रा वहिनी खंबीर असून त्या पुणे विधान परिषदेची राष्ट्रवादीच्या हक्काची जागा निश्चितपणे मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत कोणताही तिढा निर्माण होणार नाही, असे दावे दोन्ही बाजूंनी केले जात असले तरी, योगेश बहलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
    1
    पिंपरी चिंचवडमधून अजित पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि विधान परिषद लढण्यास इच्छुक असलेले योगेश बहल यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. बहलांच्या मते, जर 'अजित दादा हयात असते' तर भाजपने पुणे विधान परिषदेच्या जागेवर हक्क दाखवत अशा 'वल्गना' केल्या नसत्या. या विधानामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

बहलांना विचारण्यात आले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेने नवख्या असल्याने भाजप याचा फायदा घेऊ इच्छित आहे का, आणि भाजप सुनेत्रा वहिणींची कोंडी करत आहे का? यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपने सुनेत्रा वहिणींची कोंडी करत असल्याचे म्हटले, ज्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, बहलांनी यासोबतच सुनेत्रा वहिनी खंबीर असून त्या पुणे विधान परिषदेची राष्ट्रवादीच्या हक्काची जागा निश्चितपणे मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.

पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत कोणताही तिढा निर्माण होणार नाही, असे दावे दोन्ही बाजूंनी केले जात असले तरी, योगेश बहलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पुणे-सातारा महामार्गालगत भोर तालुक्यातील खुटवड वस्ती परिसरात एका संशयित कारमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महामार्गावरील सर्विस रोडवर बराच वेळ उभ्या असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारकडे स्थानिकांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी तात्काळ राजगड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, गाडीत शिवाजी पारकर नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पोलीसही हादरले आहेत. मृत्यचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, राजगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    पुणे-सातारा महामार्गालगत भोर तालुक्यातील खुटवड वस्ती परिसरात एका संशयित कारमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महामार्गावरील सर्विस रोडवर बराच वेळ उभ्या असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारकडे स्थानिकांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी तात्काळ राजगड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, गाडीत शिवाजी पारकर नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पोलीसही हादरले आहेत. मृत्यचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, राजगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • शिरूर शहरात वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सोमवारी शहरातील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे हलवाई चौक परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने हलवाई चौक आणि सरदार पेठ परिसरात कारवाई केली, ज्यात जैन मंदिराच्या मागील उर्दू शाळेकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरील टपरी हटवण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठा असलेल्या कापड बाजार, आडत बाजार आणि सुभाष चौक परिसरातील दुकानांसमोरील शेड, पाट्या, ओटे व पायऱ्या देखील काढण्यात आल्या. रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी इतर अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना रोड येथे स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी कारवाई करण्यात आली. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या मदतीने राबविण्यात आली, ज्यात १७७ हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी यात सहभागी झाले होते. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले की, शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे आणि अशा मोहिमा भविष्यातही नियमितपणे सुरू राहतील. नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहे.
    3
    शिरूर शहरात वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सोमवारी शहरातील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे हलवाई चौक परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने हलवाई चौक आणि सरदार पेठ परिसरात कारवाई केली, ज्यात जैन मंदिराच्या मागील उर्दू शाळेकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरील टपरी हटवण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठा असलेल्या कापड बाजार, आडत बाजार आणि सुभाष चौक परिसरातील दुकानांसमोरील शेड, पाट्या, ओटे व पायऱ्या देखील काढण्यात आल्या. रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी इतर अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना रोड येथे स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी कारवाई करण्यात आली. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या मदतीने राबविण्यात आली, ज्यात १७७ हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली.

मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी यात सहभागी झाले होते.

मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले की, शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे आणि अशा मोहिमा भविष्यातही नियमितपणे सुरू राहतील. नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात एक मोठी धडक कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर मोठा प्रहार केला आहे. या कारवाईत विभागाने तब्बल २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १,७१६ बॉक्स मद्यसाठ्यासह दोन कंटेनर वाहनांचा समावेश आहे.
    1
    पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात एक मोठी धडक कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर मोठा प्रहार केला आहे. या कारवाईत विभागाने तब्बल २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १,७१६ बॉक्स मद्यसाठ्यासह दोन कंटेनर वाहनांचा समावेश आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    19 hrs ago
  • पुण्यातील वारजे परिसरात नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कारवाईला कायद्याचा धाक म्हणून पाहायचे की ती केवळ दडपशाही आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
    1
    पुण्यातील वारजे परिसरात नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कारवाईला कायद्याचा धाक म्हणून पाहायचे की ती केवळ दडपशाही आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे अनैतिक संबंधांच्या संशयातून एका विवाहित महिलेचा तिच्या पतीनेच खून केला. धनश्री नावाच्या या महिलेचा तिच्या पतीने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला होता, परंतु अनैतिक संबंधांच्या संशयाने या प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट झाला. या घटनेनंतर पतीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना शरण पत्करली आहे.
    1
    सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे अनैतिक संबंधांच्या संशयातून एका विवाहित महिलेचा तिच्या पतीनेच खून केला. धनश्री नावाच्या या महिलेचा तिच्या पतीने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला होता, परंतु अनैतिक संबंधांच्या संशयाने या प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट झाला. या घटनेनंतर पतीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना शरण पत्करली आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.